भेंडीबजार घराणे
उस्ताद छज्जूखाँ, वजीरखाँ व खादीमहुसेनखाँ हे तिथेही भेंडीबजार घराण्याचे संस्थापक म्हणता येतील. उत्तम गायक, आदर्श गुरू व श्रेष्ठ वाग्गेयकार अशा गुणांचा त्रिवेणी संगम ह्यांच्या ठिकाणी होता. हे घराणे अगदी अलीकडच्या काळातले असून ह्यांनीउत्तरी व दक्षिणी दोन्ही संगीताचा समन्वय करून एका आगळ्या वेगळ्या शैलीने आपली गायकी सजवली व लोकप्रिय केली. हे तिथेही बंधू मुंबईला भेडीबाजार येथे स्थायिक झाले म्हणून त्यांनी आपल्या अलौकिक गायनशैलीला 'भेंडीबजार' घराणे असे नाव दिले.
भेंडीबजार घराण्याची वैशिष्ट्ये
१. आवाज खुला, निकोप, अचूक स्वरफेक, स्वर दीर्घ व स्थिर लावणे.
२. ख्याल गायन अतिशय विलंबित लयीत, आसयुक्त स्वर लावून गाणे.
३. रेखीव बंदिश, बंदिश आळवण्याचा आगळा ढंग, स्थायी, अंतरा सुंदर भरणे.
४. खंडमेरू पद्धतीने असंख्य स्वरालंकारांनी युक्त गायन.
५. सुरेल आलापी व अनेक प्रकारांनी युक्त ताना मागे,
६. सरगमयुक्त गाणे व दक्षिणी संगीतातीलही राग गाणे. उदा. अभोगी, हंसध्वनी, सालगवराळी इ.
भेंडीबजार घराण्याची परंपरा
छज्जू उ. नजीरों व उ. खादीमहुसेनखाँ हे बंधूत्रय निर्माति असून ह्या तिन्ही बंधूंनी अंजनीबाई मालपेकर, वाडीलाल नायक, शमीरखाँ, गोहरजान, पं. वि. ना. भातखंडे वगैरे अनेक शिष्य तयार केले. तर अंजनीबाईंनी किशोरी अमोणकर, बेगम अख्तर, नयनादेवी व त्र्यंबकराव जानोरीकर इत्यादींना संगीत शिक्षण दिले. उ. छज्जूखाँचे पुत्र उ. अमान अलीखाँ ह्यांनी उ. अमीर खाँ, पं. त्र्यंबकराव जानोरीकर, शिवकुमार शुक्ल (संतूरवादक ), लता मंगेशकर, आंबेरकर, रमेश नाडकर्णी, वसंतराव देशपांडे इत्यादी शिष्य तयार केले. तर जानोरीकर व वसंतराव देशपांडे ह्यांनी अनेक शिष्य शिकविले जे आज मैफिली गाजवत आहेत व परंपरा चालवीत आहेत.