संगीतातील व्यवसाय संधी
मानवी जीवनातील संगीताच्या उपयुक्ततेसोबत आज संगीत हा करिअरचा एक उत्तम पर्याय ठरला आहे. त्यामुळे यामध्ये कोणकोणत्या करिअर संधी आपल्याला उपलब्ध आहेत ते बघूया. करमणूक उद्योगात झालेली अफाट वाढ लक्षात घेतल्यास संगीतामधील करिअर हा एक आकर्षक पर्याय असल्याचे दिसून येत आहे. प्रतिभा अर्थात आपल्यातील अंगभूत गुण, रुची, कलेप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि खूप परिश्रम करण्याची तयारी असेल तर संगीत क्षेत्रात मोठ्या संधी मिळण्याची हमखास खात्री आहे.
संगीतात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, जॅझ, पॉप, फ्यूजन इत्यादी प्रकार आहेत. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. केवळ गायक, वादक, कलाकार किंवा शिक्षक होण्यापलीकडे या क्षेत्रांत अनेकानेक संधी उपलब्ध आहेत. त्या अशा -
सॅटेलाईट टेलिव्हिजनचे आगमन, संगीत वाहिन्यांची
वाढती लोकप्रियता, रेडिओची शास्त्रीय संगीतासाठी
असलेली स्वतंत्र वाहिनी, यू-ट्यूबसारखे चॅनल, संगीताचे
प्रत्यक्ष होणारे कार्यक्रम, कार्पोरेट प्रायोजकता इत्यादींमुळे
संगीताला एक व्यावसायिक रूप आले आहे. या क्षेत्रात
नाव आणि पैसा मिळवण्यास भरपूर वाव आहे. सॅटेलाईट
टेलिव्हिजन, संगीत वाहिन्यांमध्ये आपल्या प्रतिभेच्या
जोरावर रोजगाराच्या असंख्य संधी मिळू शकतात. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता: सध्या १० + २ तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम, बॅचलर कोर्स, डिप्लोमा कोर्सेस
आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हल कोर्सेस, डॉक्टरेट (पी.एच.डी) सुद्धा करता येते.
संगीत विषयातील पारंपरिक अभ्यासक्रम:
• बी.ए.ला एक विषय म्हणून संगीत घेता येतो.
• बी.ए. (ऑनर्स) संगीत
• बी.ए. (ऑनर्स) संगीत
• बी. आर्टस् (व्हिज्युअल आर्ट/संगीत/नृत्य आणि
नाटक)
• बी. फाईन आर्टस्
• संगीताचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम; सतार, तबला
इत्यादी वाद्यांत पदविका अभ्यासक्रम.
• एम.ए. संगीत
• संगीतातील एम.फिल., डॉक्टरेट (पी.एच.डी)
• रोजगार संधी :
• दूरदर्शनसारख्या दूरचित्रवाणी वाहिन्या.
• आकाशवाणीवर स्टाफ-आर्टिस्ट.
- श्रेणी प्राप्त कलाकार (गायन वादन विषयात)
(बी.श्रेणी, बी. उच्च श्रेणी, अ श्रेणी, अ टॉप ग्रेड
श्रेणी कलाकार)
• दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी खाजगी वाहिन्यांवर
- संगीत निर्देशक
- संगीत रचनाकार
- अरेंजर
- साऊंड इंजिनिअर
- कार्यक्रम निष्पादक (Programme
Producer)
• AIR (All India Radio) सोबतच खाजगी FM
Channel Station
• आकाशवाणीची (शास्त्रीय संगीताची) स्वतंत्र संगीत
वाहिनी
• Production Houses -
• संगीत संशोधन संस्थांमध्ये संगीत संशोधक
• Musicologist
• संगीत कंपन्या
• शैक्षणिक संस्था, कला केंद्र
• संगीत समीक्षक (वर्तमानपत्रे तसेच मासिकांमध्ये)
• संगीत संवाददाता (Music News Reader)
• संगीत दिग्दर्शक (चित्रपट, नाटक)
• पार्श्वसंगीतकार
• पार्श्वगायक
• संगीत पत्रकारिता
• घरी खाजगी संगीत वर्गाचे संचालक
• संगीत शाळा सुरू करणे.
