सध्याच्या काळात गुणकारी हुलगे आहारात असू द्या!
सध्याच्या काळात रूग्णांना उपयोगी कुळीथ (हुलगे) सूप/माडग यांविषयी जाणून घेऊयात...
हुलगे हे कृमींचा नाश करणारे आहेत. तापामध्ये सूप करून द्यायला सांगितले आहे. यामुळे घाम तर येतोच शिवाय अंगदुखी सुद्धा कमी होते
खोकल्यातील चिकट, तार सुटणारा, श्वास मार्गाला आतून आलिप्त करणारा, बंद करणारा त्यातूनच ऑक्सीजन सॅच्युरेशन कमी करण्यास कारण ठरणारा कफ छेदून, भेदून बाहेर काढणारे हुलग्याचे कढण आहे.
आत्तापर्यंत हुलग्याचे कढण बनवायचे कसे? प्रथम हुलगे भाजून घ्यावेत, नंतर त्याचे मिक्सरवर पीठ करून घ्यावे.पिठाच्या चार पट पाणी घ्यावे
तीन भाग पाणी मोठ्या पातेल्यात टाकून त्यात तांदळाची कणी किंवा तांदूळ उकळण्यास ठेवावे तोपर्यंत पीठ व उरलेले एक भाग पाणी यांची चांगली घट्ट पेस्ट बनवावी.
पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची उत्तम गृहिणी काळजी घेतेच. साधारणता तांदळाची भाकरी शिजत आल्यावर तयार केलेली पेस्ट त्यात टाकून ढवळत राहावे.
सर्व एकजीव झाल्यावर वेलची, सुंठ, मीठ ,हिंग, मिरी, दालचिनी, लसुन चवीनुसार टाकावे. काहीजण या मसाल्याच्या द्रव्यांची तेलात फोडणी देतात.
हिंग वापरताना येथे आठवणीने न भाजलेला खडा हिंग वापरावा कारण श्वास मार्गावर कफ वितळण्याचे काम कच्चा हिंग जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. भाजलेला पोटाच्या विकारात वापरावा.
लहान मुलांना देताना उकळताना किसलेला गुळ टाकून असे हुलग्याचे सूप देता येऊ शकते.अशाच प्रकारे अग्नि भूक चांगली असणाऱ्यांना बल वाढाव म्हणून उडीदाचा हुलगे ऐवजी वापर करता येतो.
वारंवार होणारी सर्दी, तसेच सर्दी जास्त काळ राहिल्यामुळे येणारा कफाचा दुर्गंध (पिनस) यामध्ये हुलग्याचे कुळीथाचे कढण उत्तम उपयोगी पडते.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
अपने संगीतप्रेमी दोस्तों में लेख शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।
Most useful
ReplyDelete