(धृपद,धामार,ख्याल,ठुमरी,टप्पा)
१) धृपद - हा एक भारदस्त, प्राचीन व शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त असा गीतप्रकार होय. सध्याच्या काळात संस्कृतप्रचुर धृपद उत्तरी संगीतात ऐकावयास मिळणे दुष्प्राप्यच आहे. प्रचारातील बहुतांश पदे हिंदी, ब्रजवा उर्दू भाषेतच आढळतात. धृपदाच्या आरंभाविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र उत्तरेत गेल्या पाच-साडेपाचशे वर्षापासून धृपद लोकप्रिय आहे. याला ऐतिहासिक प्रमाणे आहेत. अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक हे सर्व धूपदीयेच होते. त्या सर्वांत तानसेन हा एक अपूर्व गायकरन होय. वृंदावन येथील स्वामी हरिदास (बाबा हरिदास स्वामी डागुर) यांचा तानसेन हा शिष्योत्तम. स्वतः स्वामीजी तसेच गोपालनायक, बैजू मियाँ तानसेन व चिंतामणी मिश्र यांची धृपदे (रचना) आजही ऐकावयास मिळतात. ११२ व्या शतकाच्या आरंभापर्यंत धृपद गायन अतीव लोकप्रिय होते व आजही ते शुद्ध व आदरणीय मानले जाते. परंतु गेल्या दीड-दोनशे वर्षात ख्यालगायनास प्रतिष्ठा व लोकप्रियता लाभत गेली व घृपदाला उतरती कळालागली. ख्यालापेक्षा धृपद अधिक भारदस्त व व्यापक आहे. स्थायी, अंतरा, संचारी, आभोग असे याचे चार भाग असतात. काही धृपदात पहिले दोनच भाग असत, प्रत्येक भागाचे ३-३, ४-४ चरण असत. धृपद हे हिंदुस्थानचे जोरकस, मर्दानी गायन होय. यात वीर, श्रृंगार, शांत या रसांना प्राधान्य असे व भाषा उच्च दर्जाची असे. चौताल, झंपा, तीव्रा, ब्रह्म, रुद्र इ. तालांत ते गायले जात असे. धृपद गायकास 'कलावंत' म्हणत असत. त्यांच्या भिन्न भिन्न 'वाणी' प्रमाणे खंडार, नोहार, डागुर, गौबरहार अशी नावे होती. धृपदात तानक्रिया नसते. गमकाचे विविध प्रकार, लयकारी, बोलतान इ. प्रकार करून धृपद सादर केले जात असे
२) होरी (धमार) - मुख्यतः धृपदगायक होरी गातात. होरीसाठी धमार या तालाचा वापर केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण गोपीच्या लीलांचे वर्णन हा होरी गीतांचा प्रधान विषय होय. होरीची शब्दरचना उच्च दर्जाची नसते. अर्थवैचित्र्यही सामान्यच असते. धमार तालात गात असल्याने होरीलाच 'धमार' किंवा 'होरी धमार' असेही नामाभिधान आहे. यात ख्यालासारखी तानक्रिया नसते, तर ठाय, दुगुन, चौगुन, बोलतान, गमक इ. प्रकार असतात. हा एक अवघड गीतप्रकार समजला जातो. दमदार बुलंद तरीही मधुर अशा आवाजाप्रमाणेच उच्च दर्जाचे स्वरज्ञान व रागज्ञान होरी गायनासाठी अत्यावश्यक असते. काही ख्यालगायकही होरी गातात. ते मुख्यतः दीपचंदी तालाचा वापर करून त्यात तानबाजीही करतात. उत्तम ख्यालगायक उत्तम होरीही गातो, असे दृश्य दुर्मिळच म्हणावे लागेल. धमार तालात गायली जाणारी होरी ती 'पक्की होरी', तर दीपचंदीतील होरी ही 'कच्ची होरी' अशी धारणा आहे. होरी हा प्रकार उत्तर भारतीय संगीतातील सुगम संगीतात 'होळी' (रंगपंचमी) या सणाच्या उन्हाळ्यातील वातावरणाशी संबंधित आहे. जसे 'असी ना मारो पिचकारी' किवा 'हमरी उमरिया होरी खेलन की' अशा होऱ्या, चैती, कजरी वगैरे प्रकार वर्षाच्या बारा महिन्याच्या वातावरणाशी निगडीत असलेल्या सुंदर कवितांवर आधारित आहेत. या प्रकारांना एकत्रित 'बारमासी' असे नाव आहे. मुळात अध्धा, दीपचंदी या ठेक्यांच्या वापरातून दादरा अथवा केहरव्याच्या लग्गीनाड्याने हे प्रकार खूपच रोमांचकारक बनतात, प्रणयप्रधान, तसेच प्रियकराची आठवण, श्रावणात वा पावसाळ्यातील ढगाळ वातावरणात भासणारा त्याचा दुःखद विरह अशा गीतामधून प्रकट केलेला असतो.
