५२ सांगेतिक परिभाषा/व्याख्या.

5
सांगीतिक ५२ परिभाषा/व्याख्या.

⧫ सांगेतिक परिभाषा/व्याख्या ⧫


(१) स्वर : कायम उंचीच्या स्थिर कर्णमधुर रंजक नादास ‘स्वर’ असे म्हणतात.
(२) नाद : संगीतोपयोगी ध्वनीस ‘नाद’ असे म्हणतात. 
(३) स्वरांचे प्रकार : (१) शुद्ध स्वर,  (२) विकृत स्वर - (अ) कोमल स्वर, (ब) तीव्र स्वर 

(४) स्वरांची शास्त्रीय नावे :- सा - षड्ज रे - रिषभ ग - गंधार म - मध्यम प - पंचम ध - धैवत नि - निषाद

(५) शुद्ध स्वर : जे स्वर आपल्या स्थानावर कायम असतात त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात. शुद्ध स्वर सात आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नि. 
(६) विकृत स्वर : जे स्वर आपल्या नीयत स्थानाहून कमी किंवा अधिक उंचीवर जातात. त्या स्वरांना ‘विकृत स्वर’ असे म्हणतात. विकृत स्वर हे दोन प्रकारचे आहेत. (१) कोमल स्वर : जे स्वर आपल्या नीयत स्थानाहून कमी उंचीवर जाणारे असतात, त्या स्वरांना ‘कोमल स्वर’ असे म्हणतात.  रे,  , , नि. (भातखंडे स्वरलिपी नुसार) (२) तीव्र स्वर : जे स्वर आपल्या नीयत स्थानाहून उंच जाणारे असतात त्या स्वरांना ‘तीव्र स्वर’ असे म्हणतात.उदा.- म॑ 

शुद्ध स्वर, कोमल स्वर व तीव्र स्वर असे सर्व मिळून एकूण बारा (१२) स्वर आहेत. शुद्ध स्वर - ०७, कोमल स्वर - ०४, तीव्र स्वर - ०१ एकूण - १२ 

