🤓 भजी व भाजी यापलीकडे जाऊन कांद्याचे उपयोग असतात बरं का...!
तीक्ष्ण गंध असणारा कंद ज्याला मुख दूषण असं पर्यायी नाव प्राप्त आहे. शिवाय तोंडाला चव आणणारा म्हणून देखील ओळखला जाणारा कंद प्रकार कांदाविषयी आज माहिती घेऊयात...
पलं रक्षति इति पलांडू अर्थात जो मांस रक्षण करतो तो कांदा होय. शरीरावरील मांस कमी झालेले अशांना, दुर्बलास्य म्हणजे दुर्बलांना खाण्याची इच्छा होते असा, किंबहुना अशा अवस्थेत बल वाढण्यासाठी उपयोगी असा हा कंद प्रकार.
श्यामची आई या पुस्तकात श्यामच्या मोठ्या भावाला असाच साथीचा आजार होऊन गेला होता तेव्हा त्याच्या आईने त्याला गुळात बनवलेला कांदेपाक व त्याचे थकलेले शरीर बरे केले होते.
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये देखील ताप येऊन गेल्यानंतर खूप थकवा दिसतो. अशा अवस्थेत उष्णता की जी मांस, अस्थि धातूपर्यंत मुरते हे मुख्य कारण असते अशावेळी कांद्याचा रस व गुळ युक्त हा कांदेपाक उपयोगी ठरू शकतो.
ह्रदयाची अशक्तता, कोरडा खोकला शुक्र दौर्बल्य, त्रिकअस्थि (माकड हाडाच्या वेदना),प्लेग, त्वचाविकार यामध्ये कांदा रस उपयोगी पडतो.
बेंड/ गळू (तोंड न फुटलेले) यांची अपक्व अवस्था पक्व व्हावी यासाठी कांदा गरम करून पोटीस बांधण्याची पद्धत पुर्वापार चालत आलेली आहे आणि त्यामुळे त्याला पुढे जखमप्रमाणे कर्म करून चिकित्सा करावी.
पांढरा व लाल अशा दोन मुख्य प्रजाती पाहायला मिळतात. त्यातील लाल रंगाचा कांदा आहारात उपयोग केला जातो तर पांढरा कांदा औषधी उपयोगी ठरतो.
सप्त धातूंना स्थिर करणारा, विशेषतः मांस धातूचं बल वाढवणारा असा आहे कांदा.असे म्हटले जाते महाराष्ट्रातील कांदा सर्व भारतात आकाराने मोठा असतो.
ज्या ठिकाणी अवयव स्व स्थानापासून खाली सरकणे अशा तक्रारी असतात अशा विकारात अवयव शैथिल्य कमी करण्यासाठी त्याच्यावरील भागात कांद्याचा रस चोळणे व पोटातून वैद्य सल्ल्याने घेणे.
आजचा तापमान जेव्हा उतरत नसेल तेव्हा जिरेपूड, मध व कांद्याचा रस हा वाताच्या काळातील, वाताच्या अवस्थेतील तापाच्या प्रकारात जास्त उपयोगी ठरतो.
भजी व भाजी यापलीकडे जाऊन कांद्याचे एवढे उपयोग असतात हे आयुर्वेद क्षेत्रात आल्यावर माहित झाले,असो उशिरा झाले तरी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होणे/ माहिती होणे हे महत्त्वाचे.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।