ओडिसी नृत्य, कोळी नृत्य व धनगरी नृत्य
ओडिसी नृत्य
ओडिसी नृत्यशैली ओरिसा येथील असल्यामुळे तिचे नाव ‘ओडिसी’ असे पडले. या शैलीची सुरुवात कुठे झाली व ही किती प्राचीन आहे याचा ठोस पुरावाउपलब्ध नाही. ओरिसा येथील प्राचीन मूर्तिकला पाहून एक गोष्ट नक्की जाणवते की ही नृत्यशैली शास्त्रसंमत आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात राजा खारवेलाच्या कारकिर्दीत या नृत्यशैलीचे पुनरुज्जीवन झाले असावे. प्राचीन गोतीदुवाआणि महारी या दोन नर्तन परंपरांमध्येया शैलीचा उगम झाला असावा. इतर भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीप्रमाणेच यालादेखील धार्मिक पार्शभूमी आ ्व हे. ह्या शैलीचे प्रदर्शन पुरीच्या जगन्नाथ मंदिरापुरतेच मर्यादित होते. कोणार्कच्यासूर्यमंदिरातील शिल्पाकृती ओडिसी नृत्यशैलीमध्ये असून त्या सजीव आणि साकार झाल्याचा अाभास निर्माण होतो. भुवनेश्वर येथील शिल्पाकृतीही या शैलीवर आधारीत आहेत. एक गाेष्ट मात्र खरी की भारताला स्वातंत्र्यमिळाल्यानंतर ओडिसी नृत्य पद्धतीचा विकास झालाआहे. या शैलीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक कलाकारांनी संघर्ष केला आहे. अभिनय चन्द्रिकेनुसार ओडिसी नृत्यामध्ये चार प्रकारचे पादभेद सांगितले आहेत. त्यांनास्तंभपाद, कुंभपाद, धनुपाद आणि महापाद असे म्हटले आहे. ‘नाट्यशास्त्र’, ‘अभिनय दर्पण’, रघुनाथराय याचे ‘नाट्य मनोरमा’, नारायण यांचे ‘संगीत नारायण’ आणिओरिसातील ‘शिलालेख’ हे या नृत्यशैलीसाठी वापरले जाणारे संदर्भ ग्रंथ आहेत. ह्या नृत्यशैलीच्या प्रस्तुतीक्रमात सर्वप्रथम मंगलाचरण, मग बटू नृत्य त्यानंतर पल्लवी मगअभिनय आणि सर्वात शेवटी मोक्षनाट्य प्रस्तुत केले जाते. ओडिसी नृत्यशैलीचा प्रसार करण्यात पं. केलूचरण महापात्रायांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. ठिकठिकाणी नृत्य शिबिरे घेऊन त्यांनी ह्या नृत्यशैलीचा खूप प्रसार केलाआहे व अजूनही करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नर्तक शिष्य तयार झाले आहेत.
वेशभूषा : स्त्रियांसाठी हातमागावर विणकाम केलेली नऊवारी सुती किंवा रेशमी अशी ठरावीक पद्धतीची साडी असते. या नऊवारी साडीला ‘शटटू सारी’ असे म्हणतात. कुंचुल म्हणजे चोळी, निविबंध म्हणजे कमरेभोवती गुंडाळण्याचे वस्त्र तसेच ‘जोभा’ म्हणजे कंबरपट्टा असापारंपरिक पोषाख असतो. अंबाड्यावर मुकुटाप्रमाणे घातलेली वेणी आणि कंबरपट्टा या दोन पारंपरिक गोष्टींमुळे ओडिसीची वेशभूषा चटकन डोळ्यांत भरते.
