बदलता काळ आणि शास्त्रीय राग संगीत

0


 बदलता काळ आणि शास्त्रीय राग संगीत..!


                   शास्त्रीय संगीतात स्वरांच्या विविध रचना रागाच्या माध्यमातून गायक पेश करतो.  हा एका रागाच्या बाबतीत केलेला प्रयोगच असतो. गवई आपापल्या व कुवतीप्रमाणे, रियाजाप्रमाणे रागाचे सादरीकरण करत असतो. शास्त्रीय संगीताला मानवी भावनांचे कोंदण नसते. ज्याप्रमाणे अमूर्त चित्र असते त्याप्रमाणे , हे रागाचे चित्र गवई आपल्या आवाजाच्या कुंचल्याने काढीत असतो. हे चित्र सर्वच श्रोत्यांना कळेल असे नसते. बरेचसे श्रोते हे राग संगीताबद्दल अनभिज्ञ असतात. ते एक कुतूहल म्हणून मैफिलीला आलेले असतात. श्रोते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गर्दी करतात याचे कारण त्या कलाकाराला मिळालेली प्रसिद्धी. सर्व वर्तमानपत्रातून, दूरदर्शन च्या विविध वाहिन्यांवरून या कलाकारांना प्रसिद्धी मिळत असते. हे वलय जेवढे मोठे तेवढा श्रोतृ वर्ग अधिक असतो. या कलाकारांचे गाणे अथवा वादन ठेवणे हे मोठमोठ्या संस्थांना सुद्धा अभिमानास्पद म्हणजे prestigious. वाटत असते. कारण आपल्या देशात व्यक्ती पूजेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. श्रोते विशेष ज्ञानी नसल्यामुळे गवई काय गातो, कोणता राग कसा पेश करतो याबद्दल त्यांना कळण्याचे काहीच कारण नसते. स्वरांचा आनंद कसा घ्यायचा हे देखील शिकावे लागते. आम्ही अमुक अमुक लोकप्रिय, मोठ्या कलाकाराच्या मैफिलीला गेलो होतो, हे इतरांना सांगण्यात त्यांना एक प्रकारचा अभिमान वाटतो.परंतु स्वरांचा आनंद जवळ जवळ ७० टक्के लोक हे सुगम संगीतातील आणि सिने संगीतातील भावना प्रकटीकरणातून घेत असतात. त्यामुळे शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीताच्या कार्यक्रमांना अलोट गर्दी लोटत असते. शास्त्रीय संगीता चा आनंद घेण्यासाठी हे संगीत थोडेफार तरी शिकावे लागते. आणि समाजातील बरेच लोक त्यापासून दूर राहतात. याचे कारण या संगीताचा, शाळेतून आणि घरातून संस्कार होत नाही.सर्वसाधारण लोकांचा असा समज असतो की शास्त्रीय संगीत (रागसंगीत) एकावेळी  बराच काळ चालते आणि ते समजत नसल्यामुळे त्याचा कंटाळा येतो. शास्त्रीय संगीतात बडा ख्याल आणि छोटा ख्याल असे दोन गायकीचे प्रकार असतात. बडा ख्यालाची लय, म्हणजेच स्पीड, ही अत्यंत संथ असते. आणि या संथगतीत गवई वेगवेगळ्या स्वरचना करीत करीत रागाची एक अमूर्त अशी आकृती तयार करतो. असे छान गायन ऐकणे म्हणजे श्रोत्याला भरपूर वेळ हवा. जीवन शांत हवे असते. जीवनाचा वेग हा त्या लयी प्रमाणे संथ असावा लागत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी जीवनाला असा संथपणा होता. जीवन शांत होते. विज्ञानाची प्रगती विशेष न झाल्याने मोबाईल, टीव्ही अशी साधने नव्हती. नोकरी सुद्धा सकाळी नऊ ते संध्याकाळी सव्वा पाच अशी असायची. डोक्याला जास्त ताण नव्हता. कुटुंब जरी मोठी असली तरी, लहानशा जागेत सुद्धा ती खेळीमेळी ने राहत होती. त्या जीवन पद्धतीला साजेसे असे हे राग संगीत होते. लोकांना निवांतपणा होता. रात्रभर शास्त्रीय संगीत ते आनंदाने ऐकत असत. कारण त्यांना दुसऱ्या दिवशीची विशेष चिंता नसे. आज ही जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. सकाळी नऊला घर सोडणारे अनेक लोक रात्री दहा वाजता घरी येतात. त्यामुळे कुठलेही संगीत ऐकण्यासाठी ते वेळ देऊ शकत नाहीत. जीवनातील मानसिक ताण हा मर्यादेबाहेर वाढला आहे. निराशेने बरेचसे लोक ग्रासले आहेत. लोक सुखाच्या मागे धावत आहेत. परंतु हे सुख मात्र त्यांच्या मिठीत गवसत नाही. खरंतर अशा परिस्थितीत संगीत आपल्याला एक औषध ठरू शकते. परंतु त्यासाठी सुद्धा वेळ देणे आवश्यक ठरते.यासाठी मला वाटते की शास्त्रीय राग संगीताने सुद्धा कात टाकणे जरुरीचे आहे. अत्यंत संथ गतीतील गायन हे थोडे मध्यलयीत  करून ते साधारण २० ते २५ मिनिटात संपविले पाहिजे. छोट्या छोट्या बंदीशी या गाण्यांमध्ये घेतल्या पाहिजेत.सरांनी चतरंग, त्रिवट, सरगम गीते यांचा गाण्यांमध्ये उपयोग करून घेतला पाहिजे.आपल्या गायनात गवयाने भरमसाट तानबाजी करणे हे सुद्धा बऱ्याच लोकांना रुचत नाही. त्यामुळे आपले गाणे गोड कसे होईल याकडे गवयाने जास्त लक्ष पुरविले पाहिजे. गवळ्याने बंदिशेतील शब्द त्यामुळे  लोक त्यांना असलेल्या मर्यादित वेळेमध्ये असे गाणे ऐकू शकतील आणि त्यातून आनंद घेऊ शकतील.त्याचप्रमाणे शाळा, कॉलेजे यातून शास्त्रीय संगीत हे शिकविले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना निदान घरच्या घरी तरी शास्त्रीय रागसंगीत ऐकविले पाहिजे. म्हणजे राग संगीताचा मुलांच्या मनावर एक सुसंस्कार होईल. आणि शास्त्रीय संगीताला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.

                                                                                                                                   - श्री.किरण फाटक


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।


संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top