मन:स्वास्थ्य - सुखी जीवनाचं रहस्य
हेकेखोर स्वभाव आणि जुळवून घेणे जमत नसल्याने केदार कुठल्याही नोकरीत स्थिर होत नव्हता . सासऱ्यांच्या ओळखीनं त्याला नामांकित कारखान्यात नोकरी लागली होती . ती पण त्याला टिकवता आली नाही . या गोष्टीचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो नैराश्यात गेला . तीव्रता इतकी वाढली की , तो आक्रमक होऊन घरात वस्तू फेकणे , मारहाण करणे इथंपर्यंत त्याची मजल गेली . त्याची पत्नी नीता हिने आई - वडिलांच्या मदतीने केदारला समुपदेशक मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले . सहा महिन्यांची रजा काढून केदारला गोळ्या देणे , भोजन , प्रेम , आधार , सहानुभूती बहाल करणे याला तिने विशेष प्राधान्य दिले . संपूर्ण लक्ष केदारकडे देऊन त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यात नीताला यश आले . त्याचा वेळ जावा व आत्मविश्वास वाढावा म्हणून एका ओळखीच्या फर्म मालकाकडे नीताने केदारला कामावर ठेवून स्वतःच्या पर्समधून २० हजार रुपये मासिक पगार फर्मच्या मालकातर्फे केदारला द्यावयास लावला . केदार पूर्णतः बरा झाला . आज एका नामांकित कारखान्यात तो पाच आकडी पगार घेत आहे . नीताने केदारशी स्वतःला पूर्णतः जुळवून घेतले म्हणून त्या दोघांचा संसार उभा राहिला . ज्याला जुळवून घेता आलं त्याला सुखी जीवनाचं रहस्य उमगलं . विवेकानंद प्रार्थना करताना म्हणतात , " हे ईश्वरा , या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद दे , जे मी बदलू शकत नाही , त्याच्याशी जुळवून घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण मला दे . ' कुठे जुळवून घ्यायचं आणि काय बदलायचं हे समजण्यासाठी प्रज्ञेची कास धरली पाहिजे . माणसाच्या आयुष्यात चढ - उतार , बॅडपॅच असतात . त्यावेळेस त्याला परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे . जुळवून घेणं ही एक कला आहे .
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।