ख्याल गायन व ठुमरी गायन
ख्याल
'ख्याल' हा मूळचा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ कल्पना. पूर्वी उच्चभ्रू समाजात आजच्या इतकी ख्यालाला प्रतिष्ठा नव्हती. मोठमोठे गवई या समाजासमोर धृपद गाणेच पसंत करीत असत. जौनपुरचा सुलतान हुसेन शर्की याने सर्वप्रथम ख्यालगायनास लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळवून दिली असे म्हणतात. मुघल बादशाह मुहम्मदशाह (इ.स. १७९९ १८४०) याच्या दरबारातील सदारंग व अदारंग या दोन गुणी गायकांनी ख्यालांच्या हजारो रचना करून आपल्या शिष्यामार्फत त्यांचा प्रसार केला. आजही या दोघांच्या अनेक रचना सर्वत्र गायल्या जातात. आश्चर्याची गोष्ट अशी की हजारो ख्यालांच्या या रचनाकारांनी आपल्या वंशजापैकी कुणालाच कधीही ख्याल शिकविला नाही. त्यांचे वंशज धृपदच गात असत. गेल्या दीड- दोनशे वर्षांत ख्यालगायनाचा जो प्रसार झाला आहे. त्याचे श्रेय सदारंग-अदारंगांच्या शिष्य प्रशिष्यांना आहे, असेच म्हणावे लागेल ग्वाल्हेरच्या हद्दूखाँ-हस्सूखाँ, नत्थूखाँ यांचे पूर्वज नत्थन पीरबक्ष आपली गुरूपरंपरा सदारंग अदारंगाची असल्याचे सांगत. मात्र सदारंग अदारंग या दोघांखेरीजही अनेक उत्तम ख्यालगायक गेल्या दोन-तीनशे वर्षांत होऊन गेले व त्यांचे ख्यालही फार प्रसिद्ध आहेत.
कव्वालवाणीचे ख्यालीये आपली परंपरा अमीर खुसरोपासून सुरू होते असे सांगतात. सध्या प्रचारात असलेले द्रुत लयीतील ख्याल हे बहुतांशी कव्वालांनीच समाजात लोकप्रिय केल्याचे मानले जाते. स्वरलेखनाअभावी जुन्या धृपदांमध्ये जशी काही प्रमाणात मोडतोड झाली आहे, तोच प्रकार ख्यालांच्या बाबतीतही आढळतो. आजच्या काळात ध्रुपद व ख्यालगायन हेच सर्वोच्च व भारदस्त प्रकार मानले जातात. ख्यालात श्रृंगाररसाचा परिपोष अधिक आहे. धृपदासारखे गांभीर्य, बोज, शब्दवैविध्य व शुद्धता ख्यालात अल्पांशानेच असते. ख्यालात अस्थाई व अंतरा असे दोनच भाग असतात. विलंबित तीनताल, एकताल, तिलवाडा, झूमरा, आडाचौताल इ. तालांत ख्याल गायले जातात. ख्यालात धृपदातील लयीच्या करामतीची बंधने नसतात. रागाचे यम-नियम व शुद्धता पाळून कल्पकतेने नावीन्य निर्माण करून संगीतसौंदर्य खुलविणे हे ख्यालात अभिप्रेत आहे. या बाबतीत गायकाला स्वातंत्र्य असते ख्यालाची गायकी संघ, डौलदार असून आलापीला प्राधान्य असते आलापदृष्ट्या ख्याल विस्तारक्षम असतो. भिन्न- भिन्न गायनशैलींमुळे ख्याल गायकांची अनेक घराणी निर्माण झाली व घराण्याच्या वैशिष्ट्यामुळे गायनकला वैविध्यसमृद्ध तर झालीच, शिवाय पिढ्यानपिढ्या टिकलीही. गायकीच्या विविध अंगांचा कौशल्याने प्रयोग करून ख्यालाचे गायन अधिकाधिक रंजक, डौलदार व सौंदर्यपूर्ण केले जाते उदा. आलाप, बोल आलाप. बढ़त, गमक, बेहेलावे, बोलताना ताना, सरगम इ
ठुमरी
ठुमरी हाही एक दुय्यम गीतप्रकार मानला जातो ठुमरीचा मुख्य रस श्रृंगार हाच होय शब्दरचना संक्षिप्त असतो त्रितालाचाच एक प्रकार असलेल्या 'पंजाबी' या तालात मुख्यतः ठुमरी गायली टप्प्याप्रमाणे ठुमरीही सुगम प्रकृतीच्या रागात विशेषत्वाने आढळते. ठुमरीची लय मध्य म्हणता येईल इतकी असते ठुमरीचे गायनही गौण मानले जाते. श्रेष्ठ थोर कलाकार मोठ्या कार्यक्रमात ठुमरी शक्यतो गात नसत. उत्तर भारतातील तवायफसारख्या संगीत व्यावसायिक स्त्रिया प्रामुख्याने ठुमऱ्या गात प्रतिष्ठित समाजाने दुय्यम लेखले असले तरी नि:संशय ठुमरी हा एक खूपच लोकप्रिय गीतप्रकार आहे उत्तम ठुमरीगायन हे अतिशय कौशल्याचे काम आहे सर्वोत्कृष्ट ठुमरी गायन उत्तर प्रदेशात केले जाते ठुमरी गाणारे महाराष्ट्रीयन कलाकार अभावानेच आढळतील लखनी व बनारस ही ठुमरीसाठी अत्यंत प्रसिद्ध नावे होत. ठुमरीत रागस्वरूपाच्या शुद्धतेला गौण स्थान असते. काही कलाकार रंजकतेसाठी जाणीवपूर्वक अनेक रागांच्या छटा ठुमरीतून आविष्कृत करतात. महाराष्ट्रात ठुमरीसारख्या हलक्याफुलक्या गानप्रकाराचे प्रेम कमीच असून धृपद- ख्यालासारख्या भारदस्त प्रकारांचा आदर व आकर्षण जास्त आहे. राग, त्याचे स्वरूप, शुद्धता, शास्त्र, नियम या बौद्धिक क्षेत्राकडेच महाराष्ट्राची रसिकता प्रकषनि आकृष्ट झालेली दिसते काही असो, ठुमरी हा रसिला, मनोरंजक, दिलखेचक व लोकप्रिय प्रकार आह यात सदेह नाही. ठुमरी प्रामुख्याने दीपचदी, अध्या (अर्धीधुमाळी) इ तालात तसेच केहरवा वगैरे तालातही गायली जाते.