अद्वितीय कर्मयोगी श्री आद्य शंकराचार्य

0

अद्वितीय कर्मयोगी श्री आद्य शंकराचार्य
अद्वितीय कर्मयोगी श्री आद्य शंकराचार्य

वैशाख शुद्ध पंचमीला श्री आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांनी अद्वैताचा पुरस्कार सुरू करून भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली. वेदांच्या आधाराने आणि वेदांतसुत्रांच्या पायावर त्यांनी आपले नवीन तत्वज्ञान उपदेशिले. 


आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने भारत खंडाला शंकराचार्यांनी हादरवून सोडले. वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा करत, वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, असे ते म्हणत असत. वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...


● पूर्वायुष्य : केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. आईकडून संन्यास घेण्याबद्दल परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. 


● जगद्गुरु शंकराचार्य: विंध्याद्रीच्या आसपास शंकराचार्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले. त्यानंतर ते काशी येथे गेले. काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद-प्रतिवाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले. धर्मावरील वाद-प्रतिवादात ते जिंकले. त्यामुळे त्यांची महती, कीर्ती अतिशय वाढली. आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले.


● भारतभ्रमण व चार पीठांची स्थापन : आद्य शंकराचार्यांनी दोन ते तीन वेळा संपूर्ण भारत पालथा घातला, असे सांगितले जाते. आपल्या भारतभ्रमणात शंकराचार्यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा चार दिशांना चार पीठांची स्थापना करून शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले. कांचीकामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पीठे स्थापन केली.


● ​एकेश्वरवादावर भर : आद्य शंकराचार्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार करत, त्याचा अधिक पुरस्कार केला. तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय ठेवा, असे ते नेहमी सांगत. चराचरात परमेश्वर सामावलेला असून, त्याचा आदर करायला हवा, अशी त्यांची शिकवण असे. त्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. 


आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला.


👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!   

अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top