कधी, काय व कसे जेवावे ? जाणून घ्या.

0

कधी,काय व कसे जेवावे,rules of diet


 

कधी, काय आणि कसे जेवावे? जाणून घ्या!


लॉकडाऊनमुळे अनेक कामे बंद असली तर गृहिणीला मात्र कामाचा व्याप वाढतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आज स्वयंपाक काय करायचा? याच विवंचनेनत ती असते.  


घरात जशी गृहिणी तसा आपल्या शरीरामध्ये ग्रहणी नावाचा अवयव असतो. जो 24 तास 365 दिवस आपण घेतलेल्या अन्नाचे नीट पचन  करण्यामध्ये गुंतलेला असतो. 


आपण ऋतूनुसार, योग्य वेळेत व योग्य आहार घेतला तर ग्रहणी व गृहिणी दोघींवरचा ताण कमी होईल व आपले घर व आरोग्य दोन्ही सुरक्षित राहील.


आधीच वाढलेला उन्हाळा, त्यात होणारी तहान तहान, तोंडाला चव नाही, हालचाली कमी  व हाताशी वेळ भरपूर असल्यामुळे सतत काहीतरी चमचमीत खावं असं सगळ्यांनाच वाटतं राहतं.


पण या ऋतूचा विचार करता आणि सध्या पसरलेल्या साथीच्या आजाराचा विचार करता 'संयम से स्वास्थ्य' हाच मंत्र जपावा लागेल. आता कधी जेवावे, काय जेवावे, कसे जेवावे? याबद्दल थोडी विचार करूया.


● सर्वप्रथम म्हणजे आहार ताजा, गरम व पचायला हलका असावा. एकावेळी आवश्यक तेवढेच अन्न शिजवावे. 


● उगाच फ्रिजची बेगमी करण्यासाठी जास्तीचे अन्न शिजवून ठेवू नये.


● जेवणाच्या बाबतीत सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा. त्या पाळाच. 


● जेव्हा आकाशात सूर्य असतो, तेव्हा आपल्या पोटातील अग्नीही उत्तम प्रज्वलित असतो, पोटातील चूल चांगली पेटलेली असते  तेव्हाच आपली पोळी भाजून घेणे (म्हणजे जेवून घेणे) शहाणपणाचे! म्हणून सकाळी 11 ते 12 व संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान जेवणे उत्तम! 


● रात्री उशिरा जेवणे म्हणजे अजीर्णाला आमंत्रण! त्यामुळे शरीरात न पचलेल्या  न्नापासून आमदोष (एक प्रकारचा चिकटा) तयार होतो, जो सर्व प्रकारच्या रोगांना अनुकूल वातावरण शरीरात तयार करून ठेवतो.


● वेळेवर जेवले व पचवून टाकले, तर रोगजंतू शरीरात शिरले तरी त्यांना अनुकूल वातावरणच नसल्यामुळे, ते शरीरात टिकाव धरुच शकतं नाहीत. कारण त्यांना टिकाव धरायला, काही रसदच शिल्लक नसते.


● न रहेगा बास न बजेगी बासुरी त्यामुळे निरोगी राहायचे असेल, तर सायंकाळी लवकर जेवणे हा महामंत्र आहे.


👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...! 

अपने दोस्तों में लेख यह शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज संगीत जगत को लाइक करिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top