भारतरत्न पं.भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
आज आम्ही आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेबाबत माहिती देणार आहोत. या संगीत क्षेत्रातील विशेष शिष्यवृत्तीसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक युवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात.
शिष्यवृत्ती योजनेचा तपशील :
या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १२ असून त्यामध्ये शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेणाऱ्या सहा गायकांना आणि शास्त्रीय वादनाचे शिक्षण घेणाऱ्या सहा वादकांना शिष्यवृत्ती दिल्या जातात.
आवश्यक पात्रता: अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
• मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अथवा गुरूंकडून शिक्षण घेतले असल्यास अशा शिक्षणाच्या कालावधीसह गुरूंचे शिफारसपत्र.
• जे उच्च शिक्षण घ्यायचे आहे, त्यासंबंधीची माहिती, कालावधी व इतर तपशील.
• कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा तपशील. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.
• आपल्या कलागुणांचा समावेश असणारी सीडी.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना तज्ज्ञ समितीतर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीच्या आधारे त्यांची शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा ५००० रु.ची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची अधिकृत जाहिरात पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि सीडीसह असणारे अर्ज पुढील पत्त्यावर पाठवा.
पत्ता : सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय-विस्तार भवन, पहिला मजला, म. गांधी मार्ग, मुंबई-४०००३२.
संगीत क्षेत्रात विशेष शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना लाभदायक ठरू शकते.
संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।
संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन