🛌🏻 दिवसा झोपण्याचा फायदा की तोटा ? आरोग्यावर होतो 'असा' परिणाम..!
🙇🏻♀️ कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसा एक डुलकी मारायला आवडतं. त्यामुळे थकवा जाऊन पुन्हा फ्रेश वाटत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दिवसा झोपल्याने आरोग्याला काही तोटेही होतात.
🥱 दुपारच्या झोपेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, दुपारी झोपावे का, किती वेळ झोपावे, याबाबत जाणून घेऊ या..
🔖 आरोग्यावर होणारा परिणाम..
▪️ दिवसा झोपल्याने रात्रीच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. रात्री चांगली झोप येत नाही.
▪️ दिवसा झोपल्याने स्मरणशक्ती सुधारते, परंतु सतर्कता कमी होत असल्याचे संशोधनातून पुढे आलेय. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्याने शरीर सुस्तावतं.
▪️ आयुर्वेदानुसार, दिवसा झोपल्याने कफ व पित्त दोषात असंतुलन होतं. मात्र, निरोगी लोक उन्हाळ्यात दिवसा झोपू शकतात.
▪️ मधुमेह, लठ्ठपणा असणाऱ्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे वजन वाढणं, ताप, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
⏰ किती वेळ झोपावं?
दुपारी 15 ते 20 मिनिटं झोपणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं. मात्र, त्यासाठी झोपताना अलार्म सेट करा, शांतपणे झोपून ठरलेल्या वेळेत उठावे.
खूप छान 👌
ReplyDelete