अंगदुखी कमी व्हावी, होऊच नये यासाठी काय करावे? वाचा!
आजच्या आजारात प्राधान्याने दिसणारे लक्षण म्हणजे अंगदुखी. अर्थात एवढे असले तरी व्याधी निश्चयसाठी पुरेसे आहेत चला तर पाहुयात अंगमर्द/ अंगसाद/ अंगदुखी विषयी...
अंगदुखी हे बऱ्याच व्याधींचे लक्षण असले तरी याचे मुख्य कारण आम निर्मिती/ अजीर्ण/ न पचलेला भाग शरीरात पडून राहणे हेच होय. पुन्हा मागे जाऊन विचार केला तर याचे कारण अग्नीचा/ भुकेचा विचार न करता केलेले आहारसेवन.
अग्नीचे रक्षण म्हणजेच आम निर्मितीची शक्यता कमी आणि आमातून उत्पन्न आळस, तंद्रा, तोंडाला पाणी सुटणे, अंगदुखी पुढे जाऊन ताप येणे व डोळ्यापुढे अंधारी येणे ही लक्षणे उद्भवत नाहीत.
बऱ्याचशा रुग्णांमध्ये वरचेवर अंगदुखी हे लक्षण निर्माण होत असते. तेव्हा काहीतरी वेदनाशामक घेऊन ती कमी केली जाते. पण पुन्हा असे लक्षण आणखी तीव्रतेने येण्याची शक्यता असते.
अशा ठिकाणी घाम आणणारी व अग्नीचे रक्षण करणारी औषध वेळीच वापरली तर दोष खोलवर जात नाही व कायमस्वरूपी उपशय मिळण्यास मदत होते.
अंगदुखी कमी व्हावी, होऊच नये यासाठी प्रमाणात (भूकनुसार) जेवण करणे, सुंठी सारखे आहार द्रव्य नित्य आहारात ठेवणे, जिरे, बडीशेप, ओवा हीसुद्धा अग्नीला वाढवणारी त्याचं रक्षण करणारी द्रव्ये आहारात नित्य असावीत.
सर्वसामान्य आजारातील अशक्ततेत व प्रसूतीनंतर अंगदुखी, अशक्तपणा पचन व श्वास मार्गातील तक्रारी होऊ नये म्हणून सौभाग्य सुंठी किंवा सुंठवडा देण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे.
सुंठीवाचून खोकला व वात जात नाही. उगीचच पूर्वीचे लोक म्हणत नव्हते. सुंठ अंगदुखी सारखे त्रास होऊ नये म्हणून तूप कोमट पाण्यासह अनेशा घेऊ शकतो किंवा व्याधिनुसार खडीसाखर, तूप, मध किंवा गुळ यासह घेऊ शकतो.
व्याधी जेवढा जुना तेवढा सुंठेचा उपयोग जास्त (आजार सुटावा म्हणून सूट) तर जेवढा नवीन तेवढा अद्रक/ आल्याचा रस (दुखणं आलं की आलं वापराव) वापर अशी प्रथा जुन्या लोकांच्या औषधी वापराची होती.
आयुर्वेदानुसार विचार करताना आल्यापासून सुंठी बनवताना त्यावर अग्नी व काल यांचा परिणाम जास्त झाल्याने जुनाट अंगदुखी, वातविकार खोकला यामध्ये सुंठ जास्त उपयोगी सिद्ध होते.
सुंठ घेताना वैद्य सल्ला घेऊन पाण्यात काढा करून, दुधात शिजवून किंवा वेदना, अंगदुखीमध्ये जास्त वेदना/ सूज असलेल्या ठिकाणी पाण्यात/ दुधात शिजवून लेप सुद्धा लावता येते.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
अपने संगीतप्रेमी दोस्तों में लेख शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।