महर्षी भरत व नाट्यशास्त्र

0

महर्षी भरत व नाट्यशास्त्र

 महर्षी भरत व नाट्यशास्त्र


           संगीताच्या इतिहासात अनेक भरत झाले परंतु येथे आपण 'नाट्यशास्त्र'कार भरत व त्याच्या नाट्यशास्त्राचा विचार करणार आहोत. महर्षी भरताबद्दल काहीही माहिती मिळत नाही. परंतु त्याच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेता येईल. भरताचा जन्म स्थान, मातापिता हे सर्व कळू शकत नसले तरी त्याच्या पुत्राचे नाव 'दत्तिल' होते एवढे कळते. ( अमरकोषात 'भरत' या शब्दाचा अर्थ 'नट' असा दिला आहे. ) भरताने आपल्यापूर्वीच्या नंदिकेश्वर, वत्स इ. ग्रंथकारांचा उल्लेख आपल्या ग्रंथात केला आहे परंतु त्यांचे ग्रंथ आज सापडत नाहीत. भरताने त्यावेळच्या संगीताला 'गांधर्व संगीत' असे म्हटले आहे. गंधर्व हे गानव्यवसायी होते. भरतकाळ हा आर्यसंस्कृतीच्या परिणतावस्थेचा काळ होय. हा यज्ञसंस्थेचा उत्तरकाल म्हणजे इसवी पूर्व १४०० ते ५०० पर्यंत म्हणजे ९०० वर्षांचा काळ म्हणजेच बुद्धपूर्वकाळ असावा असे काही विद्वानांचे मत आहे. परंतु आधुनिक विद्वानांच्या मते भरताचा काळ ५ व्या शतकाच्या आसपास असावा. भरताने नाटकातील धृवागीते ही प्राकृत व संस्कृत ह्या दोनच भाषातील घातली आहेत.


        वास्तविक भरताचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ केवळ संगीतविषयक नसून त्याच्या शेवटच्या सहा अध्यायात फक्त संगीताच्या शास्त्रावर विवेचन केले आहे, त्यावरून त्या काळात नाट्य व संगीत ह्यांचा संबंध घनिष्ट होता हे सिद्ध होते. भरताच्या 'सारणा चतुष्टयी प्रयोगावरून त्याच्या उच्च स्वरज्ञानाची खात्री पटते. संगीताच्या दृष्टिकोनातून संगीतशाखाचे विवेचन करणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. नंतरच्या सर्व विद्वानांनी भरतालाच अनुसरले आहे. आजही हाच आर्य ग्रंथ प्रमाणभूत मानला जातो. भरताने सात शुद्ध स्वरांशिवाय अन्तर गांधार ब काकली निषाद हे विकृत स्वर मानले. कालप्रवाहात हळूहळू सप्तकात १२ स्वर मानले गेले. भरताचे नाट्यशास्त्र उत्तरी व दक्षिणी दोन्ही संगीताचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. ह्यात ३३ अध्याय असून शेवटच्या २८ ते ३३ अध्यायात संगीतशाखावर प्रकाश टाकला आहे.         महर्षी भरताने जातीची जी दहा लक्षणे मानली तीच दहा लक्षणे आज १५०० वर्षांनंतरही रागलक्षणे म्हणून ओळखली जातात. भरताचा श्रुति स्वर सिद्धांत व ग्रामाचे प्रकार मान्यता पावले. ह्या श्रुति स्वर सिद्धांतांवर आधारित जातींमध्ये सर्व संगीत दडलेले आहे. महर्षी भरताने चित्रा व विपञ्ची ह्या दोन तन्त्रीवीणांची चर्चा केली आहे. भरताच्या वीणेला 'मनकोकिला' म्हटले जाई, हिच्यातील २१ तारांमध्ये तीन्ही सप्तके मिळत असत. भग्नकाळातील वीणेला पडदे (सारिका) नव्हते. प्रत्येक स्वरासाठी वेगवेगळ्या तारा होत्या. भरत मतंगाने आपला गुरू मानले होते. दत्तिल, कोहल, मतंग, अभिनवगुप्त, हरिपाल, शारंगदेव, कुम्भ हे सर्व त्याचे अनुयायी होते. ह्या सर्वांनी भरताच्या नाट्यशास्त्राला आधारभूत मानून आपापले टीकाग्रंथ लिहिले.संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top