लोकसंगीत

0

लोकसंगीत

 लोकसंगीत


आजच्या संगीताच्या विकसित व उन्नत अवस्थेत लोकसंगीताचे स्थान गौण राहिलेले असले तरी एकेकाळी लोकसंगीताचा अधिक प्रभाव व प्रसार होता. इतकेच नव्हे तर शास्त्रीय संगीताला स्फूर्ती व प्रेरणा देणारे म्हणून लोकसंगीताचे स्थान महत्त्वाचे होते व आजही आहे. लोकसंगीताला पहाडातून उगम पावून स्वच्छंदपणे वाहणाऱ्या झऱ्याची उपमा दिली आहे. कारण लोकगीतांचा जन्मच लोकजीवनातून झाला आहे. जीवनाकरिता झगडणे (struggle for existence) ही प्राणीमात्राची गरज होती. दिवसभर श्रम केल्यावर श्रमपरिहार व मनोरंजनार्थ शब्द, सूर व लय यांची सांगड घालणारे असे संगीत कळत नकळत निर्माण झाले. सुरुवात लयीने व नादाने झाली. मग शब्द व सूर मदतीला धावून आले व त्यांनी मानवी मनाची समरसता साधली. लयीच्या जोडीला सार्थ शब्दांची साथ मिळून ते लयबद्ध काव्य झाले व काव्याला स्वरांची जोड मिळून त्याचे गीत बनले ते लोकसंगीत म्हणून आकाराला आले. लोकसंगीत जसजसे प्रगत होऊ लागले तसतसे त्याचे आपोआपच शास्त्र बनले.


लोकसंगीताची मुख्य आधाभूत तत्त्वे चार आहेत. 


१. लयतत्त्व (ताल), २. भाषातत्त्व (शब्द), ३. धुनतत्त्व (स्वर), ४. भावतत्त्व (रस). ह्या तत्त्वांवरच लोकसंगीताची रचना झालेली दिसून येते. अर्थात प्रथम लय, नंतर शब्द, नंतर स्वर व शेवटी भावदर्शन ह्या प्रकारे लोकसंगीतास मूर्त स्वरूप आले. लोकसंगीतात स्वरांचे महत्त्व व प्राबल्य अतिशय गौण असते. चार-पाच स्वरांपेक्षा अधिक स्वरांचा प्रयोग होत नाही. त्याची एक विशिष्ट धुन असते. मात्र या निरनिराळ्या लोकगीतांसाठी जे निरनिराळे स्वर योजण्यात आले व जी धुन तयार झाली त्यातूनच काही राग निर्माण झाले. अहिरभैरव हा रागसुद्धा लोकसंगीतातील धुनीवरूनच निर्माण झाला. असे कितीतरी आधुनिक राग आहेत की ज्यांची रचना ह्या लोकगीतांच्या धुनीवरून करण्यात आली आहे. उदा. पहाडी, मांड, झिंझोटी इ.


गायक पं. कुमारगंधर्व ह्यांचे मालावती, संजारी वगैरे रागांचे संशोधनकार्य सर्वश्रुतच आहे. लय ही लोकसंगीताची महत्त्वाची बाब असून विशिष्ट लयीच्या व तालाच्या आधारानेही गीतरचना करण्यात आल्या आहेत, त्यांना अनुकूल अशी वाद्येही तयार करण्यात आली आहेत. निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळी घनवाद्ये व स्वरवाद्येही निर्माण झाली. मात्र भाषा हे लोकसंगीतातील शब्दचित्र वर्णन करण्याचे एकमेव साधन ठरले. आज ते सर्व सुगमसंगीतात एक महत्त्वाचे अंग ठरले आहे. भावतत्त्व स्वरांपेक्षा इथे गौण होते पण स्वर आणि भाव ह्यांचेही महत्त्व आहेच. शृंगार, वीर, करुण व भक्तिरसाची निर्मिती हे लोकरंजनाइतकेच महत्त्वाचे होते. किंबहुना भावोत्कटता हाच लोकरंजनाचा पाया होय.



आधुनिक संगीताच्या दृष्टीने लोकसंगीताचे महत्त्व :


ह्या दृष्टीने लोकसंगीत आपल्या भारतीय संगीताचा अमोल ठेवा आहे, ते आपल्या शास्त्रीय संगीताची प्रेरक शक्ती ठरले आहे. भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन लोकसंगीतातूनच घडते. पूर्वी लोकसंगीतात सामूहिक गायन होत असे. आज आधुनिक काळात हे लक्षात येत आहे की वैयक्तिक किंवा एकल गायनापेक्षा सामूहिक गायन वीररस, भक्तिरसाच्या आविष्काराला जास्त प्रभावी ठरते. त्यामुळे चित्रपटातही आज नवनवीन लोकगीते निर्माण होत आहेत. एकूण लोकसंगीत हे शास्त्रीय संगीताला वरदान ठरले आहे हे निधित. सुगम संगीतातच लोकसंगीताचाही प्रादुर्भाव केला जातो. सुगम उपशास्त्रीय, ललित व लोकसंगीत ह्या सर्व संगीताची आजकाल सरमिसळ होत आहे.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top