Eye Flue..!
डोळे आले रे..!
(सध्या डोळ्यांची साथ सुरू झाली आहे.)
उपाय :
१) डोळे कोमट पाण्याने वारंवार स्वच्छ धुवा.
२) गाईचे कच्चे दुध डोळ्यात टाका.
३) डोळे, नाक, बेंबीत गाईचे तुप लावा.
४) कापूर जवळ बाळगा. वास घ्या. संसर्ग कमी होतो.
५) गुलाब पाणी टाका.
६) हळदीच्या पाण्यात कपडा भिजवून डोळे बंद करून फिरवा.
७) "A" Vitamins भरपूर असलेले पदार्थ खा.
८) दिवसातून सकाळ-संध्याकाळ ५ / १० मिनीटे हातापायांचे तळवे घासा / प्रेस करा.
९) श्वास रोखून सावकाश डोळ्यांचे रिकाम्या पोटी व्यायाम करा.
१०) काळा गाँगल वापरा.
११) लहान बालकांवर उपचार काळजीपूर्वक करा.
आरोग्य संदेश
डोळे येण्यापूर्वी उपाय करा सुरू,
उगाच त्रासाने हाल नका करू.
👉डोळे येणे' म्हणजे काय?
सध्या अनेक भागांमध्ये डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे सर्व वयोगटातील व्यक्ती प्रामुख्याने मुले या आजाराने त्रस्त आहेत. डोळे येणे म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्यासाठी कोणती उपाययोजना करता येते? या सर्व प्रश्नांचा आढावा आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सगज होऊया.
Q. डोळे येणे म्हणजे काय?
डोळी येणे हा एक डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये डोळ्यातून चिकट स्त्राव घेऊन डोळे लाल होतात.
Q. शास्त्रीय भाषेमध्ये या आजाराला काय म्हणतात?
या आजाराला conjunctivitis / red eyes / sore eyes असे म्हणतात. हा आजार सामान्यतः बॅक्टेरियल किंवा व्हायरल असतो पण सध्या साथीच्या स्वरूपातील हा आजार व्हायरल स्वरूपाचा आहे जो Adenovirus या विषाणूमुळे होतो.
Q. या आजाराची लक्षणे कोणती?
सर्वप्रथम डोळा लाल होऊन डोळ्यातून चिकट स्वरूपाचे पाणी येते. त्यानंतर पापण्यांना सूज येऊन पापण्या विशेषतः सकाळी एकमेकांना चिकटतात. एकूणच डोळ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. स्त्राव जास्त असल्यास क्वचित प्रसंगी भुरकट दिसू शकते.
Q. या आजाराची इतर लक्षणे कोणती?
या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्वचित प्रसंगी ताप येऊ शकतो.
Q. हा आजार कशामुळे पसरतो?
हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे पटापट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांना स्पर्श करून तसेच त्या हाताने दुसऱ्या वस्तूंना स्पर्श केला असता आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तूला स्पर्श करून तसाच हात डोळ्यांना लावल्यास हा आजार त्या दुसऱ्या व्यक्तीस होतो. उदा. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, पेन, टॉवेल, चमचा, गॉगल्स इत्यादी वस्तू वापरल्यास हा आजार बळवतो.
Q. डोळा आलेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
१. डोळा आल्याची लक्षात आल्यास सर्वप्रथम शक्य झाल्यास स्वतःला आयसोलेट करावे.
२. डोळ्यांना स्पर्श करू नये डोळे चोळू नयेत.
३. डोळे पुसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करावा.
४. वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार सुरू करावेत स्वतःच्या मर्जीने मेडिकलमधील ड्रॉप सुरू करू नयेत.
५. हलका ताजा आहार घ्यावा.
६. वारंवार हात धुवत राहणे.
७. आपल्या वस्तू दुसऱ्यांना देऊ नका.
८. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याने डोळे आलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.
९. वाटीत गरम पाणी घेऊन त्यात कापसाचा बोळा भिजवून त्याने डोळ्यांच्या पापण्यांना बाहेरून हलकासा शेक द्यावा.
१०. प्रखर प्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी काळा गॉगल वापरावा.
Q. डोळा येऊ नये म्हणून निरोगी व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी?
डोळ्यांना उगीचच हात लावू नये किंवा डोळे चोळू नये. आजारी माणसाच्या संपर्कात आल्यास ठराविक अंतराने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा यथायोग्य वापर करावा. बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरू नये.
Q. हा आजार कितपत गंभीर आहे?
हा आजार बिलकुल गंभीर नाही. परंतु योग्य काळजी न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास तसेच औषध उपचार न घेतल्यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात व हा आजार गंभीर स्वरूपात निर्माण होतो. यथायोग्य उपचार घेतल्यास हा आजार साधारणतः तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण बरा होतो. याप्रकारे योग्य काळजी घेतल्यास या डोळ्यांच्या समस्येवर आपण मात करू शकतो. वैद्यकीय सल्ल्याने पोटातून ठराविक आयुर्वेद नॅचरल औषधे घेतल्यास हा आजार बरे होण्यास मदत होते.
( वर नमूद केलेले उपचार करण्यापूर्वी आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)