३) ख्याल - 'ख्याल' हा मूळचा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ कल्पना. पूर्वी उच्चभ्रू समाजात आजच्या इतकी ख्यालाला प्रतिष्ठा नव्हती. मोठमोठे गवई या समाजासमोर धृपद गाणेच पसंत करीत असत. जौनपुरचा सुलतान हुसेन शर्की याने सर्वप्रथम ख्यालगायनास लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळवून दिली असे म्हणतात मुघल बादशाह मुहम्मदशाह (इ.स. १७९९ - ९८४०) याच्या दरबारातील सदारंग व अदारंग या दोन गुणी गायकानी ख्यालांच्या हजारो रचना करून आपल्या शिष्यांमार्फत त्यांचा प्रसार केला. आजही या दोघांच्या अनेक रचना सर्वत्र गायल्या जातात. आश्चर्याची गोष्ट अशी की हजारो ख्यालाच्या या रचनाकारांनी आपल्या वंशजांपैकी कुणालाच कधीही ख्याल शिकविला नाही. त्यांचे वंशज धृपदच गात असत. गेल्या दीड- 'दोनशे वर्षांत ख्यालगायनाचा जो प्रसार झाला आहे. त्याचे श्रेय सदारंग अदारंगांच्या शिष्य-प्रशिष्यांना आहे, असेच म्हणावे लागेल ग्वाल्हेरच्या हाँ-हमूख नत्थूखाँ यांचे पूर्वज नत्वन पीरबक्ष आपली गुरूपरंपरा सदारंग अदारंगांची असल्याचे सांगत. मात्र सदारंग- अदारंग या दोघांखेरीजही अनेक उत्तम ख्यालगायक गेल्या दोन-तीनशे वर्षात होऊन गेले व त्यांचे ख्यालही फार प्रसिद्ध आहेत. कब्बालवाणीचे ख्यालीये आपली परंपरा अमीर खुसरोपासून सुरू होते असे सांगतात. सध्या प्रचारात असलेले द्रुत लयीतील ख्याल हे बहुतांशी कव्वालांनी समाजात लोकप्रिय केल्याचे मानले जाते. स्वरलेखनाअभावी जुन्या धृपदांमध्ये जशी काही प्रमाणात मोडतोड झाली आहे, तोच प्रकार ख्यालांच्या बाबतीतही आढळतो. आजच्या काळात धूपद व ख्यालगायन हेच सर्वोच्च व भारदस्त प्रकार मानले जातात. ख्यालात श्रृंगाररसाचा परिपोष अधिक आहे. धृपदासारखे गांभीर्य, बोज, शब्दवैविध्य व शुद्धता ख्यालात अल्पांशानेच असते. ख्यालात अस्ताई व अंतरा असे दोनच भाग असतात. विलंबित तीनताल, एकताल, तिलवाडा, झूमरा, आडाचौताल इ, तालात ख्याल गायले जातात. ख्यालात पदातील लयीच्या करामतीची बंधने नसतात. रागाचे नियम व शुद्धता पाळून कल्पकतेने नावीन्य निर्माण करून संगीतसौंदर्य खुलविणे हे ख्यालात अभिप्रेत आहे. या बाबतीत गायकाला स्वातंत्र्य असते. ख्यालाची गायकी संथ, डौलदार असून आलापीला प्राधान्य असते. आलापदृष्ट्या ख्याल विस्तारक्षम असतो. भिन्न- भिन्न गायनशैलीमुळे ख्याल गायकाची अनेक घराणी निर्माण झाली व घराण्यांच्या वैशिष्ट्यांमुळे गायनकला वैविध्यसमृद्ध तर झालीच, शिवाय पिढ्यानपिढ्या टिकलीही गायकीच्या विविध अंगांचा कौशल्याने प्रयोग करून ख्यालाचे गायन अधिकाधिक रंजक, डौलदार व सौंदर्यपूर्ण केले जाते. उदा. आलाप, बढ़त, गमक, बेहेलावे, बोलताना ताना, सरगम इ. बोल आलाप,
