संगीतातील घराणी

0

 
संगीतातील घराणे

घराणी संगीतातली


संगीतामध्ये (गायन,वादन,नृत्य) अनेक घराणी असतात. घराणी म्हणजे काय हा प्रश्न संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसमोर असतो.


आज आपण अभ्यासासाठी "गायनातील घराणी" हा विषय निवडला आहे.


घराणे म्हणजे, एक असा रागाचा आकृतीबंध की ज्याला विशिष्ट स्वाद आहे, जाणिव आहे, बंदिशी विशिष्ट घाटणीच्या आहेत ,गायकी एक प्रमाणबद्ध गानक्रियांनी(आलाप,तान,बोल,सरगम) बनली आहे, आणि विशिष्ट तालामध्ये बांधलेला आहे.


गायनात जयपूर(तान), आग्रा(बोल), किराणा(स्वराचा नेमकेपणा), आणि ग्वाल्हेर(आलाप,तान,बोल यांचे प्रमाणबद्ध मिश्रण) अशी मुख्य घराणी आहेत.

शिवाय पतियाळा(चमत्कृती,वेग), दिल्ली, बनारस, रामपुर सहस्वान (खंडमेर पद्धतीने बढत), भेंदिबझार(सरगम), मेवाती (श्रूतियुक्त आलापी) अशी अनेक घराणी आहेत.

घराणी म्हणजे स्वर,तान किंवा बोल अंगातील विषेशिकरण(स्पेशलायझेशन).

 

 हल्ली मेडिकल च्या क्षेत्रात General Surgery, Pediatrics, Obstetrics & Gynecology, Dermatology, Ophthalmology, Orthopedics, ENT (Ear, Nose and Throat), Psychiatry, Anesthesiology etc. There is also Super Specializations which require a further 3-5 years of study in areas such as Plastic Surgery, Neurosurgery, Cardio-thoracic surgery, Conito-urinary surgery, Pediatric Surgery, Gastroenterology, Endocrinology and Clinical Hematology असे स्पेशलायझेशन आहे. पुर्वी एकच डॉक्टर सर्व रोगांवर इलाज करायचे. त्यांना आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो. पण पुढे रोगांची संख्या व गुंतागुंत वाढत गेली व एकेका रोगासाठी वेगवेगळा खोलवर अभ्यास होत गेला. आणि विषेशीकरण निर्माण झाले.


याचप्रमाणे गायनात सुद्धा जेव्हा एखाद्या गानक्रियेत (स्वर,आलाप,तान,बोल, लयकारी) विषेशिकरण केले जाते, तेव्हा घराणे तयार होते. 


 उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या भारतातील विविध भोजन आणि अल्पोपहाराच्या पद्धती व पदार्थ. ही प्रत्येक प्रांतात विशिष्ट प्रकारची असते. बनवण्याचा प्रकार विशिष्ट असतो. महाराष्ट्रात पोहे, उपमा, घावन,वडा पाव हे पदार्थ अल्पोपहारासाठी खाल्ले जातात. तेच जर आपण दक्षिणेकडे गेलो (आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू केरळ) तर इडली, डोसा, उतप्पा, अप्पम असे पदार्थ खाल्ले जातात. हे वेगळे असतात. त्याचा स्वाद वेगळा असतो. तयार करण्याची पद्धतही वेगळी असते.


अल्पोपहाराप्रमाणे प्रत्येक प्रांतातील भोजनात येणारे पदार्थही वेगळे असतात.

दक्षिणेत भात,सांबार,रसम पायासम जास्त खाल्ले जाते तर उत्तरेत तंदुरी रोटी ,पराठा वेगवेगळ्या चटकदार/मसालेदार भाज्या लोकप्रिय आहेत.


आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की हे प्रकार त्या त्या प्रांतातील लोकांच्या प्रकृतीनुसार तिथल्या खाद्य परंपरेनुसार ठरविलेले असतात.


 ग्लोबलायझेशन (जागतिकीकरण) मुळे या सर्व पदार्थांच्या रेसिपी नेटवर उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे सर्व पदार्थ सर्व प्रांतात मिळू लागले. परंतु महाराष्ट्रातील लोकांना उपमा, पोहे, वडापाव हे पदार्थ प्रामुख्याने आवडतात व त्याप्रमाणे ते पदार्थ तिथे मोठ्या प्रमाणावर बनवले जातात.


 संगीतातील घराण्यांच काहीसं असंच आहे. प्रत्येक घराण्याच्या गायकीचा एक विशिष्ट आकृतिबंध अनेक वर्षांच्या अनुभवानंतर, अनेक प्रतिभावंतांच्या प्रयोगानंतर ठरवलेला असतो. त्याबरहुकूम विशिष्ट पद्धतीने गाऊन त्या पद्धतीने आपण राग व राग विस्ताराच्या पद्धतीची निवड करावी लागते. रागाचा विस्तार घराण्याच्या पद्धती प्रमाणे जर झाला, तर त्या घराण्याच्या गायकीची एक विशिष्ट चव आपल्याला चाखायला मिळते. एक विशिष्ठ आकृतीबंधात बंदिस्त अशी रागाची जाणिव मनात तयार होते.