कोळीनृत्य
कोकण किनारपट्टीवर विसावलेल्या कोळी बांधवांचे लोकप्रिय लोकनृत्य म्हणजे कोळीनृत्य होय. लग्न समारंभ, सणासुदीच्या प्रसंगात स्त्री-पुरुष बेभान होऊन नृत्य करतात. कोळी नृत्यातील ताल, ठेका पदन्यास पाहण्यासारखाअसतो. अशा या कोळी नृत्याची माहिती पुढीलप्रमाणेकोळी लोक मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात किणारपट्टीवर राहतात. हे लोक समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्यामुळे समुद्राला देव मानतात. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहात साजराकरतात. या दिवशी ते वाजत गाजत जाऊन सोन्याचमुलामा दिलेला नारळ अर्पण करतात. यादिवशी स्त्री-पुरुष दोन गटात एकत्र येऊन अथवा जोडीन नृत्य करतात. या नृत्यात पुरुष टीशर्ट, डोक्यावर टोपी व पुढून त्रिकोणी असलेली लुंगी परिधान करतात तर स्त्रिया गुडग्यापर्यंत हिरव्या साड्या नेसतात. पुरुष कपाळावर व कानाला पांढरे ठिपके लावून रंगभूषा करतात तर स्त्रिया विविध अलंकारांनी नटूनथटून येतात. या नृत्यासाठी मासे पकडण्याचे जाळे, होडी, नारळाचे झाड असे नेपथ्य केले जाते. याबरोबरच लाटांची गती, मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे फेकण्याची मुद्रा ही या नृत्याची खासियत आहे. कोळी नृत्यासाठी सनई, ढोलकी, कीबोर्ड, हार्मोनियम, कच्छीढोल इ. वाद्यांचा उपयोग केला जातो. हे नृत्य इतर लोकनृत्यापेक्षा लयबद्ध असते. लावणीप्रमाणेच या नृत्याचा प्रयोग मराठी चित्रपटात केला जातो. विविध लोक महोत्सवातून महाराष्ट्राच्यालोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा हा लोकनृत्य प्रकार सादर होत असतो.
धनगरी नृत्य
महाराष्ट्रात धनगर समाज शेळी व मेंढीचे पालन करतो. घोंगडी तयार करणे, लोकर तयार करणे आदी. रोजगाराची साधने या समाज बांधवांची आहेत. श्रमपरिहारासाठी मेंढवाड्यावर अथवा उघड्या माळरानावर जे नृत्य सादर करतात त्याला धनगरी नृत्य असे म्हणतात. या नृत्याला‘गजे ढोल नृत्य’ असेही म्हणतात. हा अत्यंत लोकप्रिनृत्य प्रकार असून महाराष्ट्रातील धनगर समाजासारखाच आंध्रप्रदेश व कर्नाटकातही धनगर समाज गजे ढोल नृत्यसादर करतो. यास थपेटू, गुलू असे म्हणतात.ज्योतिबा, बिरोबा, मायाक्का, भोजलिंग व खंडोबाया महाराष्ट्रातील देवता आहेत. धनगर समाजात कनगर,सनगर, खुटेकर, सुपेकर अशा विविध प्रकारचे समाज बांधव असून या बांधवांनी आपली लोकसंस्कृती कायम ठेवली आहे. सर्व ढोलांचा एकच गजर म्हणजे गजे. यागजेच्या नादध्वनीत हे बांधव एका लयबद्ध पद्धतीने बेधुंद होऊन लोकनृत्य सादर करतात.नवरात्र, दिवाळी, पाडवा, चंपा षष्टी अशा सणांशिवाय १५ ऑगस्ट व २६ जानेवारी अशा राष्ट्रीय सणांत गजे ढोल नृत्य सादर केले जाते. बिरोबाचा जन्म, बिरोबाची आई गंगा सुरावंतीचा जन्म, खंडोबाचा जन्म, खंडोबा बानाईचे लग्न आदी कथा धनगर लोकनृत्यातून सादर करतातडोक्यावर फेटा, धोतर, पांढराशुभ्र अंगरख व घोंगडी अशी वेशभूषा करून वैशिष्ट्यपूर्णगिरक्या घेत नृत्य करतात. हे नृत्य तालाचा व लयबद्ध हालचालींचा ताळमेळ घालत सादर करतात. रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे याजिल्ह्यातील अनेक ठिकाणी हे नृत्य सादर केले जाते. गिरक्या घेताना गोलाकार फिरणारा झगा अंगाभोवती लपेटून नाचणारा, धनगर नर्तक पाहून आपल्याच रमणाऱ्या एखाद्या अवलियाची आठवण होते. ढोल, उफ, झांज अशा वाद्यांचा तालावर एकत्र जमून समूहाने हे नृत्य सादर केले जाते.