संगीतातील लय व रस यांचा संबंध

0

संगीतातील लय व रस यांचा संबंध

संगीतातील लय व रस यांचा संबंध'रस' याचा शब्दशः अर्थ द्रवपदार्थ असा होतो. उदा. एखाद्या फळाचा रस इ. हा रस फळात असतोच पण विशिष्ट प्रक्रियेने तो काढावा लागतो. आपल्या मनातील 'भाव' ही तसाच आहे. या मनातील भावनांचा आपण आस्वाद घेऊ शकत नाही. कारण त्या आपल्या वैयक्तिक भाव-भावनांशी निगडीत असतात. पण ज्यावेळी आपण परक्याच्या आयुष्यातील सुखदुःखे बघतो / आस्वाद घेतो त्यावेळीच रसनिर्मिती होते. ही परकी माणसे आपल्याला नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी इ. मध्ये भेटतात. त्यांच्या सुख-दुःखातून निर्माण होणान्या विविध भावनांनाच शृंगार, करुण, वीर, हास्य, भयानक इ. विविध 'रसा'मध्ये अंतर्भूतकेले आहे..

                      थोडक्यात त्रयस्थपणे आपण परक्याच्या भावनांचा आस्वाद घेतो हा अनुभव पुन्हा पुन्हा घेणे हाच 'रस' होय. प्रामुख्याने रसनिर्मिती नाट्य, साहित्य व संगीतातून होते. संगीतात प्रामुख्याने स्वर, लय, नाद, त्याची जाति, ताल इ. अनेक गोष्टींमधून रसनिर्मिती होते. गायन, वादन व नृत्य यांच्या एकत्रित अविष्कारातून रसनिर्मिती होते. नृत्यातील मुद्राभिनय व कायिक अभिनय यांच्याबरोबर उचित संगीताची जोड मिळाली तर नक्कीच रसनिर्मिती होईल. उदा. कृष्णलीला मधून शृंगार / हास्य, शंकराच्या तांडवमधून वीर इ. रसांची निर्मिती होते, गायन, वादन व नृत्य यांच्या एकत्रित अविष्कारातून जशी रसनिर्मिती होते तशीच या तीनही गोष्टी स्वतंत्रपणे सादर होत असतानाही रसनिर्मिती होते. विविध राग, निरनिराळे भाव अथवा रस प्रकट करतात. उदा. भीमपलास, भैरव हे गंभीर भाव तर तोडी, यमनसारखे राग समर्पणादि भाव निर्माण करतात. असेच तालांबाबतही सांगता येतील. तालांमधून रस निर्माण करण्यामध्ये तालाचे बोल महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी तो ताल किती मात्रांचा आहे हा भाग गौण ठरतो. उदा. आरतीला प्रामुख्याने ६ मात्रांचा ताल वापरला जातो पण हाच ६ मात्रांचा ताल विरह दर्शविणाऱ्या शृंगार दर्शविणाऱ्या भावगीतांनाही वापरला जातो. गंभीर, शांत व करुण रस इ. च्या निर्मितीसाठी खुले बोल असणारे ताल उपयुक्त ठरतात.  कोणते ताल कोणत्या रसांसाठी सहाय्यक ठरतात  त्याचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे-


१) केरवा, दादरा, दिपचंदी - शृंगार, करुण, भक्ति 

२) चौताल, धमार - शांत व करुण रस


यावरून हे लक्षात येते की योग्य वाद्यांवर वाजविलेले विशिष्ट ताल रसनिर्मितीस पूरक ठरतात. लयीचाही रसनिर्मितीमध्ये मोठा सहभाग आहे. लय म्हणजे वेग, गती होय.