(७) सप्तक : ‘सा रे ग म प ध नि’ या क्रमाने येणाऱ्या स्वरसमूहास ‘सप्तक’ असे म्हणतात. सप्तकामध्ये ७ शुद्ध, ४ कोमल व एका तीव्र अशा १२ स्वरांचा समावेश असतो. सप्तके ही तीन प्रकारची आहेत. (१) मध्य सप्तक : मूळ नैसर्गिक आवाजात गायल्या जाणाऱ्या स्वरसमूहास ‘मध्य सप्तक’ म्हणतात. चिन्ह - नाही (२) मंद्र सप्तक : मूळ नैसर्गिक आवाजापेक्षा खालच्या आवाजात गायल्या जाणाऱ्या स्वरसमूहास ‘मंद्र सप्तक’ म्हणतात. चिन्ह - स्वराखाली टिंब नि. (३) तार सप्तक : मूळ नैसर्गिक आवाजापेक्षा उंच आवाजात गायल्या जाणाऱ्या स्वर समूहास ‘तार सप्तक’ म्हणतात. चिन्ह - स्वरावर टिंब - सां 
(८) आवर्तन : गायनात किंवा वादनात तालाच्या पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत गायन करणे किंवा वादन करणे यास ‘आवर्तन’ असे म्हणतात.
(९) थाट : ज्या स्वरसमूहातून अनेक रागांची निर्मिती होते त्यास ‘थाट’ असे म्हणतात. थाट ही राग वर्गीकरणाची आधुनिक पद्धती आहे. एकूण दहा थाट आहेत. १) बिलावल २) कल्याण ३) खमाज ४) भैरव ५) काफी ६) पूर्वी ७) मारवा ८) तोडी ९) आसावरी १०) भैरवी .
(१०) आरोह : स्वरांच्या चढत्या क्रमास ‘आरोह’ असे म्हणतात. सा रे ग म प ध नि सां । आरोह अवरोह सा रे ग म प ध नि सां सा रे ग म प ध नि सां 
(११) अवरोह : स्वरांच्या उतरत्या क्रमास ‘अवरोह’ असे म्हणतात. सां नि ध प म ग रे सा
 (१२) पकड : रागवाचक स्वरसमूहास ‘पकड’ किंवा ‘मुख्य अंग’ असे म्हणतात. 
(१३) वादी स्वर : रागातील मुख्य स्वरास ‘वादी’ असे म्हणतात.
(१४) संवादी स्वर : रागामध्ये वादी स्वराखालोखाल ज्या स्वरास महत्त्व असते त्यास ‘संवादी स्वर’ असे म्हणतात. 
(१५) अनुवादी स्वर : रागांमध्ये वादी व संवादी स्वरांच्या व्यतिरिक्त जे स्वर लागतात त्या स्वरांना ‘अनुवादी स्वर’ असे म्हणतात. 
(१६) विवादी स्व: रागामध्ये एखाद्या वर्ज्यस्वराचा क्वचित प्रयोग केला तर त्या रागाची रंजकता वाढते त्यास ‘विवादी स्वर’ असे म्हणतात. उदा. - केदार रागात कोमल निषादाचा प्रयोग करतात. 
(१७) राग : रंज यति राग: ध्वनिची अशी विशिष्ट रचना की, जी स्वर, वर्ण यांच्यायोगाने श्रोत्यांचे मनोरंजन करते, अशा सुमधुर स्वर रचनेस ‘राग’ असे म्हणतात. 
(१८) सम : तालाच्या पहिल्या मात्रेस ‘सम’ असे म्हणतात. समेचे चिन्ह ‘X’ असे आहे.
(१९) काल / खाली : तालाचे स्वरूप दर्शवण्यासाठी ताल पद्धतीत ज्या ठिकाणी केवळ हाताने इशारा केला जातो त्यास ‘काल / खाली’ असे म्हणतात. कालाचे चिन्ह ‘O’ असे आहे. 
(२०) मात्रा : ताल मोजण्याच्या परिमाणास ‘मात्रा’ असे म्हणतात. 
(२१) टाळी : तालाचे स्वरूप दर्शवण्यासाठी ताल पद्धतीत ज्या ठिकाणी हाताने टाळी वाजवली जाते त्यास ‘टाळी’ असे म्हणतात. ज्या क्रमांकाची टाळी वाजवली जाते तो अंक मात्रेखाली लिहिला जातो.
 (२२) खंड (भाग) : तालाचे स्वरूप ठरवण्यासाठी ठरलेल्या मात्रांमध्ये जे भाग पाडलेले असतात त्यास ‘खंड’ किंवा ‘भाग’ असे म्हणतात. तालाचा खंड I रेषेने दर्शवला जातो. 
(२३) लय : दोन मात्रांमधील समान अंतरास ‘लय’ असे म्हणतात. लयीचे तीन प्रकार : (१) विलंबित लय, (२) मध्य लय, (३) द्रुत लय . सर्व साधारणपणे विलंबित लय म्हणजे धीम्या गतीने चालणारी लय, तर मध्यमगतीने चालणाऱ्या लयीला मध्य लय तसेच जलद गतीने चालणाऱ्या लयीस द्रुत लय असे म्हटले जाते.
(२४) सरगम गीत : स्वरांच्या तालबद्ध रचनेला ‘सरगम गीत’ असे म्हणतात.
(२५) लक्षणगीत : रागाची लक्षणे ज्या गीतातून स्पष्ट होतात त्या गीतास ‘लक्षणगीत’ असे म्हणतात.
(२६) बंदिश : कोणत्याही रागात अथवा तालात बांधलेली रचना म्हणजे बंदीश. रागगायनातील बंदिश ही रागस्वरूप दाखवण्यासाठी व रागातील स्वरांच्या विविध रचनांतून रागभाव प्रकट करण्यासाठी माध्यम म्हणून निर्माण केली जाते. बंदिशच रागातील स्वरांना शिस्तीचे महत्त्वही शिकवते.
(२७) ख्याल : ख्याल म्हणजे कल्पना - विचार. रागाचे स्वरूप समजून घेऊन त्या रागाच्या नियमानुसार आपल्या कल्पना, आपला विचार त्या स्वरांमधून व्यक्त करत रागाची रंजकता वाढवणे याला ‘ख्याल गायकी’ असे म्हणतात. ख्यालाचे दोन प्रकार : (१) बडा ख्याल, (२) छोटा ख्याल 
(२८) बडा ख्याल : विलंबित लयीमध्ये गायल्या जाणाऱ्या ख्यालाच्या प्रकारास ‘बडा ख्याल’ म्हणतात.
(२९) छोटा ख्याल :- मध्य लय आणि द्रुत लय यांमध्ये हा गीत प्रकार गायला जातो. दोन्ही ख्यालांमध्ये सुरुवातीला स्वरविस्तार, बंदिश, आलाप, स्वर आलाप, बोल आलाप, ताना, बोलताना हा गायनाचा क्रम मानला जातो.

