मुतखडा अश्मरी पथरी यात येणाऱ्या उपयोगी वनस्पती
चार प्रकार आहेत.
1) वात पासून
2) पित्त पासून
3) कफ पासून
4) शुक्र पासून (विर्य)
मुतखडा होण्याची कारणे:
कमी पाणी पिणे.
लघवी थांबून धरणे.
जास्त उन्हात काम करताना, शरिरातील पाण्याची पातळी कमी होने.
लघवी आल्यावर कंटाळा करून तीचा त्याग न करने, इच्छा झाल्यावर ती दाबून ठेवणे.
काही विटामिन ची कमतरता.
अती प्रमाणात नायट्रोजन युक्त आहार. (पदार्थांची यादी युट्यूब किंवा गुगल सर्च करून बघु शकता).
माहितीस्तव मुतखड्यात कोणकोणत्या वनस्पती चां उपयोग केला जातो.
मी फक्त वनस्पतींची नावे देणार आहे. उपयोग तुम्ही तुमचा शोधावा.
1) द्राक्ष पान मुतखड्यात वापरतात.
2) शिलाजीत सेवन करतात.
3) कडुलिंब पानांचा.
4) करंज पान.
5) जंगलातील कबूतराची विष्ठा आणि साखर.
6) तांदुळजा भाजी
7) शेवगा झाड मुळ.
8) कोहळा रस आणि जवाखार
9) छोटा गोखरू आणि मध
10) यवक्षार (जवाखार) घृत (कोरफड) एकत्र घेतल्याने.
11) कांदा रस आणि खडीसाखर
12) बकायन (बकाणनिंब) पान रस आणि यवक्षार.
13) डाळींब बिया आणि काबुली चना पीठ
14) दगडी पाला कंबरमोडी कुटकुटी कुडमुडा एकदांडी
15) पानफुटी
16) सफरचंद फळ खाने याने मुतखडा होत नाही.
17) रोज एक मध्यम आकाराचा टोमॅटो मुतखडा होऊ देत नाही.
18) जुने तुप आणि केशर
19) गुळ आणि जवाखार.
20) मुळ्याचा खार आणि शिळे पाणी.
21) आघाडा किडनी स्वच्छ ठेवतो. स्टोन पाडतो की नाही यावर जाणकार सांगतील पण किडनी चे स्वास्थ्य राखतो.
22) पुनर्नवा भाजी किडनी नीट ठेवते.
योगासने:-
भुजंगासन :
किडनी व्यवस्थित ठेवते. चरबी कमी करण्यासाठी, कंबरदुखी, पोटाचे स्नायू बळकट करतो.
सावधानता:
हार्निया, ह्रदय रोग, अल्सर, गर्भवती स्त्री
यांनी करु नये.
थोडक्यात माहिती साठी बाकीचे आसन माहिती संपूर्ण देत नाही. ते तुम्ही योगगुरू बाबा रामदेव यांच्या युट्यूब चैनल वर जाऊन बघुन शकता.
लेख फक्त माहितीस्तव आहे.
उपयोग डाॅक्टर आणि वैद्यकीय सल्ल्याने करावा. वापर कसा करायचा हे सांगण्याचा अधिकार मला नाही, त्यामुळे मी कोणाला काही वापरण्याचा सल्ला देत नाही.