गुणकारी वनस्पती अडुळसाविषयी...

0

 
अडुळसा औषधी उपयोग,adulsa

गुणकारी वनस्पती अडुळसाविषयी...


आजच्या आजारात गेलेला गंध प्राप्त करून देण्याची ताकत आहे आणि स्वतः देखील सुगंधी आहे अशा वासिका या संस्कृत नावाने ओळखली जाणारी वनस्पती अडुळसाविषयी आज पाहूयात... 


अडुळशाचे पान म्हणजे सर्दी खोकल्याचे औषध यापलीकडे जाऊन त्वचाविकारात याचा लेप लावतात. यामुळे जखमेच्या कडेने येणाऱ्या सुजेमुळे निर्माण झालेल्या संवाही वेदना कमी होण्यास मदत मिळते.


जुनाट जखमांमध्ये कृमी झालेले असतील तर त्यांना मारण्यासाठी अडुळशाच्या पानांचा रस जखमेमध्ये सोडतात, रक्त गामी असल्याने प्रकुपित पित्त ही कमी करण्यास सर्वात पुढे आहे.


महत्त्वाचं कार्यक्षेत्र म्हटलं तर आजच्या आजारात उपयोगी श्वसन संस्था हेच. वासा कफ पातळ करते, सुटू लागतो, श्वास वाहनांचा विस्तार व या सर्वातून घुसमट/ घबराट खोकल्याने होत असते ती कमी होते.


अडूसा व धोत्र्याची पाने एकत्र करून त्याची विडी ओढल्यास श्वास अटॅक शांत होतो.अगदी दमेकरी लोकांच्या वापरात असणाऱ्या पंप प्रमाणे,पण किती वेळा व कसे याचे मार्गदर्शन वैद्यांकडून घ्या.


संसारिक उपयोगाचा वासा या वनस्पतीचे गुण म्हणजे याची पाने पाण्यात टाकून ठेवली तर पाणी खराब होत नाही अर्थात त्यातील कृमी मरून जात असावेत त्यामागे त्याचा जंतुघ्न उपयोग काम करत असावा.


शेतीत याच्या पानाचे खत वापरले तर त्यातून उत्पन्न होणाऱ्या धान्याला कीड लागत नाही या गोष्टीचा वापर सर्व शेतकऱ्यांनी केला तर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइडचा वापर जो होतो तो कमी होईल.


शेतीत याच्या पानाचे खत वापरले तर त्यातून उत्पन्न होणाऱ्या धान्याला कीड लागत नाही या गोष्टीचा वापर सर्व शेतकऱ्यांनी केला तर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइडचा वापर जो होतो तो कमी होईल.


अडुळशाच्या पानात फळे गुंडाळून ठेवली तर सडत देखील नाही. लोकरीच्या कपड्यात किंवा कोणत्याही कपड्यात ही पाने ठेवली तर कपड्याच कसर लागत नाही.


कडुनिंबाचा पाला आपण धान्य साठवून ठेवताना केला वापरतो तसेच सावलीत वाढवलेली अडुळशाची पाने एखाद्या पुरचुंडीत बांधून धान्याच्या गोणी मध्ये ठेवल्यास धान्यरक्षक म्हणून काम करेल.


आजच्या भाषेत म्हटले गेले तर श्वास रोगी व त्याबरोबर असणाऱ्या सर्वप्रकारच्या comorbadities - HTN,DM,CVD कवर करणार हे औषध आहे.


👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!    


✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top