पं. जसराज जी

0

पं-जसराज

 पं. जसराज जी


               भारतातील महान गायकांपैकी एक असणारे शास्त्रीय संगीतच नव्हे तर संपूर्ण संगीत जगतात संपूर्ण विश्वात ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे मेवाती घराण्याचे जेष्ठ गायक पं. जसराज जी होय. पं. जसराज जी यांनी आपल्या गायकीच्या माध्यमातून विविध देशांमधील प्रेक्षक आणि संयोजका- ची मने जिंकली आहेत.


               पं. जसराज जी यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी हिसार, हरियाणामध्ये झाला. वयाच्या केवळ 4 थ्या वर्षी त्यांचा पितृआश्रय हिरावला. त्यांच्या घरातच संगीताचा वारसा असल्याने लहान असतांनाच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. पं. जसराज जी यांचे वडील पं. मोतीराम के देखील त्या काळचे उत्कृष्ठ गायक होते. पं. मोतीराम यांचे मामा नत्थूलाल व चिमणलाल हे मेवाती घराण्याचे संस्थापक नबीर खाँ यांचे शिष्य होते गाण्याची ही गायकी मामा नत्थूलाल यांच्याकडून पं. मोतीराम व पं. ज्योतीराम आणि त्यांची पूढची पिढी म्हणजे पं. मोतीराम यांचे पुत्र पं. मणिराम व पं. जसराजजी होत. अशा प्रमाणे मेवाती घराण्याच्या गायकीचा वारसा पूढे जसराज जी पर्यंत येऊन पोहोचला. सर्व बहिण-भावांमध्ये पं. जसराजजी के 9 व्या क्रमांकाचे पुञ होते. पित्याच्या मृत्युनंतर संपूर्ण परिवाराची जबाबदारी  जेष्ठ बंधू पं. माठणराम जसराज यांच्यावर आली. किशोर वयात असतांनापासून पासून पं. जसराज जी तबल्यावर साथ संगत करू लागले. त्या काळच्या अनेक दिग्गज गायकांना त्यांनी तबल्यावर साथ संगत केली. पंडीतजींचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या जेष्ठ बंधूबरोबर हैद्राबाद संस्थानात स्थायिक झाले. पं. जसराजजींनी तबला वादनाचे प्रशिक्षण त्यांचे व्दितीय बंधू पं. प्रताप नारायण यांच्याकडून घेतले.एका वेगळ्या प्रसंगानंतर पं. जसराजजींनी तबला वाद‌नाकडून गायकीकडे त्यांचा कल वाढला. आपल्या क्षेत्रात गायकांपेक्षा इतर कलाकारांना म्हणजेच वाद‌कांना फारशी चांगली वागणूक देत नाहीत असा त्यांना  अनुभव आला होता. त्यामुळे ते निराश झाले. प्रचंड मेहनत आणि संगीत साधनेतून तबला वादकापासून गायका पर्यंतचा प्रवास सुरू झाला. पं. जसराजजी यांचे प्राथमिक संगीत शिक्षण त्यांचे बंधू "पं. मणिराम' यांच्याकडे झाले माणि पूढे सानन्द मधील जयवंत सिंघ वधिला 'जी तसेच मेवाती घराण्यातील 'गुलाम कादिर खाँ आणि त्यांचे आग्रा घरण्यातील 'वल्लभदास दामुलजी' यांचे देखील मार्गदर्शन जसराजजी यांना लाभले. संपूर्ण कुटुंब हैद्राबाद मधून सानन्द येथे स्थायिक झाले. तेथील राजगायक "महाराजा 'जयवन सिंघ वाघला" (बापूसाहेब) यांच्याकडून पंडीत जींना नेह‌मीच आदर, प्रेम मिळाले भाणि विविध रागांचे व बंदिशींचे प्रशिक्षणही त्यांच्याकडून मिळाले. कोणतेही घराणे हे पारंपारिकतेने राग आणि ख्याल सादरीकरणातून ओळखले जाते. पं. जसराज जी यांच्या ख्याल सादरीकरण्याच्या बाबतीत वैविध्य आढळते. ख्याल सादरीकरणात काही प्रमाणात उपशास्त्रीय संगीताप्रमाणे विस्तार केल्याचा आभास त्यांच्या गायकीत असायचा. अर्थात ती नाविव्यता पं. जसराज जी यांच्या गाण्यात दिसून येते, की शास्त्रीय पारंपारिकतेपेक्षा ही वेगळ्या पध्दतीने गायकी प्रेक्षकांसमोर मांडली. आणि ती प्रेक्षकांना आवडली.संगीताच्या इतर घराण्याच्या गायकीचा काही प्रमाणात समावेश आपल्या गायकीत केल्याने त्यांच्यावर सुरुवातीला टिका ही झाल्या. याबद्दल संगीततज्ञ एस. कालीदास असे लिहितात की, " 'घराच्यांतील घटकांची' ही उधारी आता अधिक सामान्य झाली!


              पं. जसराजजी यांनी 'जसरंगी' नावाचा जुगलबंदिचा एक अभिनव प्रकार तयार केला. जी प्राचीन मूर्च्छना पध्दतीवर शैलीबध्द आहे. पुरुष आणि स्त्री गायक यांच्यामध्ये ही ख्याल गायनाची जुगलबंदी गातात. यामध्ये प्रत्येक वेगवेगळे राग यासह विविध दुर्मिळ राग सादर करतात. शास्त्रीय संगीत सादर करण्याबरोबरच जसराज जी यांनी उपशास्त्रीय संगीत शैली जसे की, हवेली संगीत ज्यामध्ये मंदिरामध्ये उपशास्त्रीय सादरीकरणाचा समावेश होतो. नवकल्पना लोकप्रिय करण्याचे कार्य त्यांनी केले. पं. जसराजजी यांनी केवळ शास्त्रीय संगीत जगतातच नव्हे तर चित्रपट संगीतामध्ये योगदान दिलेले आहे. 1966 ला 'लडकी सहयाद्री की' या चित्रपटात देसाई यांनी संगीतबध्द केलेले 'वंदन करो' हे गीत गायले तसेच अनेक शास्त्रीय आणि उपशास्त्रीय स्चना देखील त्यांनी गायल्या होत्या. बिरबल चित्रपटाच्या साउंडट्रेकसाठी गायक भीमसेन जोशींबरोबर युगल गीत गायले. तसेच विक्रम भट्ट दिग्दर्शीत 2008 मधील चित्रपटासाठी देखील त्यांनी गीत गायलेले आहे.

               International Astronomical union ने पं. जसराज जी यांचे नाव एका लघुग्रहाला दिले. 11 Nov. 2006 रोजी मंगळ माणि गुरु ग्रहाच्या दरम्यान स्थित असल्याचे आढळून आले. हा सन्मान मिळवणारे पं. जसराज जी पहिले भारतीय संगीतकार आहेत. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जसराज जी यांनी हैद्राबाद मध्ये पं. मोतीराम पं. मानिराम संगीत समारोह या वार्षिक संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. हा उत्सव 1972 पासून दरवर्षी आयोजित केला जातो. 1962 मध्ये दिग्दर्शक 'व्ही. गोताराम' यांची मुलगी मधुरा शांताराम यांच्याशी पं. जसराज यांचा विवाह झाला. ते 1963 मध्ये मुंबईला स्थायिक झाले त्यांचा मुलगा शारंगदेव पंडित (music Director) आणि मुलगी दुर्गा जसराज या दोघांचे देखील संगीत क्षेत्रात योगदान दिसून येते.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookJoin NowFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top