आग्रा घराणे
ग्वाल्हेर गायकीचा विस्तार आणि विकास होत असताना तिच्यातली उपज पद्धती घेऊन ध्रुपदपद्धतीची तालाची प्रतिष्ठा व ख्यालगायनात अपेक्षित असलेल्या लयीचं तत्त्व ह्या दोन्हींचा वेध घेणारी एक वेगळीच गानप्रणाली अस्तित्वात आली, ती आग्रा गायकी म्हणून ओळखली जाऊ लागली. खाल्हेर गायकीचं शिक्षण घेताना आपल्या आवाजाची मर्यादा आणि मूळचे ध्रुपद पद्धतीचे संस्कार यांच्या संयोगाने त्यांच्या ख्यालगावनपद्धतीत ध्रुपदगावकीतील स्वरविस्ताराचा माफकपणा आणि तालक्रियेतील लयकारी या विकसित घटकांना दिलेलं प्राधान्य या दोन गोष्टी कायम राहिल्या.
आग्रा घराण्याच्या गायकीचं ऐश्वर्यपूर्ण स्वरूप स्व. फैय्याजखाँ ह्यांनी दाखवलं व त्यांच्या प्रभावी आविष्काराने महाराष्ट्रातील जाणकार रसिकांना जिंकून घेतलं. आग्रा घराण्याच्या गायनपद्धतीच्या लोकप्रियतेला फैय्याजखाँ यांच्या परिणामकारक गायकी बरोबरच विलायत हुसेनखाँ यांचे शिक्षक म्हणून अनेक वर्षांचे परिश्रम कारणीभूत झाले. घराण्याच्या शिस्तीनुसार त्यांनी आपली शिष्यपरंपरा निर्माण केली व त्याचबरोबर स्वतंत्र चीजांची रचना करून त्यांना ग्रंथरूपाने प्रसिद्धी दिली. विलायत हुसेनखाँ यांचे दुसरे शिष्य गमाबुवा पुरोहित यांच्या 'गुणिदास' या नावाने रचलेल्या सौदर्पपूर्ण चीजा अजूनही त्यांचे शिष्य गातात. लीशी क्रीडा करून तालप्राधान्यतेच्या अंगाने आग्रा घराण्याच्या गायकांनी आपली गायली विकसित केली व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीच्या खालोखाल मानाचे स्थान मिळाले. आग्रा घराण्याची परंपरा मोठी आहे.
आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये
१. खुला पण जबारीदार आवाज
२. ध्रुपदाप्रमाणे नोमतोमचे आलाप
३. जबड्याचा प्रयोग
४. वैशिष्ट्यपूर्ण बंदिश
५. बोल अंग
६. आवाज खुला मोकळा, पल्लेदार, भारदस्त, खरवडून व नाकेला
७. ख्यालाशिवाय धृपद, धमार व ठुमरी यात प्रावीण्य
८. लयकारी- लयप्राधान्यता
९. अप्रचलित राग व विविध तालात गाण्याची आवड
१०. टोपण नावे घेण्याची पद्धत उदा. उ. फैय्याजखाँ (प्रेमपिया), विलायत हुसेनखाँ (प्राणपिया), जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास), तसद्दुक हुसेनखाँ (विनोदपिया), खादीम हुसेनखाँ (साजनविया) इत्यादी.