थंडीत अक्रोड खाण्याचे जबरदस्त फायदे, हे आधी कुणी का नाही सांगितलं ? डायबिटीस जवळही येणार नाही...!
अक्रोड हे एक सुपरफूड आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अक्रोडमध्ये प्रचंड प्रमाणात आरोग्यसाठी फायदेशीर ठरणारी तत्तव आढळून येतात. अशात तुम्ही योग्य पद्धतीने अक्रोडचं सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखर तर कंट्रोलमध्ये येईलच सोबतच तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात येऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते अक्रोड शरीरात इन्सुलीन सारखं काम करते. म्हणुनच याला डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल यावरील रामबाण इलाज ठरू शकतो.
अक्रोड भिजवून खाण्याचे फायदे....
तज्ज्ञांच्या मते अक्रोडमध्ये असे काही घटक असतात जे शरीराला पचवण्यास कठीण जातात. मात्र हेच अक्रोड तुम्ही पाण्यात भिजवून खाल्ले, तर मात्र अक्रोड पचण्यास हलका होतो. यामुळे तुमची स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण होण्यास मदत होते. जेव्हा आपल्या पेशी शरीरातील इन्सुलिनचा योग्य पद्धतीने वापर करू शकत नाहीत, तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. शरीरातील या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स बोललं जातं जेव्हा तुम्ही पाण्यात भिजवलेले अक्रोड खाण्यास सुरुवात करतात, तेव्हा शरीरातील इन्सुलिन कंट्रोल करणारे हार्मोन्स वाढतात. एका अभ्यासात असं असं नमूद केलं आहे की, जेव्हा तुम्ही भिजत घातलेले अक्रोड खातात तेव्हा तुमच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. आपल्या शरीरातील पेशी उपलब्ध इन्सुलिन हार्मोन्स योग्य पद्धतीने वापरण्यास सुरुवात करतात.
डायबिटीसचा रामबाण इलाज...
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. यामुळे रक्तात तयार होणारी साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. एका अभ्यासात अक्रोड खाणाऱ्यांना डायबिटीसचा धोका कमी होतो, हे स्पष्ट झालं असल्याचं सांगितलं आहे.
थंडीत अक्रोड का खावेत..?
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. मात्र हे हेल्थी फॅटस थंडीच्या काळात शरीरास सुरक्षा देण्याचं काम करतात. म्हणून थंडीत अक्रोड खाल्याने त्याचा शरीरास फायदा होतो. बँड कोलेस्ट्रॉल होईल कमी आपल्या शरीरातील नसांमध्ये घाण वाढली की, शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते. यामुळेच हार्ट अटॅक, स्ट्रोक याचा धोका वाढतो. मात्र भिजत घातलेल्या अक्रोडमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी केले जाऊ शकतात. हार्वर्ड मेडिकल स्कुलच्या एका अभ्यासानुसार अक्रोडाच्या सेवनाने शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होतं.
अक्रोडमध्ये असतं काय..?
अक्रोडमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन ई कार्बोहायड्रेटस, फायबर, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉलेटसारखी उपयुक्त तत्व आढळून येतात. सोबत यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड भरभरून असतं.
एका दिवसात किती अक्रोड खावे..?
जाणकारांच्या मते रात्री दोन ते चार अक्रोड एक वाटी पाण्यात भिजत घालावे. खाण्याआधी अक्रोड किमान पाच तास तरी भिजत घातलेले असावे. सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपतानाही तुम्ही हे भिजवलेले अक्रोड खाऊ शकता.