🧑🏻🦳लहान वयातच केस पांढरे झालेत..?
💇🏼♂️ आजकाल मुलांचे केस अगदी 20 व्या वर्षीच पांढरे होतात. पांढऱ्या केसांची लाज वाटत असल्याने ते लपवण्यासाठी लोक केसांमध्ये हेअर कलर, हेअर प्राॅडक्ट्स वापरतात.
💆🏼♂️ तणाव:
सततच्या ताण-तणावामुळे निद्रानाश, चिंता नि भूक न लागणे अशा समस्या उद्भवातात. त्यामुळे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊन केस गळतात, ते पांढरे होऊ शकतात.
🍔 मसालेदार पदार्थ:
सध्या तरुणांना चमचमीत, मसालेदार पदार्थ आवडतात. विशेषत: मिरची, मीठ आणि आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील पित्त वाढते. गरम चीजच्या अतिसेवनानेही केस पांढरे होऊ लागतात.
🌞 जास्त वेळ सूर्यप्रकाश घेणे:
सूर्याची 'अल्ट्रा व्हायोलेट' किरणे केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठीही हानीकारक असतात. जास्त वेळ उन्हात बसल्याने केस अकाली पांढरे होऊ शकतात.
🍊 'व्हिटॅमिन-सी'ची कमतरता:
'व्हिटॅमिन-सी'च्या कमतरतेमुळे केस गळतात. अकाली पांढरे होतात. 'व्हिटॅमिन सी' असणारे फळे, भाज्या खाल्ल्यास केस पातळ होत नाहीत. केसांचा पोत सुधारतो. खराब झालेले केसही सुधारतात.
💁🏻♂️ केस काळेभोर राहण्यासाठी हा उपाय करा..
आहारात लिंबू, पेरू, पपई, द्राक्ष, संत्री, बेरी, रताळे यांसारखी फळे खावीत. त्यातून शरीराला पुरेसे 'व्हिटॅमिन-सी' मिळते. शिवाय पालक, कोबी, ब्रोकोली, टोमॅटो अशा भाज्या खाणेही फायद्याचे ठरते.