आत्महत्या का होतात ?

0

 

आत्महत्या का होतात ?


         आत्महत्येच्या मुळाशी मानवी अहंकार असतो. मी, माझे, मला या शब्दात तो व्यक्त होत असतो. खरं तर माणूस कोणत्याही उपाधिविना अगदी सोज्ज्वळ, साधा असतो. परंतु तो स्वतःला इतरांहून वेगळे दाखविण्याचा प्रयत्नात स्वतःला हरवून बसतो. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात, त्याच्या इतरांकडून अपेक्षा वाढत जातात. मनाविरुद्ध असलेल्या परिस्थितीत त्याची कुचंबणा होते. मग मायेचा खेळ चालू होतो. राग , लोभ , मोह , असूया , काम , दंभ(गर्व) ही सर्व अहंकाराची धारदार शस्त्रे आहेत, वासना आहेत. अहंकाराची वेगवेगळी रूपे आहेत. ही सर्व शस्त्रे नेहमी मानवावर वार करीत असतात. यामुळे मानव कधीच वैश्विक शक्तीशी एकरूप होऊ शकत नाही. यांना सहा रिपु(शत्रू) असेही म्हणतात. यांच्या प्रभावामुळे शांती नष्ट होते. सात्विक भाव रसातळाला जातो. हे शत्रू इतके बलवान आहेत की त्याचा सामना करण्याची ताकद मानवात नाही. मग काय करायचे ? कारण राग येणे,लोभ मोह वाटणे,गर्विष्टपणे बोलणे,कामभावना जागृत होणे या वासना पूर्ण मन व शरीर घुसळून बाहेर येतात व धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे व अतिशय वेगात बाहेर पडतात. या बाणाच्या टोकावर negativity (नकारात्मकता) चे विष लावलेले असते. यामुळे अवतीभोवतीचे वातावरण दूषित , कलुशित होते. ह्या वासना एकदा का मनात जागृत झाल्या की त्या आपले व दुसऱ्याचे नुकसान केल्याशिवाय स्वस्थ रहात नाहीत. "न होता मनासारिखे दुःख मोठे" असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात, तेच खरे. हे शत्रू मनात जागृत झाले की ते दुःखाची,निराशेची विषारी गरळ ओकतात. म्हणून राग , काम , लोभ , मोह , गर्व , असूया ही सर्व दुःखाचीच रूपे आहेत. त्यांना मनात प्रकटू न देणे एवढाच एक उपाय आहे. एकदा ते प्रकटले की मग त्यांच्यावर ताबा मिळवणे फार फार कठीण आहे.


      दुसरे असे की शरीर म्हणजेच 'मी' असे आपण मानतो. ते काही खरे नाही. शरीर हे एक माध्यम आहे. आपण का जन्माला आलो हे जर प्रत्येकाने ओळखले तर आत्महत्या कधीच होणार नाहीत. जगात आणि स्वतःत शांती व सुख निर्माण करण्यासाठी आपण जन्माला येतो. त्यासाठी शरीर स्वस्थ व समर्थ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. पाच ज्ञानेंद्रियांच्या मागे हे सहा शत्रू टपून बसलेले असतात. ज्ञानातून जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर ते खरे ज्ञान. परंतु जर नकारात्मक ऊर्जा ज्ञानातून निर्माण होत असली ते अज्ञानच म्हणावे लागेल. हे अज्ञान राग लोभादी शत्रूंना आमंत्रण देतात व माणसाला नाशाप्रत घेऊन जातात.


       मुळात माणसाला कर्मयोगी असणे फार महत्वाचे आहे. सतत सेवाभावाने , डोके थंड ठेऊन , आनंदाने व प्रामाणिकपणे काम करीत राहिल्याने (व्यस्त राहिल्याने) माणसात नकारात्मक ऊर्जा जन्मच घेणार नाही. कुठल्या कामात आपल्याला आनंद मिळतो हे स्वसंवादातून ओळखून त्याप्रमाणे काम केले तर आयुष्य आनंदमय होते. कामातील यश अपयश यांचा आपल्या कामावर परिणाम होऊ देता कामा नये. कारण ते आपल्या हातात नसते. यश अपयश हे अनेक बाह्य कारणांवर देखील अवलंबून असते. आपण जगात एकमेव अद्वितीय नसतो. एकापेक्षा एक सरस गुणांनी भरलेले लोक असतात. हे आपण जर ध्यानात ठेवले तर अपेक्षाभंग होणार नाही.


        शिवाय सगळेच गुण सगळ्यांच्या वाट्याला येतातच असे नाही. जी गुणवत्ता आपल्या वाट्याला आली तिच्यात भर घालून तिचा कसा चांगला उपयोग करता येईल हे पहिले पाहिजे. म्हणजे दुःख प्राप्त होणार नाही.


       त्याचप्रमाणे कुठलीतरी कला (संगीत,चित्रकला,शिल्पकला) माणसाने शिकून घेतली पाहिजे. त्यातून मानसिक आनंद मिळतो व आयुष्यात विरंगुळा निर्माण होतो. 


       दुःख, वैफल्य टाळण्यासाठी आत्महत्या करणे हे योग्य नव्हे. जगात कुणी कुणाचे नसते. माणूस एकटाच जन्माला येतो व एकटाच मरून जातो. म्हणून कोणाकडून कसली अपेक्षा न केलेली बरी. अपेक्षाभंगाचे दुःख मोठे असते. ते पचविणे तर फारच कठीण. आपला जन्म इतरांसाठी झाला असून इतरांचा जन्म आपल्यासाठी झाला असे समजू नये. मी इतरांच्या उपयोगी पडलो म्हणून इतर माझ्या उपयोगी पडतील,मला मदत करतील असा गोड गैरसमज करून घेऊ नये. 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top