🗣️ उचकी थांबत नसल्याने हैराण..? मग 'हे' घरगुती उपाय करुन पाहा..!
🥘 बहुतेक वेळा जेवताना अचानक उचकी लागली, की जवळच्या माणसाने तुमची आठवण काढली असेल, असे म्हटले जाते.. मात्र, उचकी मागे वैज्ञानिक कारणे असल्याचे समोर आले आहे..
😲 उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. शक्यतो मसालेदार पदार्थ खाताना अनेकदा उचकी येते.. 'डायाफ्राम'चे स्नायू अचानक आकुंचन पावतात. त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नसल्याने उचकी लागते. नंतर काही वेळाने उचक्या थांबतात. त्यामुळे जास्त काळजीचे कारण नाही..
🙇🏻♂️ तणावात असताना किंवा खूप उत्साहात असताना वा भरपूर जेवण झाल्यास उचकी येते. लवकरच उचकी न थांबल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपायांनीही उचकी थांबवता येते.. याबाबत जाणून घेऊ या..!
💁🏻♀️ उचकी थांबवण्यासाठी उपाय
▪️ उचकी थांबत नसल्यास थोडा वेळ श्वास रोखून धरा व हळुहळू सोडा. असे काही वेळ केल्यास उचकी थांबू शकते.
▪️ उचकी आल्यावर तुम्ही थंड पाणी पिऊ शकता.
▪️ उचकी थांबवण्यासाठी आरामदायी जागी बसून गुडघे छातीजवळ आणा आणि दोन मिनिटे त्याच स्थितीत राहा.
▪️ सतत उचकी येत असल्यास जीभ बाहेर काढून उचकी थांबवू शकता.
▪️ काही वेळ उचकीवरून लक्ष हटवून इतर गोष्टींवर केंद्रित केल्यास काही वेळेतच उचक्या थांबतात.
👉🏻 टीप : वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.