• स्वतंत्र कार्यक्रम करणे. (Performing Artist)
• साथ संगतकार, (शास्त्रीय, सुगम संगीत कार्यक्रमात)
• कीर्तनादी कार्यक्रमात साथसंगत
• विविध जाहिरातींना संगीत देणे
करिअर पर्याय -
• संगीत उद्योगातील संगीतकार (Music Industry)
• गीतकार
• संगीत रचनाकार
• डिस्क जॉकी
• कला व्यवस्थापक
• संगीत सभा आयोजक (concert arranger)
संगीत शिक्षक व कलाकार बनण्याखेरीज वरील पर्याय
उपलब्ध आहेत.
संगीत शिक्षक :
शाळांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक)
महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी,
प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक तसेच विद्यापीठांमध्ये आणि
इतरही संगीत संस्थांमध्ये संगीत अध्यापकांची आवश्यकता
असते.
संगीत, समीक्षक, पत्रकार :
चित्रपटातील किंवा खाजगी अल्बम Live
concert चे समीक्षण करण्यासाठी विविध प्रकाशनांसाठी
कलाकारांच्या मुलाखती, संगीत पुनरावलोकन लिहिण्याचे
कार्य करण्यासाठी नवीन रिलीझ, कलाकारांवर बातम्या
तसेच संगीत क्षेत्रातील (updates) अद्यतने इत्यादी,
संगीत मासिके, वेबसाईटसाठी काम करू शकतात.
संगीत ग्रंथपाल :
रेडिओ, टेलिव्हिजन, मोशन पिक्चर्समध्ये संगीत
ग्रंथपालांसाठी संधी उपलब्ध आहेत.
व्हिडिओ जॉकी-डिस्क जॉकी (डीजे) :
संगीत चॅनेल्सच्या आगमनाने व्हिडिओ जॉकिंग हा
एक रोमांचक करिअर पर्याय बनला आहे.
चित्रपट, टी.व्ही., जाहिरात, ॲनिमेशन या क्षेत्रात
निराळे संगीत संयोजन करून दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे
या क्षेत्रात संगीताचे फार मोठे योगदान आहे. सर्जनशीलता
आणि ग्राहकांच्या मागणीनुसार संगीताचे इफेक्टस देणे
अशा कामांमध्ये सांगीतिक बौद्धिकतेला खूप वाव आहे.
सध्या खाजगी स्टुडिओंची संख्यादेखील वाढत आहे.
संगीत क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याने शिस्तबद्ध
पद्धतीने येथे काम चालते. आपलं कौशल्य, प्रचंड
मेहनतीची तयारी आणि खूप अभ्यासाची इथे गरज आहे.
संगीत क्षेत्रात अफाट करिअर संधी उपलब्ध आहेत.
करिअर म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्रात दीर्घकाळ
राहून नाव आणि पैसा कमवायचा एवढ्यापुरते ते मर्यादित
नव्हे तर आपण निवडलेल्या शाखेतील विषयांचा नीट
अभ्यास करून, कामाचा अनुभव घेतल्याने मला जे
समाधान मिळेल ते म्हणजे करिअर.
कलाशाखेत उत्तम करिअर करणाऱ्यांकडे मात्र
नावीन्याची आवड, खूप कष्ट करण्याची, कलेची साधना
करण्याची वृत्ती आणि तयारी हे गुण असणे आवश्यक
आहे तरच या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडणे शक्य आहे.
संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।
संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
सर मी संगीत विषारी आहे यावर्षी अलंकार प्रथम परीक्षा देतेय पण मी छोटेखानी मैफिल केले आणि क्लास घेते परंतु मला काहीही इन्कम नाहीये तरी मला इन्कमसाठी प्लिज कळवावे
ReplyDelete