◼️व्यायामाचे फायदे◼️
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा, हे वाक्य आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलं आहे की, व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठीच करायला हवा, असं आपल्याला वाटू लागलं आहे.
▪️सर्वप्रथम हा गैरसमज दूर करायला हवा.
▪️त्यासाठी वजन कमी करण्याव्यतिरिक्त व्यायामाचे काय-काय फायदे आहेत, ते जाणून घ्यायला हवं.
▪️व्यायामामुळे स्टॅमिना वाढतो, तरतरी जाणवते.
▪️शरीरातील रक्ताभिसरण जलद गतीने झाल्यामुळे हृदय आणि फुप्फुसांचं सामर्थ्य वाढतं.
▪️ एका सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलं आहे की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर ज्या व्यक्ती नियमित व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची शक्यता 5 टक्के असते
▪️ व्यायाम केल्यानंतर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होतात.
▪️तनामनात नवा उत्साह संचारतो. तेव्हा पुढच्या वेळी थकवा आलाय, त्यामुळे व्यायाम नको, ही सबब सांगू नका.
▪️झोप न येण्याच्या समस्येतही व्यायाम उपयुक्त ठरू शकतो.
▪️ नैसर्गिकरीत्या चिंता कमी करून व्यायाम आपल्या शरीर-मनाला शांत करतो.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.