कथ्थक नृत्य व मणिपुरी नृत्त्य

0

 
कथ्थक नृत्य व मणिपुरी नृत्त्य

कथ्थक नृत्य व मणिपुरी नृत्त्य

‘कथा कहे सो कथक कहलावे’ कथाकारांच्या परंपरेतून कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकाराची निर्मितीझाली आहे. कथ्थक नृत्य हे मूळचे उत्तर हिन्दुस्थानातील आहे. पण तरीही त्याच्या उत्पत्तीचा अचूक कालखंड अथवा तसा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. पूर्वी मंदिरात सादर होणाऱ्या कथ्थक नृत्याला पुढे राजाश्रयमिळाला आणि हे नृत्य दरबारात सादर केले जाऊ लागले. भारतावर झालेल्या मोगलांच्या आक्रमणानंतर कथ्थक नर्तकांवर असलेले हिंदू राजांचे छत्र नाहीसे झाले आणिमोगल राजवटीने या नृत्यास आपलेसे केले. या संक्रमण काळात या नृत्याचे अनेक पैलू बदलत गेले. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले हे नृत्य राजदरबारात सादर होऊ लागले तेव्हा राजाला भारावून टाकण्यासाठी कलाकारांमध्येस्पर्धा निर्माण झाली आणि यामधूनच या नृत्याचे तांत्रिक अंग म्हणजेच लय, ताल, अभिनय, ठुमरी इत्यादी रचना विकसित झाल्या. कथ्थकमधील चक्कर, पदन्यास अशा वैशिष्ट्यपूर्णअंगाचा विकास होण्यासदेखील दरबार परंपरेचे योगदान आहे. कथ्थकमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील नोमतोमगायकी, तराणा; उपशास्त्रीय संगीतातील सरगम, त्रिवट, होरी, शृंगारिक ठुमरी अशा रचनांचा अंतर्भाव केला जातो. सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैलींनुसार घराण्यांचीनिर्मिती झाली. त्यात मुख्यत: बनारस, जयपूर, लखनौ, रायगढ ही घराणी अंतर्भूत आहेत. 

वेशभूषा : 

मुस्लिम व हिंदू अशा दोन्ही परंपरा लाभल्यामुळे या नृत्याच्या वेशभूषेतही वैविध्य आढळते. त्यामुळे चक्कर उठून दिसण्यासाठी असलेला स्त्रियांसाठी घेरदार घागरा, चोळी, ओढणी तर पुरुषांसाठी कुर्ता, चुणीदार पायजमा, अंगरखा, जाकिट, कशिदा काढलेली टोपी व छपका असा पेहराव करतात. सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैलीनुसार घराण्यांची निर्मिती झाली.कथ्थक नृत्य हे तालप्रधान नृत्य असल्यामुळे यामध्येघुंगरांना महत्त्वपूर्णस्थान आहे. तबल्यातून निघणारे बोल पायातून घुंगरांच्या साहाय्याने बरोबर काढून दाखवणे महत्त्वाचे आहे. कथ्थकमधील भ्रमरीचा (चक्कर) प्रयोग ही मोठी नेत्रसुखद गोष्ट आहे. ती प्रेक्षकांना आकर्षित करते. 


 मणिपुरी नृत्य : (मणिपूर व आसाम) 

मणिपुरी नृत्याची उत्पत्ती मध्ययुगात मंदिरात झाली. आसाममधील मणिपूरमध्येया नृत्यप्रकाराचा अधिक प्रसार झाला असल्याने याला मणिपुरी नृत्य असे नाव पडले असावे. बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेशातही याचा प्रसार आहे हे नृत्य विशेष करून बालिका (लहान मुली) करतात. तथापि स्त्रिया आणि पुरुषांना ते वर्ज्य नाही. मणिपुरी नृत्य म्हणजे एक प्रकारची रासलीला आहे. नर्तक आणि नर्तकी या कृष्ण, राधा, गोपिकांची वेशभूषा करतात. मणिपुरी रास नृत्याचे मुख्य चार प्रकार आहेत.

(१) वसंतरास (२) महारास (३) कुन्जरास  (४) नित्यरास 

श्रीकृष्ण चरित्रावर आधारित असा हा नृत्यप्रकार आहे. राधेचा आत्मसमर्पण भाव, कृष्णाचा वियोग तसेच कृष्ण-राधा शृंगार इत्यादी विषयांवर हे नृत्य सादर केले जाते. यात पादविक्षेप, भ्रूसंचालन, हस्तमुद्रा, अंगहार यांचा शास्त्रीय व काटेकोर पद्धतीने वापर केला जातो. मोहकता आणि नाजूकपणा तसेच डौलदार हालचालींनी युक्त असणारे हे नृत्य म्हणजे ‘लास्य’ अंगाचे वैशिष्ट्यपूर्णप्रदर्शन आहे. 

वेशभूषा : 

वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेसाठी मणिपुरी नृत्यप्रसिद्ध आहे. या नृत्याइतकी आकर्षक आभूषणे आणिवस्त्रे अन्य कोणत्याही नृत्यप्रकारात नसतील. स्त्रिया जो पेहराव करतात त्याला ‘पटलोई’ असे म्हणतात. चमकदार सॅटीनच्या घागऱ्यावर जरीकाम केलेले असते. घेरदार घागरा फुललेला रहावा म्हणून खालून कडकपणा दिेलेलाअसतो. हा कडकपणा बांबूच्या कामट्या गोलाकार बांधून आणतात. या घागऱ्याला ‘कुमिन’ असे म्हणतात.त्यावरून पारदर्शक कापडाची ओढणी घेतात, तेही अशातऱ्हेने की थोडासा चेहरा झाकला जाईल. हात, कान, गळाआभूषणांनी आणि चेहरा रंगभूषेने शृंगारतात. गोपींप्रमाणे श्रीकृष्णाचा शृंगारही आकर्षक असतो. कृष्णाच्या वस्त्रांचारंग जोगिया (भगवा) असतो. अंगात चोळीप्रमाणे बंडी आणि केसावर मोरपिसांचा गुच्छ असणारा मुकुट असतो. कृष्णाच्या कमरेला चांदीचा कमानदार पट्टा असतो.



संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top