संगीत क्षेत्रात आपणच आपले गुरू

0

 
Guru-in-music

संगीत क्षेत्रात आपणच आपले गुरू


एखाद्या विषयात शास्त्रशुद्ध रीतीने प्रवेश करण्याची सवय लावली तर त्या विषयातील खोली व व्याप्ती कळून येणे कठीण जात नाही. संगीताचे प्राथमिक ज्ञान घेतल्यावर ( म्हणजे "संगीत विशारद" अथवा तत्सम पदवी घेतल्यावर) पुढे हा विषय आपण स्वतः उत्तम रीतीने शिकू शकतो. यात श्रवण, मनन, चिंतन, आणि विश्लेषणात्मक अभ्यास जरुरीचा असतो.

एकदा सर्व गानक्रिया (आलाप, तान, गमक, लयकारी, बोलालाप, बोलताना,आवाजातील भावानुरूप चढउतार) कशा गळ्यातून काढाव्या हे माहीत झाले, की पुढे उरते ते यांचे गायनातील प्रमाणशीर व सौंदर्यपूर्ण वाटप. हे वाटप खालील मुद्द्यांवर अवलंबून असते.


१) रागस्वभाव

२) बांदिशितील भाव व बंदिशीची बांधणी.


आपल्याला तान खूप तयारीची घेता येते म्हणून सरसकट सर्व रागात व सर्व बंदिशी गाताना भरपूर ताना घेणे हे योग्य नव्हे. बोल आलाप कोणत्या बंदिशीत केले असता गायन रंगेल, तानेचा कुठला प्रकार कोणत्या बंदिशीत वापरला असता ते सुरूप दिसेल, "सरगम" चा वापर किती करावा, यावर विचार, मनन, चिंतन होणे गरजेचे असते.

हे सांगायला कोणी बाहेरचा नक्कीच येणार नाही. हे आपले आपल्यालाच सखोल विचारांती ठरवावे लागेल. म्हणून आपण आपल्यात दडलेल्या "गुरुशी" संवाद साधणे जरुरीचे असते. त्या गुरूला शरण जाऊन त्याच्याकडून ज्ञानप्राप्ती करणे महत्वाचे असते.


एखादा नवीन राग आपल्याला स्वतःचा स्वतः शिकता आला पाहिजे.(अर्थात "संगीत विशारद" झाल्यावर). रागातील स्वर, चलन, स्वरसंगती(Phrases), वादी/संवादी, आंदोलित, कण,स्पर्श स्वर, वक्र स्वर इत्यादी माहिती चार पुस्तके वाचून समजते. शिवाय यूट्यूब वर मोठ्या कलाकारांची त्या रागाची रेकॉर्डिंग उपलब्ध असतातच. ती ऐकून , त्यावर मनन चिंतन व व्यवच्छेदन करून नव्या रागाचा फील(feel) अनुभवता येतो. त्या नव्या रागाच्या चार बंदिशी अभ्यासल्या तर तो राग आपल्यास समजायला काहीच कठीण जात नाही. मग त्या रागात आलापादी गानक्रिया करून त्याचे स्वरूप समजावून घेताना नवीन संशोधनाचा आनंद प्राप्त करून घेता येतो.


रागांचा तुलनात्मक अभ्यास केल्याने सुद्धा रागज्ञान बरेच वाढते. यात समप्राकृतिक (ज्यांचा भाव/प्रकृती सारखी आहे), समस्वराकृतिक (ज्यांचे स्वर सारखे आहेत) आणि समाकृतिक(ज्यांची आकृती सारखी आहे) असे वर्गीकरण करून जर वेगवेगळ्या रागांचा अभ्यास केला तर त्या त्या वर्गातले राग चांगले समजतात. हे सर्व आपणच करायचे असते. 


एखाद्या रागाविषयी चार विद्वानांचे विचार पुस्तकातून शोधून वाचून, जाणून घ्यायचे असतात. त्यावर विचार करून आपले एखाद्या रागाविषयी ठाम असे मत बनवायचे असते. 


गायनासाठी केवळ गोड आवाज लागतो असे बऱ्याच लोकांचे मत असते. परंतु त्या गोड आवाजा बरोबर विश्लेषणात्मक व कुशाग्र बुद्धी, अभ्यास/विचार करण्याची आवड, जिद्द आणि चिकाटी या गुणांचीही आवश्यकता असते हे ध्यानात ठेवावे. 


थोडक्यात काय, तर आपणच आपल्याशी हेतुपूर्ण संवाद साधण्याची सवय ठेवली तर बरेच ज्ञान आपले आपण मिळवू शकतो. लक्षात ठेवा, दुसरा आपल्याला कदाचित फसवू शकेल, आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊ शकेल पण आपण आपल्याला कधीच फसवू शकणार नाही.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top