उ. झाकीर हुसेन जीवनी

0

उ. झाकीर हुसेन जीवनी

 उ. झाकीर हुसेन (पंजाब घराणा)

तबला वादक, संगीतकार आणि तालतज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, उस्ताद अल्लारखॉं यांचेसर्वात मोठेसुपुत्र. आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ताल जगताला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजेउस्ताद झाकीर हुसेन होय.

जन्म 

उ. झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथेझाला. त्यांच्या वडीलांचेनाव अल्लार खॉं व आईचे नाव बावी बेगम आहे. ग्यानी बाबा नावाच्या सत्पुरूषाने बावी बेगम यांना मुलाचे नाव झाकीर हुसेन ठेव असे सांगितले, झाकीर याचा एक अर्थ असा की जिक्र करतो तो, म्हणजे जिक्र करणेहा सूफी परंपरेचा भाग आहे.

गुरू व शिक्षण 

पंजाब घराण्याचा मोठा वारसा घेऊन जन्माला आलेल्या उ. झाकीर हुसेन यांची लहानपणापासूनच तबल्यावर बोटे फिरू लागली. त्यांचे तबला वादनाचे शिक्षण उ. अल्लारखॉं यांच्याकडे झाले. त्यांचे शालेय शिक्षण सेंट मॉयकेल हायस्कूल, माहीम येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई येथेझाले. झाकीर हुसेन आपल्या तबला वादनाचेश्रेय तबलावादनातील त्रिमूर्तीला देतात. ही त्रिमूर्ती म्हणजे पं. सामताप्रसाद, पं किशन महाराज आणि त्यांचेवडील अल्लार खॉं. यांच्या घरात परंपरागत तबलावादना चे वातावरण होते. पहाटे तीन वाजता उठवून अल्लारखाँ(बाबा) बोल शिकवायचे,तालबद्ध शब्दोच्चार शिकवायचे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली झाकीर हुसेन यांनी अथक परिश्रम घेतले. वर्षानुवर्षे केलेला अखंड रियाज, अल्लारखाँ यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे उ. झाकीर हुसेन एक महान तबलावादक म्हणून उदयास आले.

वादनशैली

उ. झाकीर हुसेन यांची वादनशैली पंजाब घराण्याची आहे. ते इतर सर्व घराण्यांचादेखील तबला तयारीने वाजवतात. वादनातील तयारी, वादन स्पष्टता, गोडवा,दायाँ-बायाँवरील अप्रतिम संतुलन, गणिती सौंदर्य, क्लिष्ट लयकारीवरील प्रभुत्व या साऱ्याच गोष्टी कल्पनातीत आहेत. स्वतंत्र वादनाबरोबरच गायन, वादन, नृत्याची साथसंगत म्हणजे रसिक प्रेक्षकांना मोठी मेजवानी असते. भारतीय संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. यशस्वीता ईश्वर प्राप्त देणगी लाभलेल्या उ.झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पाहिला जाहीर कार्यक्रम केला. वयाच्या बाराव्या वर्षी तबलावादनासाठी जगभ्रमण सुरू केले. १९७० मध्ये त्यांनी अमेरिकेत एकाच वर्षात १५० यशस्वी मैफिली केल्या. भारतीय व पाश्चात्य कलावंतासोबत फ्युजन या प्रकारातून भारतीय संगीताचेमहत्त्व सर्व जगामध्ये पोहोचवले. देशविदेशातील विद्यापीठांमध्ये तबलावादनाचे अध्यापनाचे कार्य ते करीत आहेत. सॅनफ्रॅन्सिस्को आणि मुंबई येथील आपल्या अकादमीच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना तबलावादनाचे अनमोल असे मार्गदर्शन करीत आहेत.

मानसन्मान/पुरस्कार

उ. झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ग्रॅमी ॲवार्ड असे पुरस्कार मिळालेले आहेत. अमेरिकेची प्रतिष्ठित नॅशनल हेरीटेजफेलोशिप, ‘The speaking hand zakir hussain and art of the Indian drum’ आणि ‘Zakir and his friends 1998’ या दोन dacumentry film त्यांच्या जीवनावर तयार करण्यात आल्या आहेत. १९८३ साली प्रदर्शित ‘Heart and dust’ या चित्रपटापासून त्यांनी चित्रपटाला संगीत देण्यास प्रारंभ केला. ‘साज’, The majestik major’ ‘Mister and Mrs. Iyyer या चित्रपटांना उस्तादजींनी संगीत दिलेले आहे. २०१८ साली ‘माझं तालमय जीवन’ झाकीर हुसेन हे त्यांच्या जीवनावर आधारित प्रणव सखदेव यांनी अनुवाद केलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे.



संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top