असा घ्या योग्य आहार...!
आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणते अन्नपदार्थ खावे, कोणते खाऊ नयेत, याची खबरदारी घेतली पाहिजे. आहाराबरोबर जीवनशैलीत बदल आणि नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.
सकाळी काय खाल?
सकाळी ९ वाजेच्या आत नाश्ता करावा. प्रोटिन, फायबरयुक्त नाश्ता असावा. आवळ्याचा रस, लिंबू पाणी, फळे, कडधान्ये, सॅलड, दही, दूध, शिजवलेल्या भाज्या यांचा समावेश असावा.
दुपारच्या जेवणात काय घ्यावे?
दुपारी १ ते १:३० वाजेदरम्यान जेवण करावे. आधी सूप, ताक, लिंबू पाणी पिता येईल. योग्य प्रमाणात सॅलड घ्यावे. भाज्या, डाळी, कडधान्य, दही, पोळी, भाजी, भात घ्यावा. अंडी यांचाही समावेश करता येईल.
रात्रीच्या जेवणात काय असावे?
रात्रीचे जेवण हे सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावे. हे जेवण हलके असावे. सूप, लिंबूपाणी घ्यावे. दलिया, खिचडी यासह पचायला हलके असणारे अन्नपदार्थ खावे. झोपताना दूध, सुका मेवा घेता येईल.
हे खाणे टाळा
■ बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. पिझ्झा, बर्गर असे जंकफूड खाणे टाळावे,
■ बाहेर जेवायला जाणार असाल तर आरोग्यदायी अन्नपदार्थ घ्यावे.
जीवनशैली बदलावी. मोबाइल, टीव्ही पाहत जेवण करणे टाळावे. घाईघाईने जेवण करणे टाळावे. वजन वाढत असेल तर जीवनशैलीत बदल करावा. लवकर उठावे, लवकर झोपावे, व्यायाम करावा.