परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम
१. एका वेळेस एकाने चिडावे.
२. चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल.
३. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी लपवाछपवी नको.
४. घरातील प्रत्येकाला ( लहान मुलांना पण ) मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.
५. आपला नवरा / मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका.
६. Space देणे आणि दिलेल्या Space चा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी आहे.
७. आपल्या कलागुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत ह्याचा विचार करू नका.
८. थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका.
९. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काही तरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका.
१०. बोला, विचार करा, पण सगळं घरात. माहेरच्यांना ह्यात अजिबात ओढू नका कारण त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार.
११.जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.
१२.जीवन हे सुंदर आहे. मी त्याला आणखी सुंदर करणार आहे, हे लक्षात ठेवा सोडून द्यायला शिका.
१३.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. छोट्या छोट्या सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास नकोच.