घसादुखीचे कारणे व उपाय

0

 

घसादुखीवर उपाय


घसादुखीवर नेमके काय करता येऊ शकते? जाणून घ्या.


कोरोना काळातील घसा दुखणे या त्रासाविषयी माहिती पाहुयात. तसेच यामध्ये नेमके काय करता येऊ शकते यावर चर्चा करूयात... 


कोणताही व्याधी होण्यापूर्वी त्याची काही पूर्वरूपे शरीरात दिसत असतात. त्यापैकी हे एक अन्न (मुख) व श्वास (नाक) मार्गातून आलेली कोणतीही गोष्ट घशाच्या ठिकाणी प्रथम स्थिरावते.


जिवाणू किंवा विषाणूंची होणारी पहिली लढाई नाकात तर दुसरी ही घसा या खिंडीतच. त्यामुळे घशाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण बाहेरील पाम तेलात तळलेले पदार्थ, डालडा युक्त बिस्किट, बेकरीचे पदार्थ, पनीर,आईस्क्रीम, चॉकलेट्स हे बंद करणे गरजेचे आहे.


वरीलपैकी एखादा पदार्थ खाण्यात आला की, त्यातील चिकटा विशेषता वनस्पती तूप बेस असणारे पदार्थ खाल्ल्यानंतर घशाला एक खव- खव, टोचल्यासारख्या वेदना व त्यातून गिळताना त्रास ही लक्षणे निर्माण होतात.


आपण ज्याला ढास म्हणतो ती याच ठिकाणाहून निघते, कधीकधी पडजीभ (टाळू पडणे)अ से सुद्धा कारण असल्यास ढास उत्पन्न होऊ शकते अशा ठिकाणी मात्र पडजीभ (टाळू स्थिर करणे) गरजेचे असते.


पूर्वीची मोठी माणसं त्या ठिकाणी लसूण ठेचून तो अशा टाळूला लावून त्या टाळूला कफस्राव करण्यास भाग पाडायची व त्यातून उबळ थांबायची करतात अर्थात कुठे हा प्रयोग उपयोगी पडेल याचा सल्ला वैद्याकडून घ्यावा.


डोक्यातील टाळू न भरलेल्या अगदी लहान वर्षाच्या आतील मुलांना अशी उबळ सतत चालू राहिली तर चिंचोका पाण्यात उगाळून त्याचा लेप पूर्वीच्या आजी केसांमध्ये टाळू न भरलेल्या ठिकाणी लावायची. याने पडजीभ लेप वाळल्यावर उचलली जायची नि उबळ थांबायची.पण असे उपाय वैद्य सल्ला घेऊनच करा.


सर्वकाही टाळून सुद्धा घशाची खवखव सुरू झालीच तर त्रिफळा सारखं सर्वात मोठं रसायन आहेच. त्याजोडीला जेष्ठमधसारखं कंठ या अवयवाला बळ देणार औषधी गुळण्या कराव्यात.


बरेचदा रुग्ण फक्त मीठ घेऊन गुळण्या करताना पाहिले आहेत कधीकधी घशात जखमा झालेल्या असतील तर फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो.


👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!    


अपने संगीतप्रेमी दोस्तों में लेख शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज संगीत जगत को लाइक करिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top