बदलत्या संगीत मैफिली

0

संगीत-मैफिली

बदलत्या संगीत मैफिली 

            पुरातनकाळाचा विचार केला, तर पुरातनकाळापासून संगीत मैफलीचा उल्लेख आढळतो. इंद्र देवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या दरबारात नृत्यांगना आपले नृत्य सादर करीत. त्यांना गायक आणि वादकमंडळो साथ करत. भगवान शंकराला प्रसत्र करण्यासाठी श्री गणेश नृत्य करीत आहेत, असेही वर्णन आपल्याला आढळते.

राजदरबार मैफल

             त्यानंतरच्या काळात ऐतिहासिक कथांमध्ये राजांच्या राजदरबारी राजाला खुश करण्यासाठी, तसेच राजदरबारातील मंडळींना खुश करण्यासाठी राजगायकांच्या मैफलीचे आयोजन केले जात असे. गुरुकुल आणि जलसा याच काळात भारतीय संगीतात अनेक महान गुरू आपल्या गुरुकुलांमध्ये शिष्यांना घडवीत होते आणि या गुरुकुलांचे जलसे गावोगावी होत असत. या जलशांमध्ये मान्यवर गुरू आणि त्यांचे शिष्य आपले गायन, वादन सादर करीत. ज्यामुळे सांगीतिक विचारांची देवाणघेवाण व चर्चा होत असे.


घरगुती बैठक

              पुढील काळात या जलाशयाची जागा भारतीय संगीताच्या बैठकांनी घेतली. भारतातले विविध प्रादेशिक सण, तसेच दिवाळी, दसरा, रामनवमी, गुढीपाडवा, होळी याप्रसंगी घरगुती बैठकांचे आयोजन केले जाई. ज्यामध्ये गायक, वादकांना आमंत्रित करून जाणकार रसिक श्रोत्यांना निमंत्रित करून संगीताचा आनंद घेतला जाई.संगीत महोत्सव संमेलन यानंतरचा काळ म्हणजे साधारण १९६०-७० च्या दशकानंतर मात्र संगीत मैफलींच्या स्वरूपात आमूलाग्र बदल आढळतात. या काळात वरील सर्व मैफलींची जागा संगीत महोत्सवांनी घेतली. ज्यामध्ये अनेक गायक, वादकांना आपली कला पेश करण्यासाठी आमंत्रित केल जाऊ लागले. हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक हे सादरीकरण पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जमू लागले आणि मैफल या संज्ञेचा कायापालट झाला.

              वरील प्रत्येक कालखंडातील मैफलींच्या स्वरूपावर प्रकाश टाकल्यास शहरातील सांस्कृतिक वातावरण आणि नाशिकमध्ये होणाऱ्या मैफलींचा विचार करता येईल. नाशिक मुळात धार्मिक स्थळ, श्री रामाच्या पदस्पशनिझालेली भूमी. त्यामुळे येथील सांस्कृतिक संगीत मैफलींमध्ये कायम सात्विकतेचा, धार्मिकतेचा सुगंध जाणवतो. उदा: गेल्या किमान दीडशे वर्षांहून अधिक काळापासून काळाराम मंदिरात आयोजित केला जाणारा वासंतिक नवरात्रोत्सव, पिंपळपारावार पाडवा पहाट, कापड पेठेतील होणारी बालाजी मंदिरात होणारा ब्रह्मोत्सव, गेल्या १३५ वर्षांपासून मेन रोडवरील गणपती मंदिरात आयोजित होणारा माघी गणेशोत्सव, भाद्रपद गणेशोत्सव ज्यात अगदी बुजुर्ग कलाकारांपासून ते अगदी आताच्या युवा कलाकारांनी सादरीकरण केले आहे आणि हे नाशिकमधील भारतीय बैठकीचे उत्तम उदाहरण म्हणून घेता येईल. पुराण काळ, राजांच्या राजवटीचा काळ, गुरुकुल पद्धतीचा काळ या सगळ्या कालखंडामध्ये एक मैफल घडून येण्यासाठी लागणारे तिन्ही महत्त्वाचे घटक म्हणजे आयोजक, कलाकार आणि रसिक, त्या-त्या काळातल्या जीवनशैलीप्रमाणे मिळणारा वेळ, रसग्रहण करण्यासाठी मिळणारी शांतता आणि त्या काळातील एकूणच सामाजिक जीवन, हे आजच्या तुलनेत स्थिर असल्याने मैफली या परिपूर्ण होण्याची शक्यता जास्त होती. मात्र इथून पुढच्या काळात कलाकार आणि रसिकांना मिळणार वेळ, धकाधकीचे जीवन एकूणच सामाजिक बदलते स्वरूप, यामुळे मैफलींच्या आयोजनावर होणारा थोडाफार बदल आणि परिणाम दिसून येतो. नाशिकमध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांच्या कालखंडात सुरू झालेली गुरुकुले यामध्ये पवार तबला अकादमी, आदितालअकादमी, कीर्ती कलामंदिर, तसेच कलाश्री संगीत गुरुकुल ही गुरुकुले अनेक महोत्सव आणि उपक्रमांचे आयोजन करून भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसाराचे उत्तम कार्य करीत आहेत. भानुदास पवार पुण्यतिथी समारोह, तबला चिल्ला, श्यामरंग महोत्सव, स्वराधिराज भीमसेन महोत्सव, पं. गोपीकृष्ण महोत्सव, कुर्तकोटी संगीत महोत्सव हे सगळे महोत्सव दर वर्षों रसिकांच्या तुडुंब गर्दीने फुलले असतात. यामुळे इतर कुठल्याही शहरात होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफली महोत्सवाच्या तुलनेत नाशिकचा रसिक हा अधिक दर्दी आणि कानसेन असल्याचे जाणवते. शहरात असलेली धार्मिक, सात्विक वृत्ती आणि कलाकरांमध्ये असलेली एकोप्याची भावना यांचे प्रतिबिंब आहे, असे म्हणता येईल. 

              संगीत महोत्सवाच्या आजच्या युगात संगीताचा प्रचार आणि प्रसार करणे याच हेतूने महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये संगीत न शिकलेल्या सामान्य श्रोत्यालाही संगीताची आवड निर्माण व्हावी, त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी महोत्सव भरवले जाऊ लागले आहेत. शास्त्र आणि मनोरंजन हे एकाच ठिकाणी अंतर्भूत होणे अवघड असल्याने सामान्य श्रोत्याला आवडतील असेच राग, त्यात रंजक आलापी, सरगमचा अतिरिक्त वापर, जलदगतीच्या ताना हे सगळे लोकाग्रहास्तव होणारे बदल आढळून येतात. काळ जसा पुढे गेला तसा रसिक श्रोत्यांचे रूपांतर हे रसिक प्रेक्षक म्हणून होत गेल्याचे आपण बघतो. गाण श्रवणीय तर असावे; पण प्रेक्षणीय असावे, या श्रोतृवर्गाच्या मानसिकतेतील झालेला मोठा बदल आपण नोंदवायला हवा. नाशिकच्या मैफलीचे बदलते स्वरूप बघताना आपण भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवासच बघत आहोत. हे स्वरूप कितीही बदलले तरी भारतीय संगीताचा गाभा म्हणजे आत्मरंजन, आत्मरंजन झाले, की 'हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी झाले...' असे आपोआप होत जाते.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top