खैर : संपूर्ण माहिती व औषधी उपयोग

0

खैर संपूर्ण माहिती व औषधी उपयोग,detailed information about khair

 खैर : संपूर्ण माहिती व औषधी उपयोग


#मराठी नाव -: खैर

#संस्कृत नाव :-  गायत्रिन् / खदिर

#इंग्लिश नाव -: Black Catechu

#शास्त्रीय नाव -: Acacia catechu


खैर कातासाठी सुप्रसिद्ध असलेला वृक्ष. 


खैर हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष ९-१२ मी. उंच वाढतो. 

फांद्या कोवळेपणी हिरव्या, तर जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. 

काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. 

पाने संयुक्त व पिसांसारखी असून दलांच्या १०-१२ जोड्या असतात. 

फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिशावर येतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात. 

शेंगा पातळ, पिंगट, सरळ, ५-८ सेंमी. लांब व टोकास चोचीसारख्या असतात. त्यात ३-१० बिया असतात.


उपयोग

खैराचे लाकूड अतिशय कठिण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, घाण्याच्या लाटा, होड्या, खांब, तलवारीच्या मुठी इ. कामांस ते उपयुक्त असते. जळणासाठी तसेच कोळशाकरिता ते वापरतात. 

 

काथ बनवण्याची प्रक्रिया

लालसर मध्य काष्ठापासून (काष्ठाच्या बऱ्याच जुन्या, अधिक कठीण व मृत अशा मधील भागापासून) पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थांस कात (काळा कात) म्हणतात. 


औषधी उपयोग

खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात.तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो.

तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे.

 कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात.

कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात.

कुष्ठरोग

खैर/खादीर-लाकडाचे लहान तुकडे करून यंत्रामधून तेल काढा.  नंतर तूप, मध आणि आवळा रस एकत्र करून त्याचे सेवन केल्यास सर्व प्रकारचे कुष्ठरोग दूर होते.

खैरची मुळं, पाने आणि फळं एकत्र करून एक काढा तयार करा आणि त्याबरोबर स्नान करा.  काथाची पेस्ट देखील फायदेशीर आहे.

अतिसार

खैरची थोडीशी पूड २ दिवस घेणे फायदेशीर ठरते.

कान दुखी

काथ पाण्यात उकळवून ते पाणी कानात टाकल्यामुळे कानाचा त्रास संपतो.

दंत रोग

दातेवर मोहरीच्या तेलाने व काथाने मालिश केल्याने दातदुखीमध्ये आराम मिळतो आणि दंत समस्यांपासून मुक्त होते.

खोकला

हळद आणि खडीसाखर बरोबर काथ घेतल्यास तीव्र खोकल्यापासून आराम मिळतो.


विशेष टिप:-

कोणतेही नैसर्गिक उपचार करतांना आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने उपचार करावा.किती प्रमाणात रोग आहे व कीती प्रमाणात औषध घेण्याची गरज आहे हे वैद्यच सांगेल. स्वतःच स्वतःवर उपचार करु नये. नाही तर "करायला गेले काय आणी वर झाले पाय" अशी अवस्था होईल..


खैर वृक्ष पक्षांचा वापर 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -

१)गांधारी, २) होला, ३) माळकवडी, ४) पिठा होला, ५) राखी खाटीक 


पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) फुटकी २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर, ४) पांढरपोट्या निखार किंवा सुंदर निखार.


हिंदू मान्यतेनुसार खैर नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानला जातो. ७ जुन पासुन मृग नक्षत्राची सुरवात होत आहे.


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top