याला 'चैतन्य' असेही म्हणता येईल. थोडक्यात जेथे जागृती आहे तेथे लय आहे. लयीच्या अनेक अवस्था आहेत. त्याप्रमाणे वेगवेगळे स्वभाव आहेत. संगीतातील लयीच्या अवस्था वगळून सृष्टीमधील प्रत्येक सजीवात, घटनेत हालचालीमध्ये इतर विविध अवस्थांमध्ये लय अस्तित्वात असते. प्रत्येक सजीवाच्या नाडीचे ठोकेही विविध पण स्थिर वेगात असतात. भारतात त्याचा वापर सुरू व्हायला खूप वर्षे गेली असावीत. साधारण आपल्या स्वातंत्र्याच्या काळाच्या आसपास ध्वनिव्यवस्था भारतात आली असावी. म्हणजेच ख्यालाच्या उगमानंतर जवळजवळ आपल्या स्वातंत्र्यापर्यंत मैफिली ह्या ध्वनिव्यवस्थेशिवाय होत असत. तबला हे संगतीचे वाद्य असल्याने अर्थातच त्याचा आवाज मुख्य गायक/वादक यांच्या तुलनेत कमी असणे अभिप्रेत आहे. पण तबला हे वाद्य मुळातच पुरुषी असल्याने ते मोठ्याने ऐकू येते. त्यामुळे तबलावादकाला हळू आवाजात वाजविण्याबद्दल मुख्य कलाकार सूचना करत असावेत. काही कलाकारांना मैफिलीत आपल्यापेक्षा तबलावादकाला जास्त प्रतिसाद मिळालेला आवडत नसे. त्यामुळे मैफिलीत नेहमी दुय्यम स्थान पत्करायला लागल्यामुळे साथीदार हा दुय्यम दर्जाचा बनत असे. काही वर्षांनी मायक्रोफोन आल्यावर तो केवळ गवयापुरता असे. अर्थातच तबल्याचा आवाज खूप हळू ऐकू येई. त्यामुळे आपोआपच साथीदार दुर्लक्षित बनून राही. आजही आपण जुन्या काळातील काही रेकॉर्डस ऐकल्या तर तबल्याला किती गौण स्थान दिले गेले आहे हे लक्षात येते. यावरून हे लक्षात येते की गायक/वादक व तबलावादक हे दोन्हीही कलाकारच असले तरी साथीदाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे उच्च दर्जाचा तबलावादकही 'साथीदार' या शिक्क्याखाली दुर्लक्षित रहात असे.

अलीकडच्या ७०-८० वर्षांच्या कालावधीत खूप बदल झाले. स्वातंत्र्यानंतर लोक सगळ्याच जाचातून मुक्त झाले. व्यक्तीस्वातंत्र्य मिळाले. कदाचित त्याचाही परिणाम साथीदारांवर झाला असावा, कारण कार्यक्रमांचे प्रमाण, एकूण कालावधी, संधी अशा सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ झाली. भारतभर मुक्त भ्रमण करता येऊ लागले. याचा चांगला परिणाम तबलावादकाच्या मानसिकतेवर होऊन तो उत्साहाने वाजवू लागला असावा.पण स्वातंत्र्योत्तर काळात संगतकाराला संधी जास्त मिळू लागली. रेडिओ, अनेक मोठी संमेलने यामुळे साथीदार पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाला असावा.

नंतरच्या काळात तबला स्वतंत्रवादनाची संगीतप्रेमींमधील रुची वाढत गेली. स्वतंत्र वादनात दिग्गज अशी व्यक्तिमत्त्वे तयार झाली, त्यातील काही व्यक्तिमत्त्वे इतकी महान होती की केवळ तबलजीच नव्हे, तर इतर गायक-वादकही त्या नावांना दबकून असायचे. महाराष्ट्रात संगीत नाटकांची परंपरा मोठी होती. महान नट व गायक बालगंधर्व यांनी दिग्गज तबलावादक उ. अहमदजान थिरकवा यांना आपल्या नाटक कंपनीत सन्मानाने तबलावादकाचे स्थान देऊ केले. त्यांच्या वादनामुळे भारतीय संगीतातील 'संगतकारी'कडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक होऊ लागला. पं. रविशंकरांसारख्या महान सतार वादकाने तबलावादकाच्या प्रतिभाशक्तीला, तयारीला खूपच मोकळीक, मुभा दिली. यामुळे वाद्यसंगीताच्या साथीतही तबलावादकाचे अस्तित्व चांगल्यापैकी जाणवू लागले. अनेक महान तबलावादकांनी आपल्या संगतीमुळे गायन-वादन एका उंचीवर नेऊन ठेवले. पं. चतुरलाल,   पं. सामताप्रसाद, उ. निजामुद्दीन खाँ इ. अनेक दिग्गजांनी तसेच अलीकडे उ. झाकीर हुसेन यांसारख्या उस्तादांनी आपल्या कर्तृत्वाने तबलावादकाला एक उच्च दर्जाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे अलीकडच्या काळात मैफिल/रेकॉर्डिंगमधील तबल्याचा आवाज वाढला, तबलजीला जास्त वाव मिळू लागला. तंतुवादनातील काही नवविचारप्रवाहांमुळे तबलावादकाची बुद्धी व तयारी श्रोत्यांना जाणवू लागली. संगतकाराला मुख्य वादकाच्या बरोबरीने वागवण्यात येऊ लागले. काही गायक तबलजीला खूप स्वातंत्र्य देतात. त्यामुळे गाण्याच्या मैफिलीही तबल्यामुळे जास्तच रंगू लागल्या. पण तबलावादकाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की साथसंगत व सोलो या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्याला हे कळले तोच वादक जास्तीत जास्त यशस्वी होऊ शकतो.संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top