औषधी गुणांनी युक्त लसुण विषयी जाणून घेऊयात..!

0

 
औषधी गुणांनी युक्त लसुनविषयी जाणून घेऊयात,benefits of garlic

औषधी गुणांनी युक्त लसुण विषयी जाणून घेऊयात..!


द्रव्य आहारातील पण तितकच औषधी गुणांनी युक्त व पाच रसांनी परिपूर्ण अशा रसोन अर्थात लसुनविषयी आज सविस्तर माहिती पाहुयात...


  • लसुनमध्ये एक पिवळसर रंगाचे तेल असते ते त्यावरील टरफले काढली की हवेमध्ये उडते त्यामध्ये औषधी उपयोगी गंधक असते असे आधुनिक शास्त्र म्हणते.


  • ज्या व्यक्तीमध्ये आळस खूप आहे, शरीर आमल्या(आंबून गेले सारखे) वाटते,जडपणा वाटतो अशांना ताजीतवानी व उत्साही गतिमान बनवायचे असेल तर यासम औषध नाही.


  • विशेषता पावसाळ्यामध्ये आम्ल रस (आंबट रस) प्रधान असतो त्या काळामध्ये ही सामतेची, वाताची लक्षणे बरेचदा पाहायला मिळतात, तेव्हा याचा वापर कायापालट करतो, मनाची मरगळही घालवतो.


  • लसुन कानासारख्या पोकळी असणाऱ्या भागांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊन देण्यासाठी खूप मदत करतो. त्यासाठी सोललेली लसणाची कळी कापसामध्ये ठेवून मग कानात बाहेरच्या बाजूला ठेवा.


  • पडजीभ लांबली असता त्यामुळे येणारा खोकला असता पूर्वी लसूण ठेचून तो पडजीभला रस स्वरूपात लावला जायचा आणि बटन दाबाव तसा खोकला थांबायचं,अर्थात वैद्य सल्याने असे प्रयोग करावेत.


  • लहान मुलांना सर्दी,खोकला होऊ घातला की पूर्वी आम्हाला लहानपणी लसणाच्या माळा घातल्या जायच्या काय बिशाद सर्दी होण्याची, झाली तरी लवकर जायची.


  • पोस्ट कोविड रुग्णांमध्ये फुप्फुसांमध्ये झालेल्या युद्धामुळे युद्धभूमी खराब होते, हे दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट सहाजिकच लसूण टाकून सिद्ध केलेल्या दुधाला देण्यास हरकत नाही.


  • संधानक कर्म असणारे हे एक लसून नावाचे परिणामकारक औषध फुफ्फुसे मधील जखमा भरून काढते शिवाय कफ द्रवीभूत होण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी याचा पोटातून व बाहेरून लसुन तेल स्वरूपात फायदाच देते.


  • भाताचे अजीर्ण किंवा भात खाल्ल्याने खूप फुगते/ वाढते अशा व्यक्तींना तर लसणाच्या पाकळ्या टाकून भात शिजवून दिल्यास तो सहज पचतो पोट फुगत नाही. उष्ण, तीक्ष्ण असल्यामुळे पित्त प्रकृती रक्त दुष्ट असणाऱ्यांनी जपून वापरावे.


 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...! 


✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top