🤓 स्वर यंत्रावर काम करणारे राजा औषध...!
आज पाहुयात स्वर यंत्रावर काम करणारं राजा औषध म्हणून ज्याच्याकडे आदराने पाहिलं जातं आणि गायकांसाठी गळा उत्तम राहावा म्हणून अगदी रसायन म्हणून संबोधले जातात.
मधुयष्टी, यष्टीमधू, मधुवल्ली अशी असंख्य गोड नावे तिला प्राप्त आहे, अर्थात या वनस्पतीच्या गोडव्याने पित्ताचे शमन होते व कफ सुटण्यासाठी चांगला फायदा होतो.
विषावर काम करणार, यापासून सिद्ध केलेले तूप बरेच वैद्य आतड्यांच्या सुजेवरती,आतड्यांच्या जखमांवर, जळजळ, पोटदुखीमध्ये गरम करून तुपाचा कापसामध्ये बनवलेला पीचू वापरतात.
केसांची गळणे, टक्कल पडणे, केसांच्या मुळाशी असणाऱ्या कोरडा कोंड्यासारख्या व्याधीमध्ये ज्येष्ठमध अल्प प्रमाणात त्रिफळा भरड स्वरूपात काढा करून केस धुण्यासाठी वापरतात.
पोटातून वापरताना कमी मात्रेत दिल्यास बरेच औषधांबरोबर वापरण्याची जुन्या वैद्यांची परंपरा आहे त्यामुळे औषधांचे कारकत्व वाढते आणि जीवनीय व रक्तगामी हे दोन विशेष आणखी कौतुक करण्यासारखेच.
शिक्षकांसारख्या व्यवसायामध्ये मोठ्याने बोलण्याने उद्भवलेल्या स्वर साद या विकारात या औषधाचे सिद्ध दूध वेगळीच आवाजाला ताकत देते व आवाज पूर्ववत होतो.
क्षय असो किंवा आजचा covid-19 यामध्ये ज्वर जरी गेला तरी एक प्रकारची रस रस अंगात सोडुन जातो त्यामुळे निर्माण होणारा थकवा, खोकला,फासळ्यांमधील वेदना या सर्वांमध्ये इतर औषधांबरोबर ज्येष्ठमध आपसूक असतोच.
लोध्र, वाळा,चंदन, रसांजन या औषधांचा जिथे वापर होतो आशा पित्तज प्रमेहामध्ये ज्येष्ठमधाचा खूप चांगला उपयोग होतो अर्थात इथे त्याचा गोडवा आडवा न येता उपयोगी पडतो.
ज्येष्ठमध हे रक्तशुद्धी करणार, रक्ताचे स्तंभन करणार, रक्त वाढवणार असं तिन अंगाने काम करते. जठरातील आंब पणा(आंबटपणा) कमी करणार हे हुकमी मी औषध आहे.
अगदी गर्भावस्थेत असल्यापासून याचा फायदा वैद्यांना आकृष्ट करतो कारण तो रक्तात बदल घडवून आणून बाळाचा गौर वर्ण प्राप्त करून देण्यास मदत करतो शिवाय रक्ताच्या फेसा पासून निर्मित फुप्फुस देखील उत्तम घडवतो.
या काळामध्ये ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी जवळच्या वैद्याकडून त्यांच्या सल्ल्याने आपली निर्माण होणारी फुफ्फुससारखी अवयव बलशाली कशी होतील याची औषधे घ्यावीत.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।