'भारतीय संगीताची आवश्यकता'
आपल्या मेंदूचे उजवा आणि डावा असे दोन भाग असतात. उजव्या मेंदूचे काम सर्जनशीलता, कला, अंतरज्ञान. डाव्या मेंदूचे काम कारणमिमांसा, निर्णयक्षमता, गणित, शास्त्र, पृथक्करण, भाषा, तर्क, आणि रोजचे पूर्ण रुटीन. फक्त लहानपणीची काही वर्षे आपला उजवा मेंदू काम करतो, नंतर त्याचे हळूहळू काम करणे बंद होते.संगीत ऐकल्यामुळे उजव्या मेंदूतील १७ केंद्रे ऍक्टिव्हेट होतात. संगीतोपचार म्हणजे "उजव्या मेंदूचे अभ्यंगस्नान" संगीत उपचारांमध्ये संगीत हे माध्यम असते. आपल्या शरीरातील एकूण एनर्जी च्या २५ टक्के एनर्जी मेंदूला आवश्यक असते. बाकी शरीरासाठी आपण पौष्टिक आहार घेतो, व्यायाम करतो, परंतु शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी जबाबदार असलेल्या मेंदूसाठी अक्षरशः काहीच करत नाही. संगीत उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपण कमी जास्त प्रमाणात डाव्या मेंदूच्या अधिपत्याखली असतो. संगीतोपचारा मुळे मेंदूच्या उजव्या भागातील केंद्र ऍक्टिव्हेट केली जातात जे खूप जरुरी आहे. म्हणून रोज वीस मिनिटे तरी संगीत ऐकावे. संगीताच्या माध्यमातून ब्रेन प्रोग्रामिंग होते, त्याप्रमाणे भावना बनतात.
संगीताचे फायदे:-
१) संप्रेषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल) सुधारते.
२) स्मरणशक्ती मध्ये वाढ होते. संगीताची मेमरी स्ट्रॉंग आहे, विशिष्ट संगीताच्या साह्याने त्या वेळची परिस्थिती आठवते.
३) एकाग्रता वाढते.
४) रागावर नियंत्रण ठेवता येते.
५) शारीरिक वेदना वर नियंत्रण ठेवता येते.
६) ताण तणावावर नियंत्रण ठेवता येते.
७) स्ट्रेस हार्मोनची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.
वाद्य वाजवताना बोटांच्या हालचाली मेंदूसाठी उत्तम असतात. गाणे म्हणणे का जरुरी आहे - संगीताचा उगम कला म्हणून झाला नसून, भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी झाला आहे.५ टक्के लोक संगीत तयार करतात व ९५ टक्के लोक त्याचा आनंद घेतात. हे कला म्हणून ठीक आहे. आपल्याला लोक नावे ठेवतील ही गोष्ट मनातून काढून टाकून प्रत्येकाने फ्रीली येईल तसे गायले पाहिजे. ओरिजिनल गाणे ऐकून तेच गाणे स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करणे, या प्रयत्नाला आपला मेंदू सर्वात जास्त सकारात्मक प्रतिसाद देतो. मोठ्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, तर लहान मुले व तरुण मंडळी सुध्दा गाण्याचा प्रयत्न करतील व त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच होईल.. पटकन मूड चेंज होण्यासाठी तरुण वयात आपण जी गाणी ऐकत होतो, त्याच पद्धतीची किंवा तीच गाणी ऐकावीत.संगीताचा कोणताही साईड इफेक्ट नाही. संगीत हे मानवासाठी वरदानच आहे.