हिंगाचे आश्चर्यकारक फायदे

0

 
हिंगाचे फायदे,benefits og hing

💁‍♂️ सहज उपलब्ध होणाऱ्या हिंगाच्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात!


हजारो कर्म करणारा आणि आत्ताच्या वर्षा ऋतु मध्ये होणाऱ्या वातव्याधीतील प्रधान औषध म्हणून हिंगाकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे आहारातील एक भाग असल्याने सहज उपलब्ध अशा हिंगाविषयी आज माहिती पाहूयात...


हिंगाची डबी उघडण्याआधी हातात घेतल्यानंतरच त्याच्या उग्रपणाची जाणीव होऊ लागते. त्याचे तीक्ष्णत्व व स्निग्ध गुण हे वेगळेपण वेदना कमी करण्यासाठीच्या औषधांमध्ये सर्वोच्च स्थानी घेऊन गेले आहे. जंतुघ्न,भेदन,दीप्त ही पर्यायी नावे त्याचे गुण वर्णन करतात.


पोट दुखीसारख्या वेदना कमी होण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांची आजीने खडा हिंग पाण्यात उगाळून गरम करून नाभीच्या कडेने लेप स्वरूपात लावला असेलच.


अशावेळी हिंगाचा पोटातून वापर चमचाभर तूप आणि कोमट पाण्याबरोबर केल्यास आणखी गुण येतो. अडलेला वायु,मलप्रवृत्ती यांना बाहेर पडण्यास मदत करतो.


हिंग लहान मुलांमधील जंत कमी व्हावेत म्हणून किंवा होऊ नये म्हणून अगदी चिमुटभर पाण्यात टाकून दिल्यास जंतांची खोडच मरते.


आज बरेच जण घरूनच काम करतात बैठे काम त्यात दोन किंवा तीन वेळेस जेवण, शरीराची हालचाली कमी त्यामुळे आतड्यांची हालचाल देखील कमी याचा परिणाम म्हणून खाल्लेले अन्न, मल सुद्धा पुढे सरकत नाही.


अशावेळी हिंगाचा उत्तेजक गुण आतड्यांच्या हालचाली वाढवण्यास मदत करतो त्यामुळे पोटफुगी सारख्या तक्रारी कमी होतात पण पोटाच्या आसन, प्राणायाम यामुळे या तक्रारी कमी होण्यास आणखी मदत मिळते.


हिंगाचे उपयोग श्वास मार्गात देखील तेवढेच प्रभावीपणे दिसून येतात फक्त श्वसन विकारात कच्चा हिंग वापरात यावा तर पचनास संबंधित विकारात भाजलेला हिंग श्रेयस्कर.

 

श्वास मार्गात तीक्ष्ण, जंतुघ्न, कफ छेदन, छातीतील खोकून खोकून होणाऱ्या बरगड्यांच्या वेदना, फुप्फुसे व त्यावरील सूज ही कापूर व हिंग यामुळे नक्की कमी होते. 


कापुराचा गुण हा तात्कालिक कफ विलयन करेपर्यंत मिळतो पुढे जाऊन त्याचे छेदन करण्याचे काम हिंग करतो म्हणून कापूर हिंग यांची जोडगोळी असणारी वटी आजच्या आजारात उपयोगी.


ज्या अवयवाचा आरोग्य सुधारायचे आहे त्या ठिकाणी आपण हिंगाचा बाहेरून लेप लावू शकतो त्यामुळे उत्तेजक गुणाने त्या ठिकाणचा रक्ताचा पुरवठा वाढून त्या भागातील विजातीय दोष बाहेर पडून अवयवांचे आरोग्य सुधारू शकते.


पोस्ट कोविड येणाऱ्या थकव्यात अल्प मात्रेत हिंग जेवणापूर्वी तुपासह घेतल्यास, थकवा दुर्बलता कमी होते, भूक लागते, पचन सुधारते रक्ताचा पुरवठा सर्वांकडे योग्य गुण होऊन शक्ती येते.


थंडी वाजून ताप येणे किंवा विशिष्ट तासानंतर पुन्हा पुन्हा ताप येणे यामध्ये चिमुटभर हिंग मुगाचे वरण किंवा तांदळाच्या पेजबरोबर दिल्यास तापाची खोड मोडते, पित्त प्रकृती नी वैद्य सल्ला घेऊनच हिंग वापर करावा.


👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!


✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top