गझल :
भारतीय संगीतामध्ये रुजलेला व लोकप्रिय गीतप्रकार म्हणून गझलचा उल्लेख करावा लागेल. भारतावर अनेक आक्रमणे झाली. त्यामध्ये मुस्लीम शासकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मुस्लीम शासकांच्या दरबारात अनेक कलावंत आश्रयाला राहात असत. त्या माध्यमातूनच ‘गझल’ हा गीत प्रकार भारतीय संगीतामध्ये समाविष्ट झाला.
गझलची ऐतिहासिक पार्श्वभूमी :
गझल हा प्राचीन गीत प्रकार असून अरबी काळात या गीतप्रकाराची निर्मिती झाली. गझल हा उर्दू भाषेतील गीतप्रकार आहे. प्राचीन इराणमधील या प्रेमगीतांचा प्रकार सूफी संतांच्या माध्यमातून भारतात रुजला.
गझलची वैशिष्ट्ये :
प्रेम, सौंदर्य वर्णन, ईश्वर व भक्ताचे नाते असे विविध काव्यविषय गझल या गीतप्रकारात असतात. भक्ती व शृंगाररसाचा मिलाप यात प्रकर्षाने आढळतो. यामध्ये शब्दांना विशेष महत्त्व दिले असल्यामुळे गझल हा शब्दप्रधान गीत प्रकार आहे. गझलमधील खास वैशिष्ट्य म्हणजे शेर होय. गझलचे अनेक चरण असून प्रत्येक दोन चरणांच्या खंडास ‘शेर’ असे म्हणतात. एका गझलमध्ये कमीतकमी पाच शेर असतात. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. गझलच्या साथीसाठी हार्मोनियम, सारंगी, व्हायोलिन, संतुर, तबला इत्यादी वाद्ये वाजवली जातात.
गझल गायनाची पद्धत :
गझल हा गीत प्रकार आकर्षक अशा चालीमध्ये गायला जातो. गझल गायनाचा विस्तार काव्यामधील अर्थाच्या अनुषंगाने करावा लागतो. आलाप आणि तानांचा मुक्त उपयोग यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. दादरा, केरवा, रूपक इत्यादी तालांमध्ये गझल प्रामुख्याने गायली जाते.
फारसीतून मराठीत गझल आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते. यापूर्वी मणिकप्रभू आणि मोरोपंतांनीही हा काव्य प्रकार हाताळला होता. त्यानंतर प्रामुख्याने सुरेश भट हे नाव आदराने घेतले जाते.
गझल गायक :
जगजीतसिंह, बेगम अख्तर, शोभा गुर्टू, मेहंदी हसन, हरिहरन, गुलाम अली, पंकज उधास, भीमराव पांचाळे.
Excellent
ReplyDelete