सामर्थ्यवान नकारात्मक गाणी

0

 
Negative-song

सामर्थ्यवान नकारात्मक गाणी


ज्या गाण्यांमुळे आपलं मन उदास होतं, मनात दुःख दाटून येतं, भूतकाळात घडलेले आयुष्यातील मनाविरुद्ध प्रसंग आठवतात, अशी गाणी शक्यतोवर ऐकू नयेत. ही गाणी मोठ मोठ्या गायकांनी गायलेली असल्यामुळे ती गाणी आपल्या मनावर खोलवर ठसतात व विपरीत परिणाम करू शकतात.


सिनेमातली गाणी सिनेमातील कथेप्रमाणे त्यातील काही प्रसंगावर आधारित बेतलेली असतात. ती गाणी त्या प्रसंगाला साजेशी असतात. सिनेमांमध्ये काही गाणी दुःख व्यक्त करणारी आणि त्या त्या प्रसंगानूरूप तयार केलेली असतात. आणि ती गाणी प्रतिभावंत गायक कलावंतांकडून गाऊन घेतलेली असतात. त्यामुळे ती गाणी आपण जर स्वतंत्रपणे ऐकली तर त्या गाण्यांचा आपल्या मनावर विपरीत असा परिणाम होतो आणि आपलं मन दुःखाने भरून येत. आपला उत्साह मावळतो. म्हणून अशी गाणी शक्यतोवर ऐकू नयेत.


निराशा, विरह, ताटातूट, वैफल्य अशा भावना जेव्हा काव्यातून व्यक्त होतात आणि त्या काव्याला जेव्हा सुंदर चालीत बांधले जाते आणि ती चाल जेव्हा प्रतिभावंत आणि गोड गळ्यातून सगुणरूप धारण करते तेव्हा आपल्या मनामध्ये खोलवर रुतून बसते.


परंतु काव्य आणि स्वरबंदिशिपेक्षा त्यातील भावनाच सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम मनावर करते.


हिंदी चित्रपटसृष्टीत अशी भरपूर गाणी आहेत. यातील काव्य, संगीत आणि गायन अतिशय उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे ही गाणी अजरामर आहेत. परंतु ही गाणी ऐकण्यापेक्षा आनंदी, भक्तिरसप्रधान,चित्तवृत्ती फुलवणारी गाणी ऐकली तर नक्कीच आपण दुप्पट जोमाने कामाला लागू.


१) दो दिल टूटे, दो दिल हारे

२) मोरा सुंदर सपना बित गया

३) वक्त ने किया क्या हंसी सितम

४) मोहे भुल गये सावरिया

५) जो हमने दास्ता अपनी सूनाई

६) कहे दो कोई ना करे यंहा प्यार

७) गम उठानेके लिये मैं तो जिये जाऊंगा

८) आपले पहलुमे आकर रो दिये

९) हमसे आया ना गया

१०) जींदगिके सफरमे गुजर जाते है जो मकाम

११) दीलका खिलौना हाये टूट गया

१२) आज मौसम बडा बेईमान है.


 वरील दुःखी गाणी उदाहरणादाखल दिली आहेत. ती ऐकण्यापेक्षा खालील गाणी ऐकावी.


१) बहारो मेरा जीवन भी सवारो

२) बहारो फुल बरसावो

३) गाता रहे मेरा दिल

४) जीवनसे भरी तेरी आंखे

५) जिंदगी इक सफर है सुहाना

६) सुहाना सफर और ये मौसम हंसी

७) आपकी नजरोने समझा प्यार के काबिल

८) मौसम है आशिकाना

९) आज मैं उपर आसमा नीचे

१०) झूम झूम के नाचो आज गावो आज

११) घडी घडी मेरा दिल धडके

१२) आज गावत मन मेरो झुमके.

१३) नैन मिले चैन कहा

१४) छाई बरखा बहार,परे अंगना फुहार 


वरील सकारात्मक आणि आनंदी गाण्यांमुळे मन प्रसन्न होते व एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीर व मनात प्रविष्ट होते. आपल्या कामाचा दर्जा वाढतो. दिवसभर मनात उत्साह भरून रहातो.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top