मोबाईल चे दुष्परिणाम

0


  • मोबाईल चे दुष्परिणाम



कोरोना प्रादुर्भावानंतर मुलांमध्ये मोबाइलचा वापर वाढला आहे. अनेक मुले तर क्षणभरही मोबाइलपासून दूर राहू शकत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. तर काही लहान मुले मोबाइलशिवाय जेवणच करीत नाहीत. अशा समस्या अलीकडे वाढल्या आहेत. मोबाइल पाहात जेवण करणे, हे मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यातून मुलांचे वजन वाढू शकते. याकडे पालकांनी वेळीच लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

जेवण करताना हवा मोबाइल अनेक मुलांना जेवण करताना मोबाइल जवळ पाहिजे. मोबाइलवरील व्हिडीओ पाहत जेवण केले जाते. मोबाइल नाही तर जेवण नाही, अशी स्थिती अनेक मुलांची आहे. मुलांनी जेवण करावे, यासाठी अनेक पालक मुलांना मोबाइल दाखवितात.


सवय कशी मोडाल? 


मुलांमधील मोबाइलची सवय मोडण्यासाठी पालकांनी मुलांसमोर मोबाइलचा वापर कमी करण्याची गरज आहे. मोबाइल एकदम काढून घेण्याऐवजी मोबाइल वापराची वेळ हळूहळू कमी करीत जावे. त्यातून मोबाइलची सवय सुटण्यास मदत होते. मोबाइलवरील गेमऐवजी मुलांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.



वजन वाढण्याचा धोका


मुले मोबाइल पाहत जेवतात, अन्य पदार्थ खातात. फास्ट फूडचे सेवन करतात. मोबाइल पाहत जेवताना अधिक अन्नपदार्थांचे सेवन होते. यातून मुलांचे वजन वाढण्याचा धोका वाढतो.


मुलांसमोर वापर नको


         पालकांनी लहान मुलांसमोर नेहमी नेहमी मोबाइल वापरणे योग्य नाही. त्यातूनच लहान मुले अनुकरण करतात व त्यातून त्यांना मोबाइलची सवय लागते. त्यामुळे पालकांनी स्वतः मोबाइलचा अति वापर टाळावा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top