पं. स्वपन चौधरी जीवनी
पं. स्वपन चौधरी (लखनौ घराणा)
जगभरातील सर्वतोपरी आदरणीय असलेल्या तबला वादकांपैकी एक म्हणून संगीत जगतात पं. स्वपन चौधरी याचे नाव आदराने घेतले जाते.जन्म पं. स्वपन चौधरी यांचा जन्म १९४७ साली कलकत्ता येथे झाला. गुरू आणि शिक्षण वयाच्या पाचव्या वर्षापासून पं. संतोष कृष्ण विश्वास यांच्याकडे लखनौ घराण्याचे परंपरागत शिक्षण घेतले. कोलकता येथील जाधवपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली. तसेच संगीत विषयात M.A. ही पदवी प्राप्त केली.परिश्रम घरातच वादनाची आवड असल्यामुळे वडीलांनी सपनदादा यांच्या रियाजाकडे लक्ष दिले. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अखंड रियाजामुळे स्वपन चौधरी हे नाव परिचित होऊ लागले. वादनशैली पं. स्वपन चौधरी यांची लखनौ घराण्याची वादनशैली आहे. वादनातील स्पष्टता, अविश्वसनीय वेग, अप्रतिम विविधता, मोहकपणा, बुद्धीचातुर्य, तबलाडग्ग्यातील संतुलन, तबल्याच्या चाटीतून निघणारी आस इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्या वादनामधून दिसून येतात. यशस्वीता उ. हबीबखान, अमीरखान, वसंतराय, उ. विलायत खाँ इ. वादक तसेच पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, डॉ. बालमुरली कृष्णन इ. भारतीय गायक आणि एल शंकर, जॉन हँडी व आफ्रिकन ड्रमर मास्टर मालेंगा यांच्यासोबत साथसंगत केली आहे. तसेच टोकीयो, सॅन फ्रान्सिस्को, क्वालांलपूर, स्टटगार्ड, बार्लिन येथील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांत भाग घेतला आहे. १ मे १९८१ पासून अलिअकबर कॉलेजमध्ये (अमेरिका - कॉलिफोर्निया) तालवाद्याचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.
मानसन्मान/पुरस्कार
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्टिस्टचा पुरस्कार, Percussive Arts society Hall of Fame साठी नामांकन, आशा भोसले व अली अकबर खान यांच्यासोबत दोन ग्रॅमी नामांकनांचे विक्रम केले. १६ मार्च १९९६ रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, २०१९ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. सध्या ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत यामध्ये प्रामुख्याने अभिनय पाध्ये, निलन चौधरी, सतीश तारे, श्रीपाद तोरवी, अरविंद साठे यांचा उल्लेख करावा लागेल.