वजन वाढण्याची कारणे
▶️वजन वाढण्याची कारणे खूप आहेत पण काही मुख्य कारण आहेत ते
▪️जीवनशैली ▪️
आजच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक कष्टांचा अभाव आहे.
▶️सध्या बहुतांश कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची भरपूर कामे करताना, आपोआप व्यायाम होत असे.
▶️जसे जात्यावर दळण काढणे, विहिरीवरून पाणी आणणे, घर सारवणे, उखळ-मुखळ वापरणे, गाड्यांचा वापर नसल्यामुळे भरपूर पायी फिरणे, या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनशैलीचा रोजचा भाग होत्या;
▶️ त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत होती. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अशी कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत.
▶️ त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनीच रोज एक तास व्यायाम करावा. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन नियंत्रणात आणता येईल.
▶️ कामाव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आहे, खाण्यापिण्याच्या सवयींचा.
▶️ हल्ली बाजारातील पदार्थ खाण्याचे, शीतपेये पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
▶️आइस्क्रीम, चॉकलेट हे तर अनेकांकडे फ्रीजमध्ये आणून ठेवलेलेच असते, मग घरातील सगळे केव्हाही हे पदार्थ खाऊ शकतात.
▶️कुठलाही समारंभ असेल, तर किमान वीस-पंचवीस प्रकारचे पदार्थ ठेवले जातात.
▶️ भरपूर बटर किंवा साखर असलेल्या खाद्य पदार्थांचा वापर टाळला पाहिजे
▶️भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पाळले पाहिजे.