शास्त्रीय व सुगम संगीतातील ठेके
सर्वप्रथम आपल्याला ठेक्याची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी तालाची व ठेक्याची व्याख्या एकच समजतात, परंतु या दोन्ही व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तालाची व्याख्या जर सोप्या पद्धतीने करायची झाली तर ती पुढील प्रमाणे होईल, ठराविक मात्रा चक्र म्हणजे ताल. उदाहरणार्थ तीनताल हा 16 मात्रांचा ताल आहे, म्हणजे ते 16 मात्रांचे चक्र झाले. हे चक्र म्हणजेच ताल. संगीतात 16 मात्रांचा या चक्रासाठी अंक मोजण्याची पद्धत आहे परंतु वादनासाठी अंकाच्या ऐवजी तबल्यातील बोलांचा वापर केला जातो. म्हणजेच जेव्हा 16 मात्रांच्या तीन तालात जेव्हा "धा धिं धिं धा धा धिं धिं धा धा तीं तीं ता धिं धिं धा" हे बोल म्हटले किंवा वाजवले जातात तेव्हा तो तीन तालचा ठेका होतो. म्हणजेच जेव्हा विशिष्ट मात्रांच्या समूहासाठी तबलाच्या बोलांचा वापर होतो तेव्हा त्यास ठेका असे म्हणतात.
आता आपण सुगम व शास्त्रीय संगीतातील ठेक्यांमधील अंतर जाणून घेऊ. यासाठी आपण "रूपक" या तालाचे उदाहरण घेऊ. शास्त्रीय संगीतात रूपक या तालात स्वतंत्रवादन केले जाते. या तालाचा ठेका ती ती ना | धि ना | धि ना असा आहे. स्वतंत्र वादनात हा ठेका वरील प्रमाणेच वाजेल, परंतु जेव्हा सुगम संगीतात एखाद्या चित्रपट गीतासाठी किंवा गझल साठी वाजवताना त्या तालाचा ठेकाच वाजवीला जाईल असे नाही. त्यासाठी गाण्याला अनुकूल त्या ठेक्याचे कीस्मे म्हणजेच प्रकार वाजविला जाईल. उदाहरण म्हणून आपण मराठी चित्रपट गीत "ही अनोखी गाठ कोणी बांधली" हे घेऊ. शकतो हे गीत बारकाईने ऐकल्यास आपल्या असे लक्षात येईल की त्यात वजन रूपक तालाचेच आहे परंतु ठेका रूपकचा नाही.
आता आपण सुगम संगीतात गीतांसाठी वापरले जाणारे असे ताल पाहू ज्यांचे त्या गीतामध्ये ठेके वापरले जात नाही, त्या ऐवजी किस्मे वापरले जातात.
ताल - दादरा
प्रकार - धाना तिं तिं ताना धिं धिं
ताल - रूपक
प्रकार - तीक्ड तींना तिरकिट धींधीं नाना धींधीं नाना
ताल - केरवा
प्रकार - धा धीं ना धीं ना धीं ना तीं
असे अनेक प्रकार संगीतकाराने तसेच वादकांनी आपापल्या सर्जनशीलतेने तयार करून रसिकांपर्यंत पोहोचवले आहेत. आजच्या तरुण पिढीतल्या कलाकारांनी अशा विविध गाण्यांचा अभ्यास केल्यास त्यांचे सादरीकरण अधिक प्रभावी व रंजक होईल.