४) ठुमरी - ठुमरी हाही एक दुय्यम गीतप्रकार मानला जातो. ठुमरीचा मुख्य रस श्रृंगार हाच होय. शब्दरचना संक्षिप्त असतो. त्रितालाचाच एक प्रकार असलेल्या 'पंजाबी' या तालात मुख्यतः ठुमरी गायली जाते. टप्प्याप्रमाणेच ठुमरीही सुगम प्रकृतीच्या रागात विशेषत्वाने आढळते. ठुमरीची लय मध्य म्हणता येईल इतकी असते. तुमरीचे गायनही गौण मानले जाते. श्रेष्ठ थोर कलाकार मोठ्या कार्यक्रमात ठुमरी शक्यतो गात नसत. उत्तर भारतातील तवायफसारख्या संगीत व्यावसायिक स्त्रिया प्रामुख्याने तुमच्या गात प्रतिष्ठित समाजाने दुय्यम लेखले असले तरी नि संशय ठुमरी हा एक खूपच लोकप्रिय गीतप्रकार आहे. उत्तम ठुमरीगायन हे अतिशय कौशल्याचे काम आहे. सर्वोत्कृष्ट ठुमरी गायन उत्तर प्रदेशात केले जाते. ठुमरी गाणारे महाराष्ट्रीयन कलाकार अभावानेच आढळतील. लखनौ व बनारस ही ठुमरीसाठी अत्यंत प्रसिद्ध नावे होत. ठुमरीत रागस्वरूपाच्या शुद्धतेला गौण स्थान असते. काही कलाकार रंजकतेसाठी जाणीवपूर्वक अनेक रागांच्या छटा ठुमरीतून आविष्कृत करतात. महाराष्ट्रात ठुमरीसारख्या हलक्याफुलक्या गानप्रकारांचे प्रेम कमीच असून धूपद- ख्यालासारख्या भारदस्त प्रकारांचा आदर व आकर्षण जास्त आहे. राग, त्याचे स्वरूप, शुद्धता, शास्त्र, नियम या बौद्धिक क्षेत्राकडेच महाराष्ट्राची रसिकता प्रकर्षान आकृष्ट झालेली दिसते. काही असो, ठुमरी हा रसिला, मनोरंजक, दिलखेचक व लोकप्रिय प्रकार आहे यात संदेह नाही. ठुमरी प्रामुख्याने दीपचंदी, अध्धा (अर्धीधुमाळी) इ. तालात तसेच केहरवा वगैरे तालांतही गायली जाते.
५) टप्पा- 'टप्पा' हा हिंदी शब्द आहे असे म्हणतात. धृपद व ख्यालापेक्षा टप्पा हा संक्षिप्त व चंचल असा गीतप्रकार आहे. टप्प्याच्या काव्यात शब्दसंख्या अल्प असते, स्थायी व अंतरा असे टप्प्याचे दोन भाग असतात. ख्यालीये जे ताल वापरतात तेच ताल टप्पा गायकही वापरतात टप्पा हा श्रृंगाररसप्रधान असल्याने सुगम प्रकृतीचा मानला जातो. काफी, झिंझोटी, खमाज, पीलू, बरवा, भैरवी अशा दुष्यम दर्जाच्या रागामध्ये टप्पे गायले जातात. अशा रागांमध्ये धूपदाची खानदानी रचना अपवादात्मकच टप्पा गायन शौरीमियाने प्रचलित केले असे म्हणतात. टप्पा मुख्यत पंजाबी भाषेतील शब्दांनी नटलेला असल्याने त्याचे उगमस्थान पंजाब हेच असावे. टप्पा गायनाची शैली वैचित्र्यपूर्ण व धूपद-ख्यालापेक्षा पूर्णत: भिन्न अशी आहे. या गीतप्रकाराची लय अतिचपळ असते. काही विद्वानांच्या मते प्राचीन 'बेसरा' गीतामधून टप्प्याची शैली विकसित झाली असावी. धृपद ख्याल व टप्पा यांची पूर्वी भिन्न घराणी असत. कारण या तिन्ही प्रकारांच्या गायनासाठी भिन्न प्रकारे कंठसाधना करावी लागे. धृपदासारखा वजनदार खानदानी-गंभीर प्रकार गाणाऱ्याला टप्यासारखे चंचल प्रकृतीचे गायन कठीण वाटणारच. अलीकडे मात्र एकच कलाकार धृपद ख्याल-टप्पा-ठुमरी गजल असे सर्व प्रकार सादर करण्याची जिद्द बाळगून असतो व काहींनी या सर्व गानप्रकारांत चांगली सिद्धी प्रसिद्धीही संपादन केली आहे.
