भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्य

0

 
भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्य

   भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्य 

भरतनाट्यम् 

भरतनाट्यम हे मूळ दक्षिण भारतातील शास्त्रीय नृत्यअसून आजकाल ते संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. हे शास्त्रीय नृत्य मूळात देवदासी करत असत. उत्तरेच्या मानाने दक्षिण भारतावर परकीय आक्रमणे कमी झाल्यामुळे दक्षिणी संगीतावर त्याचा परिणाम फारसा झाला नाही. त्यामुळे भरतनाट्यमचे मूळ रूप, त्याची प्राचीन प्रणाली आजही शुद्ध स्वरूपात पहायला मिळते. या नृत्य प्रकारात शास्त्रीय मुद्रांचा अधिक उपयोग केला जातो. त्यात किरकोळ कथाही सापडतात, पण कथ्थक नृत्याप्रमाणे यामध्ये कथानक नसते. भरतनाट्यम या नृत्यासाठी खास करून मृदंगम, बासरी, व्हायोलिनची साथ असते आणि त्याच्या जोडीला कर्नाटकी गीते गायली जातात. वाद्यांवरही कर्नाटकी सुरावट असते. भरतनाट्यम या नृत्यप्रकारात कर्नाटकी संगीताचा वापर केला जातो.

नृत्याचा क्रम :

भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराचे मुख्यतः सात भाग पडतात, त्या भागांना मार्गम् असे म्हणतात. 

१) अल्लारिपू 

२) जतिस्वरम् 

३) शब्दम्

 ४) वर्णम् 

५) पदम् 

६) तिल्लाना 

७) श्लोकम्भरतनाट्यम्ची वेशभूषा :

या नृत्यप्रकारात महाराष्ट्रीयन नऊवारीसारखी दिसणारी साडी नेसतात. साडी शिवलेली असते. दोन्ही पायांच्यामध्येचुणीदार पंखा असतो. अंगावरून दुपट्ट्याचा पदर घेतलेला असतो व तो पाठीमागून कमरेला खोचलेला असतो. अर्ध्याहातांच्या बाह्यांचे ब्लाऊज असते. संपूर्ण वेशभूषेचे कापड जरीकाठांचे, रेशमी किंवा कांजीवरमचे असते. कमरपट्टा, गळ्यात व कानात आभूषणे, भांगामध्येबिंदी, डोक्यावर खड्यांचे चंद्र आणि सूर्य, केसांची सुरेख रचना लांब वेणीच्यारूपात करतात. वेणीवर गजरा व भरपूर फुले लावून वेणीची आकर्षकता वाढवली जाते. स्त्रीच्या रूपाला पावित्र्य, मोहकता आणि बांध्याला उठाव देणारी अशी ही वेशभूषा असते. छानसा मेकअप (रंगभूषा) असतो.अलीकडे भरतनाट्यम्मध्ये जावली हाही एक प्रकार सादर करतात. यातील शृंगार सर्वसामान्य माणसास समजणारा असतो. नायक-नायिका सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्वकरतात. नटनममध्ये नटराजाची स्तुती असते.

कुचिपुडी

कुचिपुडी हे आंध्रप्रदेशातील एक पारंपरिक नृत्य नाट्य आहे जिचा आज शास्त्रीय नृत्य शैली म्हणून बराच विकास झाला आहे. आंध्रप्रदेशात कुचिपुडी नावाचे गाव असून हे संपूर्ण गाव गेल्या अनेक वर्षांपासून ‘कुचिपुडी’ नृत्यशैलीची साधना करीत आहे. कुचिपुडी या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात झाला. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार असून सहाव्या शतकातील भक्ती संप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या कला प्रकाराचे विशेष योगदान आहे. कुचिपुडी या गावात रामायणातील कथा या गीत, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत. त्या समूहाला ‘कुलशीव’ असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरुष पात्राचा सहभाग असतो. भरतनाट्यम् आणि ओडिसी नृत्यशैलीचा समन्वयही या नृत्यप्रकारात साधला गेलेला दिसतो. सतराव्या शतकात सिद्धेंद्र योगी यांनी कुचिपुडी गावातील युवकांना बरोबर घेऊन हा नृत्यकलाप्रकार जगासमोर आणला.हिंदू धर्म आणि त्यातील पौराणिक कथा यांची परंपरा जतन करून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य या नृत्यशैलीने केले आहे. या नृत्यशैलीमध्ये ‘शब्दम’ या प्रकाराची प्रधानता असते. भरतनाट्यमप्रमाणेच यात तिल्लाना हा प्रकारही सादर होतो. पदलालित्य हे या शैलीचे महत्त्वाचे अंग मानले जाते. नृत्याच्या शेवटी कलावंत थाळीमध्ये नर्तन करतो. हे नृत्यस्वतंत्र आणि लयदार पद्धतीने केले जाते. लास्य आणितांडव या दोन्हीचे मिश्रण यात असते. प्रत्येक नर्तक हा तालाच्या साथीने नृत्य करत रंगमंचावर प्रवेश करतो. ह्यानृत्य शैलीवर संस्कृत कवी जयदेव यांच्या गीतगोविंद या काव्याचा प्रभाव जाणवतो. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याने या नृत्याला प्रोत्साहन दिले. या नृत्यासाठी नर्तक वापरत असलेला पोषाख हा भरतनाट्यम नृत्यशैलीच्या पोषाखासारखाच असतो. अंगसंचालन स्प्रिंगप्रमाणे वरखाली पद्धतीने असल्याने शरीरातील प्रत्येक भागावर अधिक मेहनत घेणे गरजेचे असते. कुचिपुडी हे मुख्यतः नाट्य असल्यामुळे यात नृत्याबरोबर अभिनयाला अधिक प्राधान्य दिले जाते.संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top