 परंतु आजच्या जमान्यात सर्व प्रकारच्या घराण्याची गायकी आपल्याला नेटवर (युट्युब) वर ऐकायला मिळते. त्यात आपल्याला आवडतं ते ते आपण निवडतो आणि आपल्या गाण्यात समाविष्ट करतो. परंतु हे करताना त्या गाण्याला एक विशिष्ट स्वाद किंवा श्रवणियता आणि आकारबद्धता येते का हा विचार आपण गाताना करतो का ? आपण उपम्याची इडली किंवा इडलीचा उपमा करू नये. दोन पदार्थ एकत्र केले असता त्यातले मूळ पदार्थ कोणते आहेत ते बघितले पाहिजेत. ते चांगल्या पद्धतीने एकत्रित होतील का , हे तपासून पाहिले पाहिजे. मग तो नवा पदार्थ बिघडण्याचाही संभव असेल. कुठलेही पदार्थ जरी आपल्याला आवडत असले तरी ते एकत्र करून खाणे हे कुणालाच पसंत पडणार नाही. यामध्ये इडलित पोहे किंवा डोशामध्ये उपमा घालणं हे संयुक्तिक होणार नाही. तुम्हाला डोसा आवडतो आणि उपमा ही आवडतो. पण ते दोन पदार्थ एकत्र करणं कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक ठरते.


प्रत्येक घराण्यामध्ये मध्ये राग विस्तार विशिष्ठ पद्धतीने करण्यामागचा विचार, विविध गानक्रियांचे(आलाप, तान,बोल) प्रमाण, आवाज लावण्याची पद्धत यांचे मिश्रण करून एक विशिष्ट गाण्याची आकृती अनुभव सिद्ध अशी बनविलेली असते. त्यामागे अनेक प्रतिभावंतांचे विचार, अनुभव, जाणिवा आणि प्रयोगांती केलेले निष्कर्ष असतात.


 जे जे आपल्याला आवडतं ते ते एकत्र करून सादर करणे उचित ठरणार नाही. कारण ख्यालाची विविध अंगे (म्हणजेच बंदिश, आलाप, ताना, बोलआलाप, बोलताना, सरगम, लयकारी), आवाज लावण्याची विशिष्ट पद्धत या सगळ्याचे विशिष्ट प्रमाणामध्ये,आपण केलेले मिश्रण हे कितपत श्रवणीय होते त्याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे ठरते. ते जाणकार श्रोत्यांना कितपत रुचते ते तपासून पाहिले पाहिजे.


कुठलेही मिश्रण हे लोकांना रुचेल असे नाही म्हणून त्यावर अत्यंत विचारपूर्वक प्रयोग करून मगच ते लोकांसमोर सादर करणे सयुक्तिक ठरेल.


निसर्गात आपल्याला अनेक सुंदर सुंदर फुले बघावयास मिळतात. ती आपल्याला आवडतातही. परंतु एका फुलाच्या पाकळ्या काढून त्या दुसऱ्या फुलाला लावणे कितपत योग्य ठरेल याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. या प्रयत्नात आपण दोन्ही फुलांचा नाश करणार आहोत हे कळले पाहिजे.


 वेगवेगळ्या सुंदर फुलांच्या पाकळ्या तोडून, त्या एकत्र लावून, आपण दुसरे एखादे फुल (जे सर्वांना आवडेल) बनवू शकू का याचाही विचार झाला पाहिजे.


एखादा श्रवणीय, सुंदर, सुडौल,नवीन असा रागाचा आकृतीबंध जर आपण आलाप,सरगम बोल आणि तान यांच्या साहाय्याने तयार करीत असू तर तेही एक वेगळे घराणे होईल यात शंका नाही.


आपण जर एखाद्या घराण्याच्या गायकीचे शिक्षण एखाद्या समर्थ गुरूकडून घेत असू, तर ती गायकी समजून घेऊन आत्मसात करावी. गुरूंच्या गाण्याची सहिसही नक्कल करू नये. नव्या बंदिशिंचा शोध घ्यावा. आपल्या गाण्यात घराणेदारपणाबरोबरच आपले व्यक्तित्व आणि स्वतंत्र विचार दिसायला हवेत. म्हणजे ते घराणे विस्तार पावेल व संकुचित रहाणार नाही.


नवी गायकी(घराणी) विकसित करण्यासाठी जन्मजात प्रतिभाशक्ती, स्वरताल ज्ञान, सौंदर्यदृष्टी, रचनाशास्त्राची जाण असावी लागते. ते सामान्य माणसाचे काम नव्हे. त्यासाठी कोणीतरी असामान्य व्यक्ती जन्माला यावी लागते.


                -किरण फाटक


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top