(३०)आलाप : रागाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विलंबित किंवा मध्यलयीत केलेला स्वरविस्तार म्हणजे ‘आलाप’ होय.
(३१) तान : रागाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन द्रुतलयीत केलेला स्वर विस्तार म्हणजे ‘तान’ होय.
(३२) बोल आलाप : रागाच्या नियमानुसार बंदिशीमधील बोलांच्या आधारे म्हटलेल्या आलापांना ‘बोल आलाप’ म्हणतात. 
(३३) बोलतान : बंदिशीमधील बोलांच्या आधारे म्हटली जाणारी तान म्हणजे ‘बोलतान’. बंदिशीमधील बोलांचा अंतर्भाव त्या तानेमध्ये करणे म्हणजे ‘बोलताना’ होय. 
(३४) कणस्वर : एक स्वर घेताना पुढच्या किंवा मागच्या स्वराला स्पर्श करण्याच्या क्रियेला ‘कणस्वर’ असे म्हणतात. जसे; राग भूपालीमध्ये धैवत घेताना षड्ज स्वराचा कणस्वर घेतला जातो. 
(३५) गमक : स्वरांचे कंपन करून त्यांना वजन देण्याच्या क्रियेला ‘गमक’ असे म्हणतात. 
(३६) झाला : सतारीमध्ये चिकारी किंवा बाजाच्या तारांवर मिझराबद्वारा आघात करत ‘दारारारा, दारारारा’ हा प्रकार द्रुतलयीत वाजवण्याच्या या क्रियेला ‘झाला’ असे म्हणतात.
(३७) जाती : स्वर संख्येच्या आधारावर रागाच्या तीन जाती पडतात. १. ओडव (५ स्वर), २. षाड्व (६ स्वर), ३. संपूर्ण (७ स्वर) 
(३८) तोडा : सरोद, सतार या वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या तानांना ‘तोडा’ असे म्हणतात. 
(३९) खटका : चार किंवा चारपेक्षा अधिक स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गायली जाते, त्यास ‘खटका’ असे म्हणतात. रेसानिसा, सारेनिसा
(४०) मुर्की : जवळजवळच्या २-३ स्वरांचा शीघ्रतेने आलटून पालटून प्रयोग करणे म्हणजे ‘मुर्की’. 
(४१) अलंकार : आरोह-अवरोहयुक्त स्वरांच्या क्रमिक रचनेस ‘अलंकार’ असे म्हणतात. उदा. सारेग, रेगम, गमप, सांनीध, नीधप, धपम 
(४२) मींड : एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे घसरत जाताना मधल्या स्वरांना स्पर्श करून जाणे म्हणजे ‘मींड’ होय. जसे, सां प 
(४३) न्यास : गाताना किंवा वाजवताना रागामध्येज्या स्वरांवर थांबतो त्या स्वराला ‘न्यास स्वर’ म्हणतात. 
(४४) रजाखानी गत : तत प्रकारच्या वाद्यांवर द्रुतलयीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला ‘रजाखानी गत’ असे म्हणतात.
(४५) मसीतखानी गत : तत प्रकारच्या वाद्यांवर विलंबित लयीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला ‘मसीतखानी गत’ असे म्हणतात.
(४६) मूर्च्छना : गायन वादनात स्वरांची कोमल तीव्र रूपे सांभाळून क्रमवार स्वरसप्तक बनवणे म्हणजे ‘मूर्च्छना’ होय. 
(४७) जमजमा : तंतूवाद्यावर मिझराबच्या (नखीच्या) एका आघातामध्ये एकाच वेळी दोन स्वर वाजवणे याला ‘जमजमा’ म्हणतात.
(४८) बेहलावा : आलापामध्ये घेतलेली मध्यलयीतील छोटी तान म्हणजे ‘बेहलावा’.
(४९) पकड : रागवाचक स्वरसमूहाला ‘पकड’ असे म्हणतात. 
(५०) घसीट : नखीने तार छेडल्यावर पडद्यावर ज्या स्वरावर बोट ठेवले असेल तेथूनच तार ओढून घसरत मिंड घेऊन स्वरांपर्यंत नेण्याच्या क्रियेला ‘घसीट’ म्हणतात.
(५१) सूत : खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर किंवा वरच्या स्वरावरून खालच्या स्वरावर अनुनासिक उच्चारात मींड पद्धतीने स्वर म्हणणे ह्या क्रियेला ‘सूत’ म्हणतात.
(५२) थाट: राग निर्मितीची क्षमता असलेल्या सप्त स्वरांच्या समूहाला ‘थाट’ असे म्हणतात.

संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

एक टिप्पणी भेजें

5 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top