संगीत थेरेपी-मेंदू
साठी वरदान
मानवी
जीवनात संगीत कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. की संगीताची
उत्पत्ती ही भावना व्यक्त करण्यासाठी झाली आहे. कालांतराने
आणि विविध सामाजिक बदलांमुळे संगीत है “आर्ट व संगीत थेरपी” म्हणून गणले जात आहे.
संगीत कलेचा मानवी मेंदूशी थेट संबंध येऊन त्याद्वारे मानसिक आरोग्यावर विविध
सकारात्मक परिणाम होतात.
आपण
व्यायामासारख्या चांगल्या गोष्टी करण्याचा विचार करतो तेव्हा, आपल्या शरीराबद्दल
आपण नेहमी विचार करतो. परंतु, यामध्ये आपल्या शरीराचा अत्यंत आवश्यक
अवयव मेंदु विसरतो. संगीत थेरेपी
मेंदूसाठी “स्पा” म्हणून कार्य करते.
संगीत थेरपीमुळे मेंदूला पोषक द्रव्य मिळतात आणि मेंदूची सर्व केंद्रे कायम सक्रिय
राहतात. तर, मानसिक स्वास्थ्य व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या
दैनंदिन जीवनात संगीत कला समाविष्ट करणे फार महत्वाचे आहे.
संगीत थेरेपी हा एक प्रोग्राम आहे. जो
सर्व आजार बरे करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये
सक्रिय तसेच निष्क्रिय तंत्र असु शकतात. 12
मज्जातंतुपैकी 10 मज्जुतंतु हे कानांशी जोडलेले असतात, जे आपल्या
थेट मज्जासंस्थेशी निगडित व कार्यरत असतात. त्यामुळे
विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्याने मेंदूचे कार्य चांगले सुधारते.
सामान्यतः लोक कामाच्या थकव्यानंतर विश्रांतिसाठी
व मानसिक समाधानासाठी एक साधन म्हणून
संगीत कलेचा वापर करतात. संगीत कलेचा वापर
ताणतणावापासून तात्पुरते शरीर आणि मन हलके व मोकळे करण्यासाठी केला जातो. मानसिक आरोग्याच्या बाबतीत नैराश्य ही एक
सामान्य समस्या आहे. ज्यामुळे
मूडमध्ये बदल होतो आणी स्वारस्य,
आनंद कमी होतो. संगीत थेरेपीमुळे
नकारात्मकतेची, नैराश्याची
लक्षणे आणी चिंता कमी होऊन मेंदूचे कार्य सुधारते. आजच्या
कोरोनाच्या साथीत, समाजाचा एक मोठा
वर्ग मानसिक ताणतणाव, निराशा, चिंता, काळजी, एकटेपणा
आणि नकारात्मकतेसह अंतर्गत आघात व विकारांनी ग्रस्त आहे. म्हणूनच, आजूबाजूच्या सर्व नकारात्मकतेशी लढा देण्यासाठी संगीत थेरपी
ही काळाची गरज आहे. संगीत थेरपी ही
समाजातील प्रत्येक नागरिकाला तणावमुक्त आणि सुधारित जीवनाची संधी देते.