ॲसिडिटी वर उपाय !

0


ॲसिडिटी वर उपाय !


 पोटात जळजळ किंवा ॲसिडिटी एक कॉमन समस्या आहे. ज्यामुळे लोक नेहमीच वैतागलेले असतात. तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ खाल्याने, तणाव किंवा चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. ही समस्या दूर करण्याचे अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत.


नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, नियमितपणे चालल्याने ॲसिडिटीचे लक्षण कमी करण्यास आणि भविष्यात त्याचा धोका कमी करण्यास मदत होते. या रिसर्चमध्ये लोकांना आढळलं की, जे लोक १२ आठवडे रोज ३० मिनिटे पायी चालले त्यांची ॲसिडिटीची लक्षणे खूप कमी झाली. या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, पोट फुगणं, आंबट ढेकर आणि अस्वस्थता यांचा समावेश आहे.


कसा मिळतो फायदा...


पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशींना उत्तेजना मिळते, ज्यामुळे पचनक्रिया वेगवान होते. अन्न सहजपणे पचतं आणि पोटात ॲसिड ची निर्मिती कमी होते. त्याशिवाय पायी चालल्याने तणाव कमी होतो, जो ॲसिडिटीची समस्या वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. पायी चालण्याचे फायदे...


पचनक्रिया सुधारते...


पायी चालल्याने शरीराची हालचाला होते, ज्यामुळे पचनक्रियेला गती मिळते. अन्न चांगलं पचतं आणि पोटात ॲसिड कमी तयार होतं.


पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात..


पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे अन्न खाली सरकवण्याची क्षमता वाढते. तसेच ॲसिड पुन्हा परत येण्याचा धोकाही कमी राहतो.


तणाव कमी होतो...


तणावामुळे ॲसिडिटी वाढते. पायी चालल्याने तणाव कमी करण्यास मदत मिळते आणि मन शांत हतं. ज्यामुळे आपोआप ॲसिडिटीची समस्या कमी होते.


वजन कमी करण्यास मदत...


ॲसिडिटी समस्या अनेकदा लठ्ठपणाशी जुळलेली असते. पायी चालल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे ॲसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top