श्रृंगाररसप्रधानता हे याचे मुख्य वैशिष्ट्य होय. मुर्की, गमक, मिंड, घसीट इ. अलंकारांनी टप्प्याचे गायन चित्तवेधक केले जाते. 'टप्पा' या स्वतंत्र तालात तसेच पश्तो किंवा पंजाबी, सवारी या तालात टप्पा गायला जातो. गायनातील हा एक अवघड प्रकार आहे राग विस्ताराचा भाग टप्प्यामध्ये दुय्यम असतो. उलट लयीशी तानांची भिन्न-भिन्न प्रकारे चालणारी मनोवेधक क्रीडा यात जास्त अनुभवास येते. तालाची लय विलंबित किंवा मध्य असली तरी टप्प्याचे बोल अतिशय जलद लयीत वरकरणी तालाच्या लवीला फटकून परंतु लयीचे सूक्ष्म अनुसंधान कायम ठेवून म्हटले जातात. त्यामुळे ऐकताना आश्चर्य व चमत्कृती भासमान होते. आता आपण या संगीतप्रकारांबरोबर साथसंगत कशी होते याची माहिती घेऊ. धृपद हा गायनप्रकार पखावजाच्या साथीने सादर केला जातो. विशेषत १२ मात्राचे चक्र म्हणजेच चौताल हा सादरीकरणाचा प्रमुख ताल म्हणता येईल. याचबरोबर झंपा, तीव्रा, ब्रह्म, रुद्र इ. तालांत ध्रुपद गायले जाते. यामध्ये शुद्ध ठेक्याबरोबच ठेकाभरीला खूप वाव आहे. ख्यालाच्या तुलनेत ध्रुपदामध्ये तालवादकाला गायकाच्या बरोबरीने वाजविण्यास मिळते. विशेषत: उपज व बोलबाट 'चालू असताना हे दिसून येते. 'धमार' हा गायनप्रकार घमार या तालात गायला जातो. याच्या संगतीचेही स्वरूप साधारणत असेच आहे. यात तालाच्या विविध पटी, ठेकाभरी / ठेकाप्रस्तार इ. गोष्टींसाठी तालवादकाला वाव आहे. ख्याल हा प्रकार विलंबित व द्रुत ख्यालाच्या माध्यमातून प्रकट होतो. ख्यालाला केवळ ठेके लावणे हेही अतिशय कष्ट साध्य काम आहे. ठेका हा ख्यालाचा प्राण होय. तबलावादकाला वजनदार, भरीव ठेक्याशिवाय बाकी फारसे वाजविण्याची मुभा नाही. गायनाच्या घराण्यांप्रमाणे तबलावादकाला साथसंगतीतही आवश्यक ते बदल करावे लागतात. उदा. स्वरप्रधान गायकीला नेहमी भरीव, वजनदार शुद्ध ठेका हवा. त्याउलट लयप्रधान गायकीला गायकाच्या बरोबरीने वादन हवे. गायकाच्या विचारांना अनुकूल अशी ठेकाभरी हवी. टप्पा हा अतिशय सौंदर्यपूर्ण गायनप्रकार असून तो प्रामुख्याने टप्याच्या ठेक्यामध्ये (१६ मात्रा) गायला जातो. पण टप्प्याचा प्रमुख ठेका 'पश्तो' असे मानतात. या गायनप्रकारातही ठेक्याशिवाय बाकी काही वाजविण्याची फारशी मुभा नसते.
